आरोग्य

गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

Dipali Naphade  |  Apr 21, 2020
गरोदर राहण्यासाठी करण्यात येतोय मेन्स्ट्रूअल कपचा वापर

कोणत्याही महिलेसाठी आई होण्याचा आनंद हा नक्कीच खास असतो. लग्न झाल्यानंतर आपण आई कधी होणार हे प्रत्येकाने ठरवलेले असते. पण कधी कधी आपल्याला हवं तेव्हा आई होता येतं असं नाही. बरेचदा गरोदर राहण्यासाठी कन्सिव्ह करतानाही अडचणी येत असतात. त्यामुळे काही महिला अशाही आहेत ज्यांना गरोदर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. त्यांना डॉक्टरांची मदतही घ्यावी लागते. बरेचदा आपण ऐकलं असेल की, काही महिला आई होण्यासाठी शारीरिक संबंध ठेवल्यावर लगेच आपले पाय हवेत वर करतात अथवा त्वरीत अननस खातात. अशा अनेक ट्रिक्स महिला वापरत असतात. पण आता यामध्ये  अजून एका गोष्टीची मदत होत आहे आणि ती म्हणजे मेन्स्ट्रूअल कप. तुम्हाला वाचून थोडं आर्श्चर्य नक्की वाटेल. पण गरोदर होण्यासाठी सध्या याची मदत घेतली जात आहे. अर्थात याचा फायदा होत आहे. मेन्स्ट्रूअल कपचा यासाठी कसा आणि कधी वापर करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा

मेन्स्ट्रूअल कपचा वापर

Shutterstock

आतापर्यंत मेन्स्ट्रूअल कपचा वापर हा मासिक पाळीच्या वेळी केला जातो  याची सगळ्यांना माहिती होती. साधारणतः मासिक पाळीच्या वेळी याचा वापर पॅड्सच्या ऐवजी करण्यात येतो. पण आता गरोदर राहण्यासाठी  अथवा बाळ कन्सिव्ह करण्यासाठीही याचा उपयोग होत आहे.

गरोदरपणात सकाळीच उठल्यावर मळमळतंय…तर करा नैसर्गिकरित्या उपचार

मेन्स्ट्रूअल कपने कशी होते मदत

मेन्स्ट्रूअल कप सिलिकॉन अथवा लेटेक्सने बनलेले असतात. हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात जे व्हजायनाच्या आत व्यवस्थित सेट करता येतात. मासिक पाळीच्या दरम्यान यामध्ये रक्त जमा होते. गर्भधारणा करतानाही याचा अशाच प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तेव्हा स्पर्म जाण्यासाठी हाच एक मार्ग वाचतो. जेव्हा मेन्स्ट्रूअल कप तुम्ही लाऊन सेक्स करता तेव्हा स्पर्म्स हे सरळ वरच्या दिशेनेच जातात आणि अंड्याला जाऊन मिळतात त्यामुळे तुम्ही गरोदर राहण्याची संधी यामध्ये जास्त प्रमाणात असते. यामध्ये स्पर्म्स इथे तिथे जाण्याचा धोकाच नसतो. त्यामुळे मेन्स्ट्रूअल कपचा यासाठी जास्त चांगल्या प्रमाणात वापर करून घेता येत आहे.

गरोदरपणानंतर काय घ्यावी काळजी, जाणून घ्या (After Pregnancy Tips In Marathi)

कधी आणि कसा करावा मेन्स्ट्रूअल कपचा वापर

Shutterstock

तुम्हाला जर गरोदर राहायचे आहे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न  करूनही तुम्हाला अपयश मिळत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून पाहू शकता. हा कसा वापरायचा तर तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करता त्यानंतर स्पर्म्स व्हजायनामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्वरीत मेन्स्ट्रूअल कप त्याठिकाणी लावा. तसं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुल आऊट मेथड वापरायला सांगा. अर्थात सेक्स करताना स्पर्म बाहेर आल्या आल्या तुम्ही मेन्स्ट्रूअल कपमध्ये इन्सर्ट करून त्वरीत व्हजायनामध्ये मेन्स्ट्रूअल कप घाला. या उपायाने स्पर्म्स आतमध्ये जाण्यास सहज शक्य होते.

लक्षात ठेवा या गोष्टी

मेन्स्ट्रूअल कप वापरण्यासाठी जे मार्गदर्शन करण्यात आले आहे त्याप्रमाणेच वापरा. मेन्स्ट्रूअल कप बारा तासांपेक्षा  अधिक तुम्ही लाऊन ठेऊ शकत नाही. तुम्ही तसे केल्यास, व्हजायनाची पीएच लेव्हल बिघडून तुम्हाला यीस्ट इन्फेक्शनचा धोकाही होऊ शकतो. त्यामुळे योग्य  काळजी घ्या. तसेच काहीही करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Read More From आरोग्य