‘सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली…’ सिनेमातील गाण्यामध्ये लग्न सोहळ्याचं केलेलं हे वर्णन हल्ली प्रत्यक्षात फारच क्वचित पाहायला मिळतं. दारात उभारलेला मांडव, त्यावर सजवलेली तोरणे, लग्न घर, पाहुण्यारावळ्यांची ये-जा, डेकवर लावलेली गाणी, इत्यादी…या सर्व गोष्टींची जागा बदलत्या जीवनशैलीनुसार आता नवनवीन कल्पना घेऊ लागल्या आहेत. आताच्या जमान्यात विवाहसोहळे मंगल कार्यालये, बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात पार पडत आहेत. या पलिकडे जाऊनही नवीन संकल्पनेनं जन्म घेतलाय ती म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’. बहुतांश जणांची इच्छा असूनही ‘डेस्टिनेश वेडिंग’ची योजना अंमलात आणणं शक्य नसते. कारण म्हणतात ना… लग्न हे केवळ दोन व्यक्तींपुरतंच मर्यादित नसते, तर हा सोहळा म्हणजे दोन कुटुंबांचं, त्यातील सदस्यांचंही मिलन असतं. ज्येष्ठ मंडळींचे शुभाशीर्वाद घेऊन आपल्या मुलांनी नवीन आयुष्याची सुरुवात करावी, हीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. यासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्यांची, पाहुण्यांची सोयी-सुविधा पाहून योग्य जागेची निवड केली जाते. हॉल किंवा बँक्वेट हॉल, मेन्यू, डेकोरेशन अन्य गोष्टींची निवड करताना पूर्वी आताच्या तुलनेत फार धावपळ होत असे. पण हल्ली सर्वच गोष्टी ऑनलाइन उपलब्ध झाल्यानं बराच त्रास कमी झाला. तरीही मान-अपमान, रुसवे-फुगवे सांभाळण्यात, हॉल-जेवण वगैरे-वगैरे पाहुण्यांना आवडलं आहे की नाही? अशा अनेक प्रश्नांमुळे लग्नकार्य पार पडेपर्यंत वधू-वर पक्षाची धाकधूक वाढतच असते.
Table of Contents
मुंबईतील 5 बेस्ट बँक्वेट हॉल (Top Banquet Halls in Mumbai)
तुमच्याही घरात लवकरच मंगलकार्य पार पडणार आहे का? तेही मुंबईत? तर मग अजिबात चिंता करू नका. कारण या शुभकार्यात तुम्हाला थोडासा हातभार लावण्याचं आम्ही ठरवलं. ते कसं??? मुंबईतील सर्वोत्तम आणि खिशाली परवडतील अशा बँक्वेट हॉलची माहिती केवळ तुमच्यासाठी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
1. द रॉयल हॉल (The Royal Hall)
मुंबईमध्ये ग्रँड लग्नसोहळा करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ‘द रॉयल हॉल’चा नक्की विचार करायला हवा. येथे 22,000 चौरस फुटांमध्ये पसरलेले दोन मोठे आलिशान हॉल तुमच्या सेवेसाठी सज्ज आहेत. 900 पाहुण्यांची उत्तम सोय येथे होऊ शकते. ग्रीन रूम, आलिशान आरामदायी रूमची सुविधा, स्वयंचलित अग्निसुरक्षा यंत्रणा आणि हाय-टेक ऑडिओ-व्हिज्युअल सिस्टम उपलब्ध आहेत. महत्त्वाचे येथे तुम्हाला केटरर्स आणि सजावटीचाही पर्याय उपलब्ध असल्यानं जास्त ताण घेण्याची आवश्यकता नाही. हा हॉल मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यानं पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल.
खाद्य प्रकार: शाकाहारी भोजन – प्रति थाळी 1,900 रुपयांपासून + टॅक्स
हॉलची क्षमता:
- क्राउन हॉल: बसण्याची क्षमता 300, उभे राहण्याची क्षमता 450
- द टियारा हॉल : बसण्याची क्षमता 300, उभे राहण्याची क्षमता 450
पत्ता: सी-गेट, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, पहिला मजला, लाला लाजपत राय मार्ग, वरळी मुंबई- 400018
वेळ: सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत
वाचा : पुण्यात करायचं असेल लग्न तर ‘हे’ बॅंक्वेट हॉल आहेत खास
2. हॉटेल टिप टॉप प्लाझा (Hotel Tip Top Plaza)
तुमच्यासाठी या हॉटेलमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 10 बँक्वेट हॉलचे पर्याय उपलब्ध आहेत. आवड आणि बजेटनुसार तुम्ही एखाद्या हॉलची निवड करू शकता. पाहुण्यांची उत्तम सोय राखली जाईल, अशा सोयीसुविधांनी हॉल्स सुसज्ज आहेत. साखरपुडा, संगीत पार्टी, मेहंदी, रिसेप्शन कोणत्याही कार्यक्रमासाठी हॉटेलकडून सजावटीची योग्य ती काळजी घेतली जाते. आपल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनाची व्यवस्था येथे उपलब्ध आहे.
खाद्य प्रकार: शाकाहारी भोजन – प्रति थाळी 700 रुपयांपासून + टॅक्स
बँक्वेट हॉलची नावे आणि क्षमता:
- हार्बर हॉल – बसण्याची क्षमता 400, उभे राहण्याची क्षमता 750
- हार्बर + ग्राउंड हॉल – बसण्याची क्षमता 800, उभे राहण्याची क्षमता 1500
- क्रिस्टल हॉल – बसण्याची क्षमता 700, उभे राहण्याची क्षमता 1200
- रीगल हॉल – बसण्याची क्षमता 350, उभे राहण्याची क्षमता 600
- लोटस हॉल – बसण्याची क्षमता 225, उभे राहण्याची क्षमता 500
- जेस्मिन हॉल – बसण्याची क्षमता 80, उभे राहण्याची क्षमता 125
- डॅफोडिल हॉल – बसण्याची क्षमता 100, उभे राहण्याची क्षमता 175
- जे4एफ हॉल – बसण्याची क्षमता 150, उभे राहण्याची क्षमता 225
- डायमंड हॉल – बसण्याची क्षमता 225, उभे राहण्याची क्षमता 300
- स्टुडिओ 99 हॉल – बसण्याची क्षमता 100, उभे राहण्याची क्षमता 175
बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी ही ठिकाण डोळ बंद करून निवडा.
पत्ता : एल.बी.एस रोड, चेक नाका, रहेजा गार्डन समोर,ठाणे पश्चिम मुंबई 400602
वेळ : सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत
वाचा : नववधूच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्यात या ’25’ वस्तू
3. शगुन बँक्वेट (Shagun Banquet)
स्टेटस रेस्टॉरंटमध्ये असलेल्या शगुन बँक्वेमध्ये एकूण पाच प्रशस्त हॉल आहेत. कोणतंही समारंभ करावयाचा असल्यास येथे तुम्हाला स्वतंत्र केटरिंग आणि डेकोरेटरची काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण हॉल बुकिंगमध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. भोजनाच्या बाबतही बरेच पर्याय त्यांना ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. उदा. शाकाहारी, मांसाहारी, उत्तर भारतीय, चायनिज, तंदुर आणि कॉन्टिनेंटल पाककृती. हा हॉल बुक केल्यानंतर पार्किंगचा टेन्शन अजिबात घेऊ नका.
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 700 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 800 रुपयांपासून + टॅक्स
उपलब्ध हॉल:
- स्कॅरलेट हॉल – बसण्याची क्षमता 200, उभे राहण्याची क्षमता 250
- सॅफरोन हॉल – बसण्याची क्षमता 40, उभे राहण्याची क्षमता 50
- सिल्व्हर हॉल – बसण्याची क्षमता 40, उभे राहण्याची क्षमता 50
- सॅफायर टेरेस – बसण्याची क्षमता 80, उभे राहण्याची क्षमता 100
पत्ता: स्टेटस रेस्टॉरंट अनॅक्स, पहिला मजला, टी.एच. कटारिया मार्ग, हिंदुजा हॉस्पिटलजवळ, माहिम 400016
वेळ: सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत
वाचा : मुंबईतील हे बेस्ट वेडिंग फोटोग्राफर्स तुम्हाला माहीत आहेत का
4. कृष्णा पॅलेस हॉटेल (Krishna Palace Hotel)
विशेष कार्यक्रमासाठी कृष्णा पॅलेस हॉटेल अतिशय उत्तम पर्याय आहे. हॉटेलमध्ये एकूण सात हॉल्सचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक हॉलमध्ये 50 ते 250 पाहुण्यांची बसण्याची क्षमता आहे. हॉटेलमध्ये एकूण 68 सुसज्ज आणि आरामदायी असे रूम आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाची देखील व्यवस्था आहे.
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 1,150 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 1,300 रुपयांपासून + टॅक्स
उपलब्ध हॉल आणि त्यांची क्षमता:
- रास – बसण्याची क्षमता 250, उभे राहण्याची क्षमता 600
- रागा – बसण्याची क्षमता 200, उभे राहण्याची क्षमता 450
- हवेली – बसण्याची क्षमता 150, उभे राहण्याची क्षमता 250
- हवेली 2 – बसण्याची क्षमता 150, उभे राहण्याची क्षमता 350
- हवेली 3 – बसण्याची क्षमता 100, उभे राहण्याची क्षमता 150
- हवेली 1+हवेली 2 – बसण्याची क्षमता 50, उभे राहण्याची क्षमता 100
- पत्ता – 96/98 स्लेटर रोड, नाना चौक,मुंबई 400007
5. द जेड गार्डन (Jade Garden Banquet)
‘द जेड गार्डन’ हा दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित बँक्वेट हॉल आहे. या बँक्वेट हॉलला सर्वाधिक मुंबईकरांनी पसंती दर्शवली आहे. वाढदिवस, किटी पार्टी, लग्नसोहळा यांसारख्या कार्यक्रमासाठी ‘द जेड गार्डन’ बँक्वेट हॉल अतिशय परफेक्ट आहे. येथे तुमच्यासाठी पाच सुंदर आणि प्रशस्त जागा उपलब्ध आहेत. पारंपरिक भारतीय मेनू ते कॉन्टिनेंटर कॉन्सेप्ट मेनू, शाकाहार, मांसाहार भोजनाचीही येथे सोय आहे. डेकोरेटर, केटरर्स, ओपन टेरेस, मल्टिपर्पज बँक्वेट हॉल, शाही पाहुणचार हे ‘द जेड गार्डन’ची खासियत आहे.
उपलब्ध जागा आणि क्षमता:
- जेड स्काय – बसण्याची क्षमता 700, उभे राहण्याची क्षमता 800
- जेड सी (Sea) – बसण्याची क्षमता 400, उभे राहण्याची क्षमता 500
- जेड बॉल रूम – बसण्याची क्षमता 500, उभे राहण्याची क्षमता 600
- जेड हॉल 1 – बसण्याची क्षमता 30, उभे राहण्याची क्षमता 50
- जेड हॉल 2 – बसण्याची क्षमता 80, उभे राहण्याची क्षमता 100
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 1,400 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 1,650 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: नेहरू सायन सेंटर, तिसरा मजला, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी 400018
वेळ: सकाळी 9 ते उशिरा रात्री 1 वाजेपर्यंत
वाचा – मुंबई मधील सर्वोत्तम रूफटॉप रेस्टॉरन्ट
मुंबईतील ‘10’ कमी बजेटमधील बॅंक्वेट हॉल (Affordable Banquet Halls In Mumbai In Marathi)
लग्नावर जास्तीचा खर्च करायचा नाही,या निर्णयावर बहुतांश जण ठाम असतात. त्यामुळे खिसा रिकामा होणार नाही आणि खर्चाचं ओझं डोक्यावर कायम राहणार नाही,असा वर्तमान-भविष्याचा विचार करून काही जण परवडणाऱ्या बँक्वेट हॉलची निवड करतात. जाणून घेऊया अशाच काही बँक्वेट्सची माहिती
1. इंद्रप्रस्थ (Indraprastha Hall Mulund)
इंद्रप्रस्थमध्ये दोन पार्टी हॉल उपलब्ध आहेत. यामध्ये जवळपास 150 ते 2000 पाहुण्यांच्या सोय उत्तमरित्या केली जाऊ शकते. कोणत्याही कार्यक्रमासाठी ‘इंद्रप्रस्थ’ हा आदर्श पर्याय आहे. केटरर्स आणि डेकोरेटर हे इंद्रप्रस्थचं वैशिष्ट्य आहे. कारण अगदी बजेटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध केल्या जातात.
उपलब्ध जागा आणि क्षमता:
- लॉन – बसण्याची क्षमता 800, उभे राहण्याची क्षमता 2000
- हॉल – बसण्याची क्षमता 450, उभे राहण्याची क्षमता 750
खाद्य प्रकार: शाकाहारी भोजन: प्रति थाळी 500 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: 26 बाळ राजेश्वर मार्ग, वैशाली नगर, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080
वेळ: सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत
2. एव्हरशाइन क्लब (Evershine Club)
लग्न सोहळा थाटामाटात करण्यासाठी कांदिवलीतील ‘एव्हरशाइन क्लब’ ही एक सुंदर जागा आहे. विविध कौटुंबिक सोहळ्यासाठी हा बँक्वेट हॉल तुम्ही निवडू शकता. येथे साजरा केलेला प्रत्येक सोहळा संस्मरणीय ठरेल, अशीच ही जागा आहे. शाकाहार, मांसाहार भोजन येथे उपलब्ध आहे.
हॉलची क्षमता: बसण्याची क्षमता 150, उभे राहण्याची क्षमता 200
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 475 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 575 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: एव्हरशाइन क्लब, ट्रिस्ना बसंत कमाउंड, एव्हशाइन ड्रिम पार्कसमोर, ठाकूर व्हिलेज. कांदिवली पूर्व 400101
वेळ: सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत
3. GMS बँक्वेट हॉल (GMS Banquet Hall)
अंधेरी पश्चिमेला असणाऱ्या GMS बँक्वेट हॉलमध्ये केटरिंग आणि डेकोरेशनची उत्तम काळजी घेतली जाते. अंधेरी परिसरातील कमी बजेटसाठी हा हॉल प्रसिद्ध आहे.
हॉलची क्षमता: 550
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 450 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 550 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: शितलादेवी कॉम्प्लेक्स, डी.एन.नगर, लिंक रोड. अंधेरी पश्चिम मुंबई 400059
वेळ: सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत
4. स्वेनस्का डिझाइन हॉटेल
अंधेरी पश्चिमेला असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये तुम्ही विवाह थाटल्यास तुमच्या सोहळ्याला चार चांद लागण्याशिवाय राहणार नाही. तशी काळजीच स्टाफकडून घेतली जाते. पाहुणेमंडळी येथील शाकाहारी आणि मासांहारी भोजनाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.
उपलब्ध जागा आणि क्षमता:
- मेरू – बसण्याची क्षमता 100, उभे राहण्याची क्षमता 150
- नेस्सा – बसण्याची क्षमता 100, उभे राहण्याची क्षमता 150
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 450 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 550 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: स्वेनस्का डिझाइन हॉटेल, सब टीव्ही रोड, शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम – 400053
वेळ: सकाळी 9 ते रात्री 12.30 वाजेपर्यंत
5. वनमाळी हॉल (Vanmali Hall)
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या पाहुणचारामुळे तुमची पाहुणीमंडळी नक्की खूश होतील. दक्षिण मुंबईतील अगदीच मध्यवर्ती ठिकाण असल्यानं पाहुण्याच्या प्रवासाच्या सोयीनं हा पर्याय बेस्ट असेल.
उपलब्ध जागा आणि क्षमता:
- बँक्वेट 1- बसण्याची क्षमता 200, उभे राहण्याची क्षमता 300
- बँक्वेट 2 – बसण्याची क्षमता 280, उभे राहण्याची क्षमता 450
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 350 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 450 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: प्लॉट क्रमांक 99 C, आरटीओ रोड, एसी मार्केटसमोर, ताडदेव मुंबई – 400034
वेळ: सकाळी 11.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत
6. सरस्वती बँक्वेट हॉल (Saraswati Banquet Hall)
माटुंगा पूर्वेला असणाऱ्या सरस्वती बँक्वेट हॉलची तुम्ही प्री वेडिंग,पोस्ट वेडिंग, लग्न सोहळा, वाढदिवस, कोकटेल पार्टी अन्य छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी निवड करू शकता. अतिशय सुंदर असलेल्या एसी हॉलमध्ये एक हजार पाहुण्यांची आरामात बडदास्त राखली जाऊ शकते. इथली खासियत म्हणजे शाकाहारी-मांसाहारी भोजन. पार्किंगचीदेखील उत्तम सोय आहे.
हॉलची क्षमता: बसण्याची क्षमता 600, उभे राहण्याची क्षमता 1000
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 350 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 450 रुपयांपासून + टॅक्स
पत्ता: जमनदास मेन्शन, लक्ष्मी नारायण लेन, कबुतर खानासमोर, माटुंगा पूर्व मुंबई 400019
वेळ: सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत
7. क्लब एमराल्ड (Club Emerald)
चेंबूरमध्ये एक एकरावर पसरलेला ‘क्लब एमराल्ड’ हा आलिशान बँक्वेट हॉलमध्ये विशेष असा बॉलरूमदेखील आहे. या क्लबमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स, फिटनेस आणि मनोरंजनाच्या सुविधादेखील मिळतील. पूल पार्टीसाठी या स्थळाचा पर्याय उत्तम आहे.
खाद्य प्रकार:
- शाकाहारी भोजन – प्रति थाळी 950 रुपयांपासून + टॅक्स
- मांसाहारी भोजन – प्रति थाळी 1050 रुपयांपासून + टॅक्स
हॉलची क्षमता: जास्तीत जास्त 1000 पाहुणे
पत्ता: 366/15 स्वस्तिक पार्क, सुश्रृत हॉस्पिटल आणि मंगल आनंद हॉस्पिटलच्या पुढे, चेंबूर 400071
वेळ: सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत
8. हॉटेल शांतीदूत (Hotel Shantidoot)
प्रभादेवी रेल्वे स्टेशनपासून केवळ 11 मिनिटांच्या अंतरावर हे हॉटेल आहे.येथून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर 2 किलोमीटर तर शिवाजी पार्क केवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. हॉटेलचं निराळ्या पद्धतीनं इंटिरिअर डेकोरेशन करण्यात आलं आहे. इथल्या सजावटीला रॉयल टच आहे.
खाद्य प्रकार : शाकाहारी भोजन – प्रति थाळी 350 रुपयांपासून + टॅक्स
हॉलची क्षमता: जास्तीत जास्त 500 पाहुणे
पत्ता: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, हिंदमाता कापड मार्केट, दादर पूर्व, मुंबई 400014
वेळ: सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत
9. राधा कृष्ण बँक्वेट (Radha Krishna Banquet)
कमीत कमी पाहुण्यांमध्ये मोठा सोहळा करण्याची इच्छा असल्यास बोरिवलीतील राधा कृष्ण बँक्वेट हॉलला नक्की भेट द्या. हॉटेल व्यवस्थापनाकडून बऱ्याच प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. जेवणाची चव, दर्जा आणि स्वच्छता यावर अधिक भर दिला जातो.
खाद्य प्रकार: शाकाहारी भोजन – प्रति थाळी 399 रुपयांपासून + टॅक्स
हॉलची क्षमता: जास्तीत जास्त 150 पाहुणे
पत्ता: सन प्लाझा, लोकमान्य टिळक रोड, ज्ञान नगर, म्हात्रे वाडी, बोरिवली पश्चिम मुंबई -400092
वेळ: सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत
10. ताराबाई हॉल (Tarabai Hall)
हॉलपासून काही अंतरावरच जर तुम्हाला शांत-सुंदर समुद्राचा व्ह्यू हवा असेल तर याची हॉलची नक्की निवड करा. हॉलमधील भव्यदिव्य सजावटीमुळे तुम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.
खाद्य प्रकार : शाकाहारी भोजन – प्रति थाळी 300 रुपयांपासून + टॅक्स
हॉलची क्षमता: जास्तीत जास्त 150 पाहुणे
पत्ता: शिव प्रसाद बिल्डिंग, मरिन लाइन्स रेल्वे स्टेशनजवळ, फ्लायओव्हरच्या खाली मुंबई 400020
वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, रविवार बंद
बँक्वेट हॉल निवड करण्यासंदर्भातील प्रश्न (FAQs)
1. बुकिंग करण्यापूर्वी आम्ही रूम आणि हॉलची पाहणी करू शकतो?
हो. बहुतांश एसी बँक्वेट हॉलमधील कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला जागेबद्दलची प्रत्यक्षात माहिती दिली जाते. जो हॉल तुम्ही पसंत केला आहे, संपर्क साधून तिथल्या मॅनेजरसोबत भेट निश्चित करा.
2. एसी हॉलची किती माणसांची क्षमता असते?
प्रत्येक बँक्वेट हॉलची क्षमता निरनिराळ असते. काही हॉलची 50 तर काही हॉलची 700+ माणसांची क्षमता असते.
3. मुंबईतील एसी बँक्वेट हॉलचे भाडे किती आहे?
माणसांची संख्या, उपलब्ध सोयीसुविधा आणि कार्यक्रमाचा कालावधी यावर हॉलचे भाडे अवलंबून असते. एसी हॉलचे एक दिवसाचे कमीत कमी भाडे 10,000 ते जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत असते.
4. बँक्वेट हॉलमध्ये सजावटीसाठी स्वतःचे साहित्य वापरू शकतो किंवा हॉलकडून डेकोरेटर्स दिले जातात का?
तुमच्या कार्यक्रमानुसार बहुतांश एसी बँक्वेट हॉलकडून सजावट केली जाते. तर काही बँक्वेट हॉलकडून तुम्हाला तुमचं सजावटीचे साहित्य वापरण्याची परवानगी दिली देखील जाते.
फोटो सौजन्य : जस्ट डायल
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.
Read More From Planning
उन्हाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी निवडा ही थंड हवेची ठिकाणं
Trupti Paradkar