बॉलीवूड

कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ

Harshada Shirsekar  |  Dec 2, 2019
कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ

सोशल मीडियामुळे कोणाला कधी, केव्हा, कशी आणि किती प्रसिद्धी मिळेल…याचा काहीच नेम नाही. हल्ली सोशल मीडियावर कित्येक व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होत आहेत. केवळ व्हायरलच नाही तर त्यांना प्रचंड हिट्सदेखील मिळतात. याचं सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे राणू मंडल. पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गाव गाऊन पोटाची खळगी भरणाऱ्या राणू मंडल (Ranu Mandal) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यांचं नशीबच बदललं. राणू मंडल यांनी गानकोकिळ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची गाणी गाऊन लाखो लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केलं. सोशल मीडियावर झळकलेल्या राणू यांनी गायक/संगीतकार हिमेश रेशमियानं मोठी संधी दिली. देशाच्या कानाकोपऱ्यात आज राणू मंडल यांचं नाव पोहोचलं आहे. 

(वाचा : शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग)

राणू मंडलनंतर आता एका चिमुकलीनं लतादीदींच्या गाण्याचा सूर छेडला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही चिमुकली केवळ दोन वर्षांची आहे. ही दोन वर्षांची गोंडस तान्हुली लता मंगेशकर यांचं एव्हरग्रीन गाणं ‘लग जा गले’ सुरात गातेय. या चिमुकलीचं नाव प्रज्ञा मेधा असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, 1964मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वो कौन थी’ सिनेमातील हे गाणं आहे. अभिनेत्री साधना यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.   

राणू मंडल झाल्या स्टार

राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या राणू मंडल यांचं नशीब पालटल्यानंतर त्या रातोरात स्टार झाल्या होत्या. राणू यांच्या मधुर आवाजाने अनेकांवर जादूच केली होती. रेल्वे स्टेशनवर गात असताना काहींनी फक्त तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्या हातावर पैसे ठेवले. मात्र एतींद्र चक्रवर्तीने गाणाऱ्या राणूंना पाहताच त्यांचा गाण्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यावेळी राणूंनी लता मंगेशकरांचे ‘एक प्यार का नगमा’ गाणं गायलं. एतींद्रने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की यामुळे राणूंचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. राणूसाठी खुद्द सलीम खान यांनी हिमेश रेशमियाकडे शिफारस केली. यानंतर हिशेम रेशमियानं त्याचा सिनेमा ‘हॅप्पी हर्डी और हीर’ मध्ये राणू यांना गाण्याची संधी दिली.  दरम्यान, गेल्या काही दिवसांत राणू काही चुकीच्या कारणांमुळे विवादात अडकत आहेत. नुकतंच एका कार्यक्रमात व्यासपीठावर राणू यांना त्यांचं गाण गाण्यास सांगितलं तेव्हा त्या गाणंच विसरल्या. 

(वाचा : VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)

राणू मंडलची परिस्थिती अशी नव्हती

राणू मंडलने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगताना म्हटले की, ‘माझे बालपण चांगलं होतं. मी चांगल्या घरात जन्मले. पण नशिबात वाईट दिवस होते. मी सहा महिन्यांची असताना माझे आईवडिलांचे निधन झाले. यानंतर माझ्या आजीनेच माझा सांभाळ केला. डोक्यावर छप्पर होतं. पण परिस्थिती तशी बेताचीच होती. आजीने लहानचं मोठं केलं. लहानपणीच मला गाण्यांची आवड असल्यामुळे मी गुणगुणत असायचे. लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी गायला मला आवडायचे. गाणी आणि गायनावर माझं विशेष प्रेम होतं, अशी माहिती राणू यांनी दिली.

(वाचा : सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From बॉलीवूड