लाईफस्टाईल

गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट

Trupti Paradkar  |  Mar 28, 2019
गोड बातमी जाणून घेण्यासाठी करा या प्रेगन्सी टेस्ट

लग्नानंतर ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यासाठी गोड बातमी मिळण्याचा ‘क्षण’ अतिशय महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला समजतं तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. पण तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठी आधी प्रेगन्सी टेस्ट करणं फारच गरजेचं आहे.  पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना प्रेंगन्सी टेस्ट कधी करावी आणि यासाठी कोण-कोणत्या प्रेगन्सी टेस्ट कधी कराव्यात हे माहित नसतं. काही जणी इतक्या संवेदनशील असतात की प्रेगन्सी टेस्ट न करताही त्यांना त्या गरोदर आहेत हे समजू शकतं. मात्र प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी टेस्ट करण्याची नक्कीच गरज असते. जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा (HCG – Human Chorionic Gonadotropin) हॉर्मोन्स तुमच्या युरिनमध्ये आढळते त्यामुळे प्रेगन्सी टेस्टसाठी युरिन टेस्ट केल्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच आम्ही तुम्हाला प्रेगन्सी टेस्ट करण्याचे काही प्रकार आणि ती केव्हा आणि कशी करावी याची माहिती देत आहोत.

प्रेगन्सी टेस्ट किट (Pregnancy test kit)

आजकाल जाहिरात आणि इतर माध्यमातून आपल्याला प्रेगन्सी टेस्ट किटविषयी योग्य माहिती नक्कीच मिळत असते. मात्र हे प्रेगन्सी टेस्ट स्वतःसाठी पहिल्यांदा वापरताना मनात एक प्रकारची धाकधूक निर्माण झालेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेगन्सी टेस्ट नेहमी सकाळच्या वेळीच करावी. कारण सकाळी युरिनमध्ये HCG हॉर्मोन्स स्पष्टपणे आढळून येतं. मासिक पाळी चुकल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही प्रेगन्सी टेस्ट करू शकता. प्रेगन्सी टेस्ट किटच्या माध्यमातून पाच मिनीटात तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे समजू शकतं. कोणत्याही मेडीकल शॉपमध्ये प्रेगन्सी टेस्ट किट सहज उपलब्ध असतं. या किटवरील सूचना नीट वाचून घ्या. प्रेगन्सी टेस्ट करण्यासाठी किटवर दिलेल्या माहितीनुसार युरिनचे काही थेंब ड्रॉपरने टाका. जर तुमच्या युरिनमध्ये HCG हॉर्मोन आढळले तर किटवर दोन गुलाबी रंगाच्या रेषा उमटतात. याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात अथवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे असा होतो. जर किटवर एकट गुलाबी रंगाची रेष उमटली तर तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे असा त्याचा अर्थ होतो. जर तुमची टेस्ट निगेटिव्ह आली तर मुळीच चिंता करू नका. कारण गरोदर होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे पुढच्या वेळेस नशिब तुमची नक्की साथ देईल असे म्हणून रिझल्टकडे दुर्लक्ष करा. शिवाय कधी कधी प्रेगन्सी टेस्टचा रिझल्ट चुकीचा असण्याची शक्यता असल्यामुळे काही पुढील आठवड्यात मासिक पाळी न आल्यास पुन्हा एकदा टेस्ट करा. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर प्रेगन्सी कन्फर्म करण्यासाठी एखाद्या चांगल्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कधी कधी प्रेगन्सी टेस्ट किट चुकीचा रिझल्टदेखील दाखवू शकते. शिवाय मासिक पाळी उशीरा येण्याची अनेक कारणे असू शकतात. यासाठी असे असल्यास डॉक्टरकडे जावून तपासणी जरूर करा.

गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम देखील वाचा

After Pregnancy Care Tips In Marathi

क्लिनिकमध्ये करण्यात येणाऱ्या प्रेगन्सी टेस्ट

युरिन टेस्ट – आजाकाल क्लिनिकमध्येदेखील प्रथम प्रेगन्सी टेस्ट किटच्या मदतीने अथवा लॅब टेस्ट द्वारे युरिन टेस्ट केली जाते. युरिन टेस्ट लॅबमध्ये केल्यास अचूक परिणाम मिळू शकतो.

ब्लड टेस्ट – युरिन टेस्ट केल्यानंतर डॉक्टर तुमच्या रक्ताची तपासणी करतात. रक्त तपासणीद्वारे तुम्ही गरोदर आहात का हे अचूक समजू शकते.

अल्ट्रा साऊंड सोनोग्राफी – अल्ट्रा साऊंड सोनोग्राफीमुळे तुम्ही गरोदर आहात का हे कळणे अधिक सोपे जाते. कारण मासिक पाळीच्या चार आठवड्यानंतर सोनोग्राफीद्वारे तुमच्या पोटातील गर्भाचा आकार त्यात दिसून येतो. सातव्या आठवड्यानंतर बाळाचे ठोकेदेखील तुम्ही या माध्यमातून ऐकू शकता.

तुम्ही गरोदर आहात हे कन्फर्म झाल्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार इतर वैद्यकीय चाचण्या आणि औषधे सुरू करा. योग्य आहार आणि सकारात्मक विचार तुमच्या बाळाच्या वाढीसाठी पोषक असतात. यासाठी गर्भधारणेनंतर योग्य समूपदेशन घ्या.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा (How to get pregnant after thirty five)

प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत ‘हे’ ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स

आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून

Signs & Symptoms Of Pregnancy In Marathi

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From लाईफस्टाईल