फॅशन

फेस्टिव्ह सीझनसाठी ट्राय करा जान्हवी कपूरचे हे देसी लुक

Trupti Paradkar  |  Nov 9, 2020
फेस्टिव्ह सीझनसाठी ट्राय करा जान्हवी कपूरचे हे देसी लुक

दिवाळीची तयारी सगळीकडे जोरदार सुरू झाली आहे. लग्नकार्यांनादेखील पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे. अशा सीझनमध्ये तुमच्या कडे काही एथनिक ड्रेस लुक असालाच हवेत. त्यामुळे सणसमारंभांना आणि लग्नकार्यात तुम्ही सर्वात हटके आणि उठून दिसाल. यंदा दिवाळी पहाटसाठी सार्वजनिक ठिकाणी भेटता येणार नसलं तरी घरी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सण नक्कीच साजरा करता येऊ शकतो. शिवाय व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रमंडळी यांना नक्कीच भेटता येणार. मग असं  व्हर्च्युअर गेट टुगेदर खास करण्यासाठी तुम्ही दिवाळीसाठी हे जान्हवी कपूरचे देसी लुक नक्कीच ट्राय करू  शकता. 

ग्रे आणि सिल्व्हर प्रिंटेट वनपीस –

यंदा दिवाळीत फार ब्राईट अथवा गडद रंग नको असतील तर जान्हवी प्रमाणे एखाद्या ग्रेस, गोल्डन, सिल्व्हर अथवा पेस्टल रंगाच्या वनपीसची निवड करा. या वनपीसवरील आकर्षक प्रिंटमुळे या वनपीसची शोभा अधिक वाढली आहे.  मात्र लक्षात ठेवा असे पायघोळ वनपीस  घातल्यावर त्यावर हिल्स कॅरी करणं मस्ट आहे. तरंच तुम्ही उंच आणि आकर्षक दिसाल.

Instagram

रेड लव्ह –

दिवाळीचा सण म्हटला की बोल्ड आणि सुंदर दिसणं हे आलंच. जर तुम्ही लाल रंगाच्या चाहत्या असाल तर सणासुदीसाठी अशी लाल रंगाची डिझाईनर साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. ज्यामधून तुमचा देसी  आणि बोल्ड लुक चांगलाच उठून दिसेल. यंदा दिवाळी पाडव्यासाठी पांरपरिक साडी नेसायची नसेल तर अशी लाल रंगाची डिझाइनर साडी निवडा. ज्यामुळे तुमच्या पतीदेवाची नजर तुमच्यावरून मुळीच हलणार नाही. 

Instagram

गोल्डन लेंग्याने आणि चेहऱ्यावर ग्लो –

गोल्डन रंग कोणत्याही सणाला अथवा लग्नसमारंभात सुंदरच दिसतो. जान्हवी कपूरने परिधान केलेला हा गोल्डन कलरचा लेंगा तिच्या मुळ सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. मागच्या वर्षी दिवाळीत जान्हवीने हा लुक केला होता. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी तुम्ही देखील लेंगा ट्राय करायचा विचार करत असाल तर जान्हवीप्रमाणे या गोल्डन रंगाची निवड करा. तुम्ही लेंगा कसा कॅरी करता यावर तुमचा लुक ठरेल त्यामुळे फोटोसेशनसाठी  या पोझ ट्राय करायला काय हरकत आहे नाही का ?

Instagram

गुलाबी रंगाची बातच न्यारी

प्रत्येक मुलीकडे गुलाबी रंगाच्या कपड्यांचे एक खास कलेक्शन असते. कितीही पिंक कलरच्या साड्या अथवा ड्रेस असला तरी अजून एक तिला नक्कीच हवा असतो. असा माझा नाही पण जगातील साऱ्या मुलींचा अनुभव आहे. तुम्ही पण अशा पिंक कलरच्या खास चाहत्या असाल तर यंदा दिवाळीत जान्हवी कपूर प्रमाणे ही पिंक कलरची साडी ट्राय करा. सिंपल शिफॉन साडी आणि डिझाईनर बॉर्डर असूनही आकर्षक ब्लाऊजमुळे या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. 

Instagram

शिमर लुक लव्हेंडर साडी –

पुन्हा एकदा तुम्हाला पारंपरिक आणि नेहमीच्या गडद रंगापेक्षा काहीतरी वेगळा लुक करायचा असेल तर दिवाळी पार्टीसाठी हा लुक ट्राय करा. पार्टीमध्ये असे शिमर आणि चमकदार कपडे उठून दिसतात. शिवाय ही डिझायनर आणि वर्क केलेली लव्हेंडर रंगातील साडी तुम्हाला एक फ्रेश आणि आकर्षक लुक देऊ शकते. तेव्हा यंदा या रंगाचा  जरूर विचार करा. 

Instagram

बांधणी वर्क साडी

जान्हवीने घातलेली ही बांधणी साडी डिझायनर असल्यामुळे ती नेहमीप्रमाणे पारंपरिक आणि सिंपल लुकची वाटत नाही. या साडीवर काठाजवाळ सुंदर जरदोसी वर्क करण्यात आलं आहे. शिवाय हिरव्या रंगसंगतीला मिळता जुळता वेलवेट मटेरिअलचा  ब्लाऊज आणि  गळ्यातील सुंदर नेकपीसमुळे हा लुक उठावदार झाला आहे. यंदा दिवाळीत तुमच्याकडे असलेल्या एखाद्या बांधणीसाडीचा असा वापर करून तुम्ही एक परफेक्ट फेस्टिव्ह लुक तयार करू शकता. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लग्नाची साडी अथवा लेहंग्याची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल

सेलिब्रिटींची पसंती ठरतेय महाराष्ट्रीयन खणाची साडी

Read More From फॅशन