DIY सौंदर्य

वेणीचे प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक आकर्षक (Types Of Braid Hairstyles In Marathi)

Dipali Naphade  |  Mar 10, 2020
वेणीचे प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक आकर्षक (Types Of Braid Hairstyles In Marathi)

रोज केसांची नक्की काय स्टाईल करायची असा प्रश्न नक्कीच मोठे केस असणाऱ्या महिलांना सतावत असतो. रोज एकाच तऱ्हेची वेणी घालूनही कंटाळा येतो. वेणीचे प्रकार अनेक असतात. केसांची हेअर स्टाईल नक्की कशी करायची असाही प्रश्न पडतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेणी कशी घालायची, वेणीचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. वेणीचे प्रकार सगळ्यांनाच माहीत असतात पण त्याची स्टाईल नक्की कशी करायची हे मात्र माहीत नसतं. खजूर वेणी, केसांच्या वेण्या, सागर वेणी हेअर स्टाईल, पिंजरा वेणी, सागर वेणी, चार पदरी वेणी असे अनेक प्रकार आहेत. केसांची वेणी कशी घालायची हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. चार पदरी वेणी कशी घालायची, सागर वेणी कशी घालायची, खजूर वेणी कशी घालायची या स्टाईल्स आम्ही तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप (Step by Step) इथे सांगणार आहोत. जेणेकरून वेणीची हेअर स्टाईल करताना तुम्हाला त्रास होणार नाही. वेणीचे प्रकार तुम्हाला अधिक स्पष्टपणे कळू शकतील. वेणी कशी घालायची याचीही माहिती मिळू शकेल. वेणीचे कसे आणि कोणते प्रकार आहेत आणि ती वेणी कशी घालायची हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत. तुम्हीही वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाताना अशी केसांची हेअर स्टाईल करून जाऊ शकाल आणि तुम्हालाही नेहमी वेगवेगळ्या स्टाईलच्या हेअर स्टाईल्समुळे छान वाटेल. आपण पाहूया वेणीचे प्रकार (types of braid hairstyles in marathi):

साधी वेणी (Simple Braid)

Shutterstock

अगदी काही दिवसांपूर्वी केवळ लांबसडक केस नीट बांधता यावेत यासाठी बांधली जाणारी सरळ वेणी आता ‘ब्रेडिंग’ या गोंडस नावाने थेट रँपवरून रेड कारपेटवर अवतरली आहे.  वेणी बांधणं हा अत्यंत सोयीचा पर्याय आहे. सोप्या पद्धतीने ही बांधली जाते आणि केसांचा गुंताही होत नाही हे मुळात वेणी बांधण्याचं कारण आहे. पण आता ही एक फॅशनही झाली आहे. तुम्ही अगदी साडी, कुरती यावर साधी वेणी घालून जाऊ शकता. तुम्हाला हेअर स्टाईल करायला जास्त वेळ लागत नाही आणि ही वेणी पटकन बांधून होते. 

कशी बांधावी:

केसांचे तीन भाग करून उजव्या बाजूचे केस डाव्या बाजूच्या केसाच्या वर घ्यावे मग पुन्हा मध्ये असलेली केसांची बट तुम्ही त्यावर घ्यावी असे करत करत वेणी बांधता येते. ही वेणी बांधणं अतिशय सोपं असून तुम्ही यामध्ये लहानसे मणी जरी ठेवलेत तरी कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठीही तुम्ही तयार दिसू शकता. यामध्ये तुमचा जास्त वेळ जात नाही. 

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतःसाठी करा सोप्या पद्धतीने हेअर स्टाईल्स

सागर वेणी (French Braid)

Shutterstock

फ्रेंच ब्रेडिंग ही जास्तीत जास्त एखादा खेळ खेळताना बांधली जाते.  त्याचं कारण असं आहे की, फ्रेंच ब्रेडिंगमध्ये वेणीतील केस हे सहसा सुटत नाहीत. तसंच तेल, जेल लावून जी वेणी चापूनचोपून बांधली जाते ती छानच दिसते. त्यामुळे मैदानी खेळ खेळताना अथवा डान्स, व्यायामादरम्यान तुम्ही अशी वेणी बांधू शकता. फ्रेंच ब्रेडिंगची पद्धतही तीन  पदरी वेणीसारखीच असते. सागर वेणी अर्थात फ्रेंच ब्रेडिंग नेहमीच दिसायला आकर्षक दिसते. 

कशी बांधावी:

फ्रेंच ब्रेडिंग अर्थात सागर वेणी ही तीन पदरी वेणीसारखीच बांधली जाते मात्र याची सुरूवात ही डोक्याच्या वरच्या बाजूपासून सुरू होते. दोन वेण्याच्या पद्धतीने जर ही फ्रेंच ब्रेडिंग बांधली तर त्याला बॉक्सर ब्रेडिंग असं म्हटलं जाते. ही बांधायला आणि सोडायलाही सोपी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही. 

मिल्कमेड ब्रेडिंग (Milkmaid Braid)

Instagram

एखाद्या क्वीनसारखा मुकुट डोक्यावर असेल तर कोणाला आवडणार नाही. मिल्कमेड ब्रेडिंग हा असाच एक वेणीचा प्रकार आहे. मिल्कमेड ब्रेडिंग करून तुम्ही विविध कार्यक्रमांना जाऊ शकता. ही वेणी घालणं अतिशय सोपं आहे. खरं तर कोणतीही वेणी ही सोपीच असते फक्त त्याचं टेक्निक योग्य तऱ्हेने यायला हवं. 

कशी बांधावी: 

सर्वात पहिले नेहमीप्रमाणे दोन वेण्या दोन बाजूला बांधून घ्या. त्यानंतर एखाद्या मुकुटाप्रमाणे वेण्या डोक्याच्या वरच्या बाजूला एकमेकांमध्ये गुंतवून टाका. या खोवलेल्या वेण्यांमध्ये तुम्ही फुलं, टिकल्या, मणी, स्टड्स काहीही लावू शकता आणि त्या वेणीला उठाव आणू शकता. तुम्ही या वेणीमध्ये वेगवेगळी फुलं खोवलीत आणि जर एखाद्या कार्यक्रमामध्ये लेहंगा घातलात तर तुम्ही राजकुमारीसारख्या लुक आणू शकता. ही वेणी घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच राजकुमारीसारखा लुक येईल. 

पावसाळ्यात केसांच्या करा या झटपट हेअरस्टाईल आणि दिसा trendy

फिशटेल अर्थात खजूर वेणी (Fishtail Braid)

Shutterstock

फिशटेल हा वेणीचा प्रकार तर बऱ्याच जणांना  आवडतो. अशा वेणीमध्ये केसांचे चार भाग हे गुंतलेले असतात. ही वेणी लांब बांधून याचा जो शेवटचा भाग आहे तो अगदी थोडासा ठेवला जातो.  ही वेणी बांधून झाल्यानंतर माशाच्या शेपटीसारखीच दिसते म्हणूनच याचे नाव फिशटेल असे ठेवण्यात आले आहे. फिशटेल अर्थात खजूर वेणी. खजूर वेणी आपण बऱ्याच कार्यक्रमांनाही घालतो.

कशी बांधावी:

फिशटेल बांधताना पोनीटेल बांधून केसांचे दोन भाग करा. उजव्या भागामधून साधारण अर्धा इंच केसांची बट घ्या आणि ती डाव्या बाजूच्या केसांच्या बटमध्ये व्यवस्थित गुंफून घ्या. त्यानंतर डाव्या बाजूची बट घेऊन ती पुन्हा उजव्या बाजूला गुंफा. वेणीच्या शेवटच्या टोकापर्यंत हे करत राहा. फिशटेल ब्रेडिंग करताना केसांना अधिक फुगीरपणा येत जातो.  त्यामुळे केस तुमचे अधिक घनदाट नसले तरीही ही वेणी बांधता येऊ शकते. विशेषतः तुम्ही जर केसांंचे साईड पार्टिशन केले तर ही फिशटेल अधिक आकर्षक दिसते. तुम्ही जीन्स अथवा वेस्टर्न कपड्यांवरही ही हेअर स्टाईल नक्की करू शकता. फिशटेल अर्थात खजूर वेणी आपण कधीही घालू शकतो.

कर्ल ब्रेडिंग (Curl Braid)

Shutterstock

कुरळ्या केसांची वेणी घालताना नेहमीच अडचण जाणवते. पण कुरळे केस असतील तरीही त्यावर वेणी खूपच शोभून दिसते. कर्ल ब्रेडिंग तुम्ही कधीही घालू शकता. त्यामध्ये  तुम्ही वेगळी हेअर स्टाईल करून आपल्या चेहऱ्याला अधिक शोभा आणू शकता. 

कशी बांधावी:

तुम्ही दोन बाजूंनी छोट्या छोट्या वेण्या घालत याव्या आणि त्यांना खाली रबर लावावे. कर्ल ब्रेडिंग ही सहसा आफ्रिकन महिलांमध्ये जास्त पाहायला मिळते. 

नैसर्गिकरित्या केसांना कर्ल कसे कराल (How To Curl Hair Naturally)

व्हॉल्युमेट्रिक ब्रेडिंग (Volumetric Braid)

Shutterstock

ज्या मुलींचे केस दाट नसतात त्यांनी ही वेणी घालावी. त्यामुळे केस दाट दिसतात. ही वेणी घालताना मुळात केस फुगतील अशा तऱ्हेने ती गुंफायची असते. त्यामुळे ही वेणी घालताना नाजूक हाताने घालावी लागते. यामध्ये कोणत्याही प्रकारे घाई करून चालत नाही. 

कशी बांधावी:

ही वेणी बांधताना पहिले तुम्ही केसांचे नीट भाग करून घ्यावे आणि त्यानंतर ती वेणी गुंफावी. तुम्ही जितके जास्त भाग करून एकमेकांमध्ये गुंफाल तितका त्याचा व्हॉल्युम मोठा दिसतो आणि भाग फुगीर होतो. त्यामुळे तुमचे केस विरळ असतील तर तुमचे केस अधिक दाट दिसण्यासाठी मदत होते

रशियन वेणी (Russian Braid)

Instagram

रशियन वेणी ही अतिशय सोपी स्टाईल आहे. यासाठी केस नीट व्यवस्थित विंंचरून घ्या. ही वेणी घालणं अतिशय सोपं आहे आणि ही हेअर स्टाईल फुलं गुंफल्यानंतर अधिक सुंदर दिसते.

कशी बांधावी:

केस नीट विंचरून एकत्र करून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याचे तीन समान भाग करा.  आपल्या नेहमीच्या वेणीसारखीच घालायची फक्त याचे तीनही भाग एकमेकांमध्ये घट्ट गुंफायला हवेत. तसेच वरच्या भागावर तुम्ही आंबाडा बांधून त्यातून ही वेणी घालायची आहे.  खालचा भाग जास्त न ठेवता तुम्ही रबर लावू शकता. 

झोपण्यापूर्वी अशी घ्या केसांची काळजी

पिगटेल (Pigtail)

Instagram

पिगटेल वेणी ही अतिशय सोपी आहे. डोक्याच्या वरच्या बाजूला सगळे कर्ल गोळा करून नंतर ही वेणी बांधली जाते. ही बांधणंं अतिशय सोपी आहे. कारण यामध्ये केसांचे केवळ दोन समान भाग करून ते वळवायचे असतात. त्यामुळे ही बांधताना कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये गुंता होत नाही. 

कशी बांधावी:

ही बांधताना तुम्हाला केसांचे दोन समान भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूंनी वेणी घालायची आणि या दोन्ही वेण्या बांधून झाल्यानंतर पुन्हा त्या एकत्र करून त्यांची एक वेणी करायची आहे. यामुळे केस अधिक घनदाट दिसतात  आणि विरळ दिसत नाहीत. 

चार पदरी वेणी (4 Strand Braid)

Shutterstock

चार पदरी वेणी ही उत्तम हेअर स्टाईल आहे. कोणत्याही कार्यक्रमांना ही वेणी घालून गेले आणि त्यामध्ये मधल्या भागात फुलं अथवा स्टड्स घातले तर तुमची ही हेअर स्टाईल खूपच आकर्षक दिसते. अशाच पद्धतीने तुम्हाला वेस्टर्नवेअरसाठी युनिक हेअरस्टाईल देखील करता येऊ शकतात.

कशी बांधावी:

सुरूवातीला मधले केस घेऊन त्याची तिहेरी वेणी घालायला सुरूवात करावी. त्यानंतर त्यामध्ये पहिले उजव्या बाजूची बट गुंफावी मग पुन्हा डाव्या बाजूची बट घेऊन गुंफावी. असे बाजूची केसांची बट घेत घेत वेणी पूर्ण करावी. ही चार पदरी वेणी दिसायला खूपच सुंदर दिसते. ज्यांचे केस लांबसडक आहेत त्यांना तर अतिशय सुंदर दिसते आणि त्यांना ही हेअर स्टाईल करणं सोपंही होईल. ही सागर वेणीसारखीच असते पण या दोन्ही वेण्या एकत्र करून चार पदरी वेणी केली जाते. 

रोप ट्विस्टेड वेणी (Rope Twisted Braid)

Shutterstock

कोणत्याही वेस्टर्न कपड्यांवर तुम्ही अशा प्रकारची रोप ट्विस्टेट हेअर स्टाईल करून मस्त दिसू शकता. ही बांधणंही अतिशय सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही पार्लरच्या  फेऱ्या माराव्या लागत नाहीत आणि त्याशिवाय जास्त वेळही लागत नाही. 

कशी बांधावी:

केस दोन समान भागामध्ये  विभागून घ्या. त्यानंतर दोन्ही स्ट्रँड एकमेकांमध्ये गुंफायला सुरूवात करा. एक मजबूत दोरखंडासारखा आकार येईपर्यंत तुम्ही या वेणीला आकार द्या आणि खाली रबर लावा. वेणी सुरूवात करायच्या आधी केसांचा पोनीटेल नीट बांधून घ्या आणि त्यानंतरच ही वेणी घालायला सुरूवात करा. वेणी बांधून झाल्यानंतर पुन्हा खाली रबर लावा. 

पुल थ्रू ब्रेडिंग (Pull Through Braid)

Shutterstock

ही हेअर स्टाईल आणि वेणी बांधणं हे थोडं कठीण काम आहे. कारण यासाठी तुम्हाला नक्कीच प्रशिक्षणाची गरज भासेल. त्याशिवाय तुम्हाला या हेअर स्टाईलमध्ये एक्स्टेंशनही लागते. त्यामुळे तुम्हाला जर काही वेगळी आणि विशिष्ट प्रकारची वेणी बांधायची असेल तर तुम्ही नक्की ही वेणी बांधा. 

कशी बांधावी:

समोरचे केस मागे घेऊन एक पोनी बांधावा. त्याखाली एक्स्टेंशन लावावे. मग ते वर घ्यावे. पुन्हा एक पोनी बांधून त्याखाली एक्स्टेंशन लावावे. त्यानंतर वरचा पोनी सोडून तो खाली घ्यावा आणि त्याचे दोन भाग करावे. पुन्हा असेच साधारण चार ते पाच लेअर्स करावे. एकात  एक असे हे केस गुंतले जातात आणि वेणी घातली जाते. पण ही वेणी घालणं तसं कठीण आहे. त्यासाठी सराव करावा लागेल. 

वॉटरफॉल वेणी (Simple Waterfall Braid)

Shutterstock

हा वेणीचा प्रकार सागरवेणी प्रमाणेच जास्त प्रचलित आहे. ही वेणी दिसायला अतिशय आकर्षक दिसते.  केस लांब असो वा अगदी खांद्यापर्यंत ही वेणी कोणालाही सुंदरच दिसते. ही वेणी बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. 

कशी बांधावी:

ही वेणी बांधताना नेहमी आपला भांग एका बाजूला आहे की नाही हे पाहावं. वेणी बांधताना केस हे तिरप्या रेषेतच घ्यावेत. जेणेकरून वेणी बांधल्यानंतर ते पाहताना वरून धबधब्याचे पाणी पडताना दिसते तसे दिसावेत. ही तिरपी वेणीच घालावी. त्याच्या बटा या अगदी लहान लहान घेऊन त्या तिरफ्या बांधाव्यात.

पिंजरा वेणी (Cage Braid Hairstyle)

Shutterstock

हा एक युनिक वेणीचा प्रकार आहे. बऱ्याच जणांना ही स्टाईल माहीत नाही. पण ही नवी स्टाईल आता बऱ्याच फंक्शनमध्ये वापरण्यात येऊ लागली आहे. पण ही वेणी इतर वेणींसारखी सोपी नक्कीच नाही.  त्यामुळे याचा जास्त वापर करण्यात येत नाही. ही वेणी घालण्यासाठी पाच मिनिट्स लागतात फक्त त्याचे टेक्निक यायला हवे. 

कशी बांधावी:

वेणीला सुरूवात करण्यापूर्वी तुम्ही एक पोनीटेल बांधून घ्या. पोनीटेलचा वरचा भाग घेऊन वेणी बांधा. त्यानंतर फ्रेंच ब्रेडिंगप्रमाणेच तुम्ही बाजूचे केस घेऊन त्या वेणीमध्ये गुंफत जा. वेणी पूर्ण घालून झाल्यावर ती पोनीच्या वरच्या  बाजूला घ्या आणि बॉबी पिनने ते केस पिनअप करा. तुम्हाला याचा आकार पिंजऱ्यासारखा दिसतो. 

 

वेणीची काळजी घेऊन ती कशी कॅरी कराल (How To Take Care Of Braids)

वेणीची तशी तर जास्त काळजी घ्यावी लागत नाही. फक्त ती जास्त घट्ट बांधून ठेवू नका. अन्यथा केस तुटण्याचा धोका असतो. वेणी कॅरी करण्याची पण एक पद्धत असते. तुम्ही कोणती वेणी घातली आणि ती कोणत्या ड्रेससह कॅरी करायची हे माहीत असायला हवे. अन्यथा तुमची फॅशन तुमच्या ड्रेसला मॅच करत नाही. त्यामुळे वेणी कॅरी कशी करायची हेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचीही माहिती आपल्याला असायला हवी. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From DIY सौंदर्य