Care

कुरळ्या केसांची अशी घ्या काळजी, वापरा हे उपाय

Dipali Naphade  |  Jan 23, 2021
कुरळ्या केसांची अशी घ्या काळजी, वापरा हे उपाय

सरळ केस आणि कुरळे केस यामध्ये खूपच तफावत आहे. बऱ्याच जणांना कुरळे केस आवडतात. पण कुरळ्या केसांंचा अधिक गुंता होतो. दिसायला कुरळे केस अधिक चांगले दिसत असले तरीही त्याची काळजी घेणे हे मात्र नक्कीच संवेदनशील काम आहे. मुळात कुरळ्या केसांची वाढ ही सरळ केसांपेक्षा कमी प्रमाणात होते. पण याची काळजी नीटनेटकी घेतली तर कुरळे केस हे निरोगी राहतात आणि केसांचा विकास आणि वाढही चांगली होते. आम्ही दिलेले काही उपाय केले आणि काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो. सरळ केसांच्या तुलनेत कुरळे केस हे नक्कीच अधिक संवेदनशील असतात. योग्य उत्पादनांचा त्यासाठी वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या केसांचे टेक्स्चर लक्षात घेऊन मगच उत्पादनांचा वापर करावा जे तुमच्यासाठी योग्य ठरतील. कारण चुकीची उत्पादने ही केसांच्या स्काल्पला नुकसान पोहचविण्याचे काम करतात. त्यामुळे कुरळ्या केसांची कशी काळजी घ्यायची आणि त्याची वाढ होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण जाणून घेऊया.

सतत केस धुऊ नका

Shutterstock

जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही सतत केस धुऊ नका. कुरळे केस हे मुळातच नैसर्गिकरित्या कोरडे असतात.  त्यामुळे रोज जर तुम्ही केस धुतले तर तुमचे केस अधिक प्रमाणात गळण्याची आणि तुटण्याची शक्यता असते. कुरळे केस घनदाट असतात त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. त्याशिवाय असं केल्याने केसांच्या अगदी मुळापर्यंत पोहचणे शक्य नसते. तसंच कंडिशनिंग करताना केसांना साधारण 4 ते 8 भागांमध्ये विभागून घ्या आणि मग एक एक भाग धुवा आणि मग कंडिशन लावा. कुरळ्या केसांसाठी डीप कंडिशनिंग करणे गरजेचे आहे. तसंच रोज केसांना मॉईस्चराईज करणेही गरजेचे आहे. यामुळे केस हायड्रेट राखणं सोपं जातं. 

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी

सतत केस बांधून ठेऊ नका

Shutterstock

केसांना सतत बांधून ठेवणं अथवा सतत केसांचा बुचडा करून ठेवणं हे योग्य नाही. तुम्ही जर केसांची वेणी घालत असाल अथवा केसांची पोनीटेल बांधत असाल तर ती जास्त घट्ट  असणार नाही याची काळजी घ्या. कुरळे केस जास्तीत जास्त मोकळे राहतील याची काळजी घ्या. कारण कुरळे केस बांधल्याने मुळापासून पटकन तुटतात. तसंच केसांना बांधण्यासाठी मेटल अथवा रबरबँडचा वापर करणं शक्यतो टाळा. यामुळे केसांना अधिक नुकसान पोहचते.  केसगळती होण्याचे महत्त्वाचे कारण ठरते. 

कोणत्याही हिटशिवाय नैसर्गिकरित्या केसांना कर्ल कसे कराल (How To Curl Hair Naturally)

कधीही स्वतःहून केस कापू नका

Shutterstock

कुरळे केस हे पटकन गुंंततात. त्यामुळे त्याची लांबी समजून घेणं हे अत्यंत कठीण असतं. त्यामुळे स्वतःहून जर हेअरकट करायचा असेल तर तुम्हाला या केसांचा अंदाज येत नाही. तसंच कुरळे केस हे फार कमी वेगाने वाढतात. त्यामुळे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने केस कापले तर केसांची वाढ होण्यास त्रास  होतो. तसंच तुमचा लुक खराब होण्याची शक्यताही असते.  त्यामुळे ट्रिमिंग अथवा हेअरकट असेल तर तुम्ही स्पेशालिस्टकडूनच हे करून घ्या.  कुरळ्या केसांच्या  बाबतीत कोणतेही प्रयोग करणं टाळा. 

कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

व्यायाम आणि डाएटवरही द्या लक्ष

Shutterstock

तुमच्या कुरळ्या केसांची वाढ जर संथगतीने होत असेल तर तुम्ही तुमच्या डेली रूटीनकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हेल्दी डाएट आणि काही खास व्यायामांचा उपयोग यासाठी करून घेऊ शकता.  केसांच्या वाढीसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसंच हेल्दी डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करून घ्या जे पोषक तत्वयुक्त असेल. ओमेगा ३ फॅटी अॅसिड,  प्रोटीन आणि लोहयुक्त खाण्याचे सेवन करा आणि रोज शरीराला आवश्यक इतके पाणी नक्की प्या. यामुळे कुरळ्या केसांची वाढ उत्तम होण्यास मदत मिळते.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care