DIY सौंदर्य

घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Jul 16, 2019
घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

हात आणि हाताची नखं सुंदर असावीत असं प्रत्येकीलाच वाटत असतं. पार्लरमध्ये मेनिक्युअर आणि पेडीक्युअर करून तुम्ही नक्कीच सुंदर दिसू शकता. मेनिक्युअर म्हणजे हात  आणि हाताच्या नखांची स्वच्छता आणि काळजी घेणं. यासाठी महिन्यातून एकदा तरी मेनिक्युअर करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचे हात नक्कीच मऊ आणि मुलायम होऊ शकतात. आजकाल फ्रेंच मेनिक्युअर करायची फॅशन आहे. फ्रेंच मेनिक्युमुळे तुमची नखं अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. फ्रेंच मेनिक्युअरमुळे तुमच्या नैसर्गिक लुक आणि चमक येते. मात्र लक्षात ठेवा नखं केवळ बाहेरून सुंदर नाही तर आतूनही निरोगी असणं गरजेचं आहे. यासाठी जर घरीत मॅनिक्युअर करणार असाल तर ते कसे करावे याबाबत तुम्हाला माहीत असणं  गरजेचं आहे.

#DIY घरी फ्रेंच मेनिक्युअर कसे करावे

फ्रेंच मेनिक्युअर हा हातांची निगा राखण्यासाठी एक वेगळा आणि उत्तम प्रकार आहे. शिवाय महिलांमध्ये हा सर्वात लोकप्रिय असणारा मेनिक्युअरचा प्रकार आहे. पार्लरमध्ये फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च करावे लागतात. शिवाय जर एखादी पार्टी अथवा अचानक ठरलेल्या कार्यक्रमाला जाताना तुमच्याकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर तुमची पंचाईत होऊ शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्याची सोपी पद्धत आणि काही स्टेप्स सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या वेळ आणि सोयीनुसार तुमच्या हाताचे सौंदर्य कधीही वाढवू शकता. 

फेंच मेनिक्युअर करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी

आजकाल बाजारात तयार मेनिक्युअर किट विकत मिळतात. ज्यामध्ये ही सर्व साधनं असतात. जर तुम्हाला तसं तयार किट नको असेल तर एखाद्या ब्युटी सेंटरमधून तुम्ही काही साधनं निरनिराळी देखील विकत घेऊ शकता.

घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स

घरी फ्रेंच मेनिक्युअर करणं फारच सोपं आहे. अगदी काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही घरीच तुमचे हात आणि नखांचे सौंदर्य वाढवू शकता. यासाठी वर दिलेले साहित्य एकत्र करा आणि या काही सोप्या टिप्स स्टेप्स फॉलो करत तुमच्या नखांचे सौंदर्य अधिक खुलवू शकता.

नखांवरचं जुनं नेलपॉलिश काढून टाका

एका कापसाच्या तुकड्यावर अथवा कॉटन पॅडवर नेल रिमूव्हर घ्या आणि ते नखांवर हळूवारपणे फिरवा. रिमूव्हरच्या मदतीने तुमच्या नखांवरील जुन्या नेलपॉलिशचा कोट काढून टाका. ज्यामुळे तुमच्या नखांचा वरील भाग स्वच्छ आणि नैसर्गिक दिसू लागेल. नखांवरून जुनी नेलपॉलिश काढताना तुमच्या नखांच्या कोपऱ्यातून अडकलेली नेलपॉलिश काढण्यास मुळीच विसरू नका. फ्रेंच मॅनिक्युअर करण्याआधी ही एक महत्त्वाची स्टेप आहे.

नखे कापून त्यांना योग्य आकार द्या

नखांवरील नेलपॉलिश काढून टाकल्यावर तुमच्या नखांचा मुळ आकार आणि लांबी नीट दिसू लागेल. त्यानंतर नखांना योग्य आकार देण्यासाठी तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. सर्व नखांची लांबी एकसारखी असेल याची काळजी घ्या. नखे कापण्यासाठी चांगल्या नेलकटरचा वापर करा. 

हात पाण्यात कोमट पाण्यात भिजवा

नखं कापून झाल्यावर एका भांड्यात कोमट पाणी घ्या. या पाण्यातील उष्णतेचा अंदाज घेत त्या पाण्यात पाच ते दहा मिनीटं हात बुडवून ठेवा. ज्यामुळे तुमच्या नखांची वाढलेली  क्युटिकल्स मऊ होतील. क्युटिकल्स मऊ झाल्यामुळे फुगतील आणि तुमच्या डोळ्यांना ती सहज दिसू लागतील. हात पाण्यातून बाहेर काढा. एका स्वच्छ टॉवेलने हात पुसून कोरडे करा. 

नखांची वाढलेली क्युटिकल्स काढून टाका

नखांवरील अती वाढलेली क्युटिकल्स कापून टाका आणि ती पुन्हा नखांच्या आतल्या दिशेने ढकला. क्युटिकल्स पूश करण्यासाठी क्युटिकल पूशरचा वापर करा. शक्य असल्यास क्युटिकल कापण्याऐवजी ते नखांमध्ये ढकलणं योग्य ठरेल. नखं जिथुन वाढतात त्या ठिकाणी बाहेर आलेल्या त्वचेला क्युटिकल्स असं म्हणतात. त्यामुळे क्युटिकल्सनां दुखापत झाल्यास तुम्हाला इनफेक्शन होण्याची शक्यता असते. 

नखांना बफ करा

निर्जंतूक बफरने नखांना बफ करा. नखांना योग्य आकार देण्यासाठी आणि नखांवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी नखांना बफ करण्याची गरज असते. मात्र लक्षात ठेवा बफर नखांवर जोरात घासू नका. कारण नखं आणि क्युटिकल्स नाजूक असतात. असं केल्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. बफ केल्यावर नखांना क्युटिकल ऑईल अथवा तुमच्या घरी असलेलं बदामाचं तेल, ऑलिव्ह ऑईल लावा.

हाताला स्रब लावा

नखांसोबतच तुमच्या संपूर्ण हाताची स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. हाताच्या त्वचेवर धुळ आणि प्रदूषणाचा एक थर जमा झालेला असतो. शिवाय नेहमी हात स्वच्छ करूनदेखील त्वचेवरील डेडस्किन पूर्णपणे निघून जात नाही. यासाठी हातावर एखादे चांगले स्क्रब लावून तुम्ही या गोष्टी मुळापासून काढून टाकू शकता. यासाठी एखादे नैसर्गिक स्क्रब घेऊन हातावर हळूवारपणे मालिश करा. काही मिनीटांनी हात स्वच्छ करा. घरी मॅनिक्युअर करण्यासाठी तुम्ही मध आणि साखर, कॉफी आणि दूध, लिंबू आणि साखर अशा काही घरगुती स्कबचा वापर करू शकता. मात्र हे स्क्रब वापरण्यासाठी हातावर ते जोरात रगडू नका. आपली त्वचा नाजूक असल्याने ती हळूवारपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे.

हाताला मॉश्चराईझ करा

स्क्रब लावल्यामुळे तुमच्या हात आणि बोटांची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेच्या आतील छिद्रे मोकळी होतात. त्वचेवरील धुळ, प्रदूषण, डेडस्किन, मातीचा थर निघून गेल्यामुळे त्वचेला पुरेश्या ऑक्सिजनचा पूरवठा होतो. मात्र अशा अवस्थेमध्ये त्वचेची छिद्रे मोकळी झाल्यामुळे त्वचेला अधिक काळजी आणि पोषणाची गरज असते. यासाठी योग्य मॉश्चराईझिंग क्रीमने हाताला मसाज करा. 

नखांना नेलपॉलिश लावण्यासाठी तयार करा

हात आणि नखं स्वच्छ केल्यामुळे तुमचे हात मऊ आणि मुलायम दिसू लागतील. अशा कोमल हातांवर नेलपॉलिश लावल्यामुळे ते अधिक सुंदर दिसू लागतात. यासाठी फ्रेंच मॅनिक्युअरच्या हा महत्त्वाच्या स्टेपला जरूर लक्षात ठेवा आणि तुमच्या नखांना नेलपॉलिश लावण्यासाठी तयार करा. 

नखांवर बेसकोट लावा

फ्रेंच मेनिक्युअर केल्यावर नखांना बेस कोट लावावा. बेस कोट हा सामान्यपणे ट्रान्सफंरट अथवा नखांच्या रंगांचा असतो. हा बेस कोट प्रत्येक नखाच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावून घ्यावा. कोणतेही नेलपॉलिश अथवा बेस कोट लावताना क्युटिकल्सरपासून नखांच्या टोकांपर्यंत लावावा. नेलपॉलिशच्या ब्रशने एकसमान स्ट्रोक द्यावे. ज्यामुळे नेलपॉलिश चांगल्या पद्धतीने लाहते. अशा प्रकारे दोन्ही हाताच्या नखांना हा बेस कोट लावून घ्यावा.

नखांच्या टोकाला सफेद नेलपॉलिश लावा

1.दोन्ही हाताच्या नखांना बेस कोट लावल्यानंतर तो सुकू द्यावा. बेस कोट सुकल्यानंतर नखांच्या टोकाकडील भागावर पांढऱ्या रंगाचे नेलपॉलिश लावावे. हे नेलपॉलिश लावताना हात स्थिर राहील याची काळजी घ्यावी. ज्या भागापासून नखं वाढायला सुरूवात होते तेवढ्या भागापासून पुढे हे पांढरे नेलपॉलिश नखांवर लावावे. त्यानंतर पुढील कोट लावण्याआधी नखांवरील पांढरे नेलपॉलिश नीट सुकेल याची काळजी घ्यावी.

2. जर तुम्हाला पांढरी नेलपॉलिश लावणं कठीण वाटत असेल तर तुम्ही एखादी चिकटपट्टी नखावर चिकटवून नखाच्या टोकाला पांढरं नेलपॉलिश लावू शकता. 

3. जर तुमच्याकडे बाजारात विकत असणारं फ्रेंच मॅनिक्युअर किट असेल तर त्यामध्ये असलेलं Crescent- shape nail guide वापरून तुम्ही हे नेलपॉलिश व्यवस्थित लावू शकता.

नखांवर फायनल कोट लावा

नखांवर सर्वात शेवटी फायनल बेस कोट लावा. ज्यामुळे तुमचं मेनिक्युअर जास्त काळ टिकू शकेल. अशा प्रकारे सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे हात सुंदर आणि मनमोहक करू शकता. फ्रेंच मेनिक्युअर केल्यामुळे तुमचे नैसर्गिक पद्धतीने सुंदर दिसतात. दररोज नखांवर गडद रंगाचं नेलपॉलिश लावणं शक्य नसतं. ऑफिसला जाताना फॉर्मल लुकवर अशा प्रकारचं मॅनिक्युअर अगदी परफेक्ट दिसतं.

फ्रेंच मेनिक्युअरबाबत असलेलं महत्त्वाचे प्रश्न FAQS

नखं पूर्णपणे कापलेली असतील तर फ्रेंच मेनिक्युअर करता येतं का ?

नाही, कारण फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी तुमची नखं थोडीशी वाढवलेली असणं गरजेचं  आहे. कारण फ्रेंच मेनिक्युअर केल्यावर लावण्यात येणारा बेस कोट आणि व्हाईट नेलपॉलिश त्यामुळे छान दिसतं. 

फ्रेंच मेनिक्युअरसाठी नखं किती मोठी असावीत ?

फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी नखं मध्यम आकारात वाढलेली असावीत कारण फार मोठ्या आणि फार लहान लांबीच्या नखांवर फ्रेंच मेनिक्युअर चांगले दिसत नाही. फ्रेंच मेनिक्युअर केल्यानंतर लावण्यात येणारा बेस कोट आणि व्हाईट नेलपॉलिश त्यामुळे सुंदर दिसतं. 

फ्रेंच मेनिक्युअर घरी करावं की पार्लरमध्ये ?

फ्रेंच मेनिक्युअर आता अनेक पद्धतीने करता येतं. त्यामुळे ते तुम्हा पार्लर अथवा घरी दोन्हीकडे नक्कीच करू शकता. पार्लरमध्ये फ्रेंच मेनिक्युअर केल्यास त्याचं  फिनीशिंग चांगलं दिसतं. शिवाय पार्लरमध्ये असलेल्या अत्याधुनिक साधनांमुळे ते व्यवस्थित करता येतं. मात्र ते फारच खर्चिक असू शकतं. त्यामुळे वर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही घरी देखील फ्रेंच मॅनिक्युअर नक्कीच करू शकता.

फ्रेंच मेनिक्युअर किती काळ टिकू शकतं?

फ्रेंच मेनिक्युअर किती काळ टिकावं हे सर्वस्वी तुम्ही किती काम करता यावर अवलंबून आहे. कारण जर तुम्ही फार काम करत नसाल तर तुमचं फ्रेंच मेनिक्युअर अगदी महिनाभर तसंच राहू शकतं. मात्र हाताने कामे करणाऱ्या मुलींच्या हातावर ते फार काळ टिकू शकत नाही.

फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी किती खर्च करावा लागतो?

पार्लरमध्ये फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी पार्लरमध्ये कमीत कमी 500 ते 1000 रू. खर्च करावे लागू शकतात. शिवाय यामध्ये आणखी काही गोष्टी हव्या असतील तर तो खर्च वाढतच जावू  शकतात. मात्र घरी फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फ्रेंच मेनिक्युअरचे किट विकत घेतल्यास तुम्ही बऱ्याचदा फ्रेंच मेनिक्युअर करू शकता. 

अधिक वाचा

पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय How to Grow Nails Faster in Marathi

घरी वॅक्सिंग करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

Read More From DIY सौंदर्य