सध्याच्या धावपळीच्या जगण्यात मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत हे वरचेवर ऐकायला मिळणारे विषय झाले आहेत. पण मानसिक आजार म्हणजे नक्की काय आणि हा आजार का आणि कसा होतो. हा आजार आपल्याला झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं याबद्दल अजूनही जागरूकता नाही. बरेच लोक आपल्याला मानसिक आजार आहे हे स्वीकारायलाच तयार होत नाहीत. पण खरं तर मानसिक आजार हा असा आजार आहे जो तुम्ही वेळेवर स्वीकारलात तर तुम्ही त्यावर उपचार करून तुमचं पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या रितीने जगू शकाल. अगदी तुम्ही बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीजच पाहिलंत तरी बरेच सेलिब्रिटी या गोष्टीसाठी पुढे येत आहेत. दीपिका पादुकोणसारख्या अभिनेत्रीनेही याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. ती स्वतः या आजारातून बाहेर आली आहे. पण याबद्दल बोलून त्यावर पाऊल उचलणं हाच एक योग्य तोडगा आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशी लक्षणं दिसत असतील आणि तुमच्यामध्ये काही बदल लोकांनाही जाणवत असतील तर तुम्ही वेळेवर स्वतःकडे लक्ष द्यायला हवं.
Table of Contents
- मानसिक आजार म्हणजे काय (What Is Mental Illness In Marathi)
- मानसिक आजार लक्षणे (Mansik Aajar Lakshan)
- मानसिक आजाराचे प्रकार (Types Of Mental Illness In Marathi)
- हे महत्त्वाचे प्रकार असून मानसिक आजाराने अन्यही काही प्रकार आहेत –
- मानसिक आजारावर घरगुती उपाय (Home Remedies For Mental Illness In Marathi)
- मासिक आजारातून बाहेर काढण्यासाठी संस्था (Mental Health Foundation In Marathi)
मानसिक आजार म्हणजे काय (What Is Mental Illness In Marathi)
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आजार नक्की काय असतो? मेंदूचं काम जेव्हा बिघडतं तेव्हा भावनिक आणि बौद्धिक पातळीवर परिणाम होत असतो. या परिणामालाच मानसिक आजार असं म्हटलं जातं. मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांमुळे मानसिक आजार होतो. सहसा हे सुरुवातीला दिसून येत नाही. पण त्यासाठी मेंदूचं काम दर्शवण्यासाठी आणि रक्तपुरवठा दाखवणाऱ्या आणि पेशींमध्ये विशिष्ट बदल असणाऱ्या तपासण्या कराव्या लागतात. आजाराचं कारण कळतं कशावरून ते म्हणजे लक्षणांवरूनच. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा याची नक्की लक्षणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे.
वाचा – तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही
मानसिक आजार लक्षणे (Mansik Aajar Lakshan)
मानसिक आजार आपल्याला आहे किंवा अन्य कोणालाही हा आजार असल्याची शक्यता आहे हे सांगण्यासाठी काही लक्षणं दिसून येतात. त्यापैकी काय महत्त्वाची लक्षणं आहेत ते जाणून घेऊ –
- अचानक रडू येणं
- दुखः वाटणं अथवा रिकामेपणाची भावना सतत वाटणं
- झोप न लागणं अथवा अधिक झोप लावणं
- सतत थकल्यासारखं वाटणं
- पचन नीट न होणं
- आत्महत्येचे सतत विचार येणं
- आशावादाचा अभाव
- सतत अस्वस्थता वाटणं
- एकलकोंडेपणा
मानसिक आजाराचे प्रकार (Types Of Mental Illness In Marathi)
मानसिक आजाराचेही अनेक प्रकार आहेत. खरं तर मानसिक आजार उद्भवण्याची कारणं अनेक असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ती निरनिराळी असतात. पण मानसिक आजाराचेही प्रकार असतात. ते आपण जाणून घेऊ. नक्की या प्रकारांमध्ये काय काय घडतं हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया नक्की मानसिक आजार कोणते –
1. अस्वस्थता
अस्वस्थता अर्थात डिप्रेशन हा शब्द नेहमीच आपल्या कानावर येत असतो. पण नक्की डिप्रेशन येणं म्हणजे काय याची चर्चा मात्र होत नाही. तर सतत करिअर, पैसा आणि जीवनातील आपली परिस्थिती याबद्दल विचार करत राहणं, निद्रानाश होणं, सतत डोकं दुखत राहणं, चक्कर येणं अशी लक्षणं सतत दिसायला लागल्यावर तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. बऱ्याचदा अतिविचाराने हा आजार उद्भवतो. पण त्यावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे व्यवस्थित झोप येणं. कारण जितका जास्त विचार करून तितकी तुमची झोप उडते आणि त्यामुळे डोकेदुखी आणि अंगदुखी उद्भवते त्यामुळे ही एक साखळीच आहे. यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की काय विचार करत आहात हे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. मग ती कोणीतही तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती हवी. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील ताण आणि असह्य होणाऱ्या गोष्टी नेहमीच बाहेर काढून टाकणं गरेजचं आहे. तर तुम्ही या मानसिक आजारातून बरे होऊ शकता अन्यथा तुम्ही अधिकाधिक यामध्ये गुंतत जाऊन स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ शकता. वेळेवर आपल्याला नक्की काय होत आहे याचा अंदाज घेत डॉक्टरांची अथवा आपल्या जवळच्या माणसांची मदत घेण्याची गरज आहे.
2. स्क्रिझोफ्रेनिया
स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणं ही व्यक्तीनुसार बदलतात. किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. किशोरवयीन मुलांमध्ये झोप कमी येणं, अभ्यासातील गती मंदावणं, उत्साह नसणं आणि एकलकोंडेपणा वाढणं ही लक्षणं असून प्रौढ व्यक्तींमध्ये हेल्युसिनेशन (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणं), विश्वास न ठेवणं, अपूर्ण संवाद, रागाचे झटके, समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न ही सगळी लक्षणं दिसतात. या सगळ्या गोष्टी अतिताणामुळे सुचायला लागतात. त्यामुळे वेळीच तुमच्या लहान मुलांमध्ये या गोष्टी जाणवायला लागल्या तर तुम्ही त्यावर उपचार करायला हवेत कारण त्यावर त्याचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. शिवाय या आजारातून वेळेवर उपचार घेतल्यास बरं होता येतं.
3. ऑटिझम
ऑटिझम हा असा मानसिक आजार आहे जो दोन वर्षाच्या मुलापासूनही होऊ शकतो. दोन वर्षांच्या मुलांमध्ये एकमेकांशी न मिसळणं आणि एकलकोंडेपणाने राहण्याबरोबरच ऑटिझम सुरु होतं आणि मग त्याचा परिणाम बोबडेपणामध्ये होतो. अशी मुलं आपल्याच कामात आनंदी असतात आणि एकच काम बराच वेळ करत बसणं त्यांना खूपच आवडतं. पण हे ऑटिझमच लक्षण आहे हे वेळेतच पालकांनी ओळखायला हवं. वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडून योग्य वयात मुलं बोलत नसल्यास, त्यांची तपासणी करून घ्यायला हवी. यामधून मुलं बाहेर नक्की पडतात पण पुन्हा ऑटिझमच्या आहारी जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत राहायला हवं. याची लक्षणं बऱ्याच अंशी वेगळी असतात. नक्की ती काय असतात ते जाणून घेऊया –
- उशीरा बोलायला सुरुवात अथवा बोबडेपणाने सतत बोलणे
- वयाला साजेसे नसलेले व्यवहार करणं
- बुद्ध्यांक कमी असणं
- स्मरणशक्ती कमी असणं
- सतत हट्टीपणा आणि निराशा
- समाजातील लोकांमध्ये न मिसळणं
हे महत्त्वाचे प्रकार असून मानसिक आजाराने अन्यही काही प्रकार आहेत –
1. राग
बऱ्याच व्यक्तींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वेळेवर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार नाही ना याची खात्री करून घ्या. कारण राग हा एका मर्यादेपर्यंत ठीक असतो. पण सतत प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करून राग येणं हे योग्य नाही.
2. तीव्र झटका
अचानक शांत असताना विनाकारण अचानक एखादी व्यक्ती चिडत असेल तर त्याला पॅनिक अटॅक म्हटलं जातं आणि हा मानसिक आजाराचा एक भाग आहे. यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि तुमच्या जवळच्या माणसांच्या पाठिंब्याची गरज असते.
3. जास्त खाणं
बऱ्याचदा काही परिस्थितीमध्ये नक्की काय करायचं हे न कळून बऱ्याच जणांना सतत खायची सवय असते. पण हादेखील एक मानसिक आजाराच आहे. तुम्हाला स्वतःला हे सर्वात पहिल्यांदा जाणवतं. त्यामुळे असं काही झालं तर वेळीच तुम्ही आपल्या जवळच्या माणसांची मदत घेऊन यातून बाहेर यायचा प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या शरीरावर तर याचा परिणाम होतोच पण त्याहीपेक्षा जास्त मनावर या गोष्टीचा जास्त परिणाम होतो.
4. एकटेपणा
आजूबाजूला कितीही माणसं असली तरीही तुम्हाला सतत एकटेपणा वाटणं हादेखील मानसिक आजारच आहे. आपल्यावर कोणीही प्रेम करत नाही आणि आपण एकटे आहोत हे सतत वाटत राहणं योग्य नाही. त्यासाठी तुम्ही तुमचे विचार तुमच्या जवळच्या व्यक्तींंबरोबर शेअर करायला हवेत. अन्यथा याचा शेवट आत्महत्येचे विचार मनात निर्माण होईपर्यंत होतात.
5. आत्महत्येचे विचार
कोणत्याही गोष्टीसाठी सतत मनामध्ये आत्महत्येचे विचार येणं हादेखील मानसिक आजाराचा एक भाग आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही डगमगत असाल आणि त्यावर उपाय म्हणून फक्त आणि फक्त आत्महत्या इतकी एकच गोष्ट तुमच्या मनात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे असं जर तुमच्याबरोबर सतत होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायला हवी.
वाचा – मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर
मानसिक आजारावर घरगुती उपाय (Home Remedies For Mental Illness In Marathi)
प्रत्येक मानसिक आजारासाठी विविध उपचार केले जातात. अगदी उपचार करण्यासाठी चुंबकीय थेरपीपासून ते शॉक थेरपीपर्यंत सर्व प्रकार आहेत. पण तुमचा आजार नक्की कोणत्या थरापर्यंत पोहचला आहे त्यानुसार या थेरपी आणि उपचार करावे लागतात. त्यामुळे कोणत्याही थेरपी करून घेण्याआधी स्वतःच्या मनाने न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं योग्य. पाहूया काय आहेत नैसर्गिक उपचार –
1. संवाद
बऱ्याचदा केवळ औषधाने आणि बोलण्यानेही हे आजार बरे होतात. कारण यावरचा उपाय असतो तो म्हणजे आपल्या मनात नक्की काय चालू आहे हे दुसऱ्याला स्पष्ट सांगणं. मनात गोष्टी ठेऊन त्या साठत जातात आणि त्यामुळे आपल्या मनावरील ताण वाढत जातो. परिणाम मानसिक आजाराला निमंत्रण असतं. त्यामुळे घडलेल्या वेळीच गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक उपाय यावर आहे. संवाद हा खरं तर सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. संवादाशिवाय आयुष्यात काहीही घडू शकत नाही. त्यामुळे बोलल्याशिवाय कोणताही मानसिक आजार बरा होऊ शकत नाही.
2. योगा
योगा हा मानसिक आजारावरील नैसर्गिक उपचारच आहे. योगामुळे तुमची मानसिक शक्ती वाढते आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता अधिक लाभून तुमच्या मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे हा उपचार अतिशय चांगला आणि लगेच उपचार देणारा आहे. योगा हा बऱ्याच आजारांवरील योग्य उपचार आहे. तुम्ही केलेल्या व्यायामांमुळे तुमच्या शरीराला आणि मनालाही योग्य राखण्यास योगाची मदत होते.
3. ध्यानसाधना
ध्यानसाधना हादेखील तितकाच महत्त्वाचा उपचार आहे. ध्यानसाधनेमुळे तुमचं मनावर चांगलं नियंत्रण राहातं आणि त्यामुळेच मानसिक आजारातून बरं होण्यासाठी नेहमी ध्यानधारणेचा आधार घेतला जातो. अगदी तज्ज्ञांनीदेखील ध्यानधारणा करण्याचे सल्ले दिले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही हा सोपा आणि अगदी नैसर्गिक उपचार करून पाहा. ध्यानसाधना हा अतिशय महत्त्वाचा उपचार आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र आणि अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक विपश्चना केंद्र सापडतील जिथे जाऊन तुम्ही ध्यानसाधना करून आप्लया मनावर योग्य ते उपचार करून घेऊ शकता. महाराष्ट्रातील नाशिक आणि लोणावळा इथे खास यासाठी विपश्चना केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.
4. फॉरेस्ट बाथिंग
तुम्हाला हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या तणावातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद घ्या. जंगलातील धबधब्यांमध्ये आंघोळ हादेखील एक नैसर्गिक उपाय आहे. तुम्हाला अतिशय हलकं वाटतं. इतकंच नाही अगदी तुमच्या घरातील बागेमध्येही तुम्ही वेळ घालवलात तर तुम्हाला या आजारातून बाहेर यायला मदत होईल.
5. विटामिन्स आणि मिनरल्स
डोक्यामध्ये योग्य विचार असतील तर तुमचं मनही चांगलं राहतं आणि त्यासाठी तुमच्या शरीराला विटामिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता भासते. त्यामुळे तुम्ही अशा आजारातून बाहेर येण्यासाठी विटामिन्स आणि मिनरल्सचा वापर करू शकता.
वाचा – जाणून घ्या कावीळवर घरगुती आणि आयुर्वेदीक उपचार पद्धती
मासिक आजारातून बाहेर काढण्यासाठी संस्था (Mental Health Foundation In Marathi)
मानसिक आजार हा बऱ्याचदा हाताबाहेरही जातो. त्यामुळे अशावेळी तुम्हाला काही संस्थांचीही मदत होत असते. मानसिक आजारी असणाऱ्यांसाठी अशा संस्था काम करत असतात. पण तुम्हाला जर याबद्दल काही माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला इथे काही संस्थांची नाव देत आहोत. तुमच्या आजूबाजूला कोणाला तर अशा मदतीची गरज असेल तर तुम्ही नक्की या संस्थांची नावं त्यांना द्या.
1. मानव फाऊंडेशन (Manav Foundation)
पत्ता – 168, टायर हाऊस, लॅमिंग्टन क्रॉस रोड, अलीभाई प्रेमजी मार्ग, ग्रँट रोड पूर्व, मुंबई
ईमेल – info@manavfoundation.org.in संकेतस्थळ: http://manavfoundation.org.in
2. आसरा (Aasra)
पत्ता – 104, सनराईज आर्केड, प्लॉट क्र. 100, सेक्टर 16, कोपरखैरणे, नवी मुंबई – 400709
ईमेल – aasrahelpline@yahoo.com
3. श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन (Shraddha Rehabilitation Foundation)
पत्ता – श्रद्धा मानसरोवर, शांती आश्रमच्या मागे, एक्सय रिसॉर्टच्या समोर, न्यू लिंक रोड लगत, गॉसिप कॅफेजवळ, बोरीवली पश्चिम, मुंबई – 400103
4. दी इंडियन कौन्सिल फॉर मेंटल हेल्थ (The Indian Council for Mental Health)
कार्यालय क्र. 2, 3 रा मजला, क्रिसेंट चेंबर्स, तमारिंड लेन, फोर्ट, मुंबई – 400023
5. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ (Institute For Psychological Health)
डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
पत्ता – 9 वा मजला, श्री गणेश दर्शन, एलबीएस मार्ग, ठाणे पश्चिम, नौपाडा, 400602
6. लिव्ह, लव्ह अँड लाफ फाऊंडेशन (The Live Love Laugh Foundation)
दीपिका पादुकोण
Email – info@thelivelovelaughfoundation.org
फोटो सौजन्य – Shutturstock