xSEO

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Unchi Vadhavnyache Upay Marathi

Dipali Naphade  |  Feb 15, 2022
unchi vadhvnyache upay

कितीतरी वेळा आपल्याला अनेक ग्रुपमध्ये उंची नसणाऱ्या व्यक्तींना ‘बटल्या’, ‘देढफुट्या’ अशा नावाने हाका मारलेल्या ऐकायला येतात. काही जणांची उंची कितीही प्रयत्न केला तरीही वाढत नाही. एका ठराविक वयानंतर उंची वाढणे थांबते. हे खरं असलं तरीही अनेकदा उंचा वाढविण्यासाठी काय करावे, हाईट वाढवण्याचे उपाय अर्थात उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय (Unchi Vadhavnyache Gharguti Upay) केले जातात. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की काय आहेत अथवा मुलींची उंची वाढविण्यासाठी (Mulinchi Unchi Vadhavnyache Upay) आणि मुलांची उंची वाढविण्यासाठी नक्की काय करता येऊ शकते (Mulanchi Unchi Vadhavnyache Upay) यासाठी आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. काही जणांना उंची वाढवण्यासाठी काय खावे लागते असाही प्रश्न पडतो, तर या सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याआधी उंची न वाढण्याची कारणे थोडक्यात जाणून घ्यायला हवीत.

उंची न वाढण्याची कारणे थोडक्यात

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Unchi Vadhavnyache Gharguti Upay

उंची वाढविण्यासाठी अनेक घरगुती उपाय करता येतात. मुलांची उंची साधारण 23-25 वयापर्यंत तर मुलींची उंची ही 18-21 वयापर्यंत वाढवता येते. पण नैसर्गिकरित्या कशी उंची वाढवायची, याचे काही घरगुती उपाय तुम्ही जाणून घ्या. 

1. अश्वगंधा

Unchi Vadhavnyache Upay

अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव जिनसेंग असे आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत जे हाडांचे निर्माण करण्यासाठी अर्थात उंची वाढविण्यासाठी जे हार्मान्स मदत करतात त्यासाठी फायदेशीर ठरतात. 

कसा करावा वापर – रात्री तुम्ही दुधामध्ये अश्वगंधा पावडर मिक्स करून रोज प्यायल्यास उंची वाढण्यासाठी मदत मिळते. बऱ्याचदा अश्वगंधाचा उपयोग हा सेक्स वाढविण्यासाठी केला जातो असे ऐकिवात येते. पण असं अजिबात नाही. अश्वगंधा तुमच्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर ठरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. 

2. चुन्याचे पाणी

उंची वाढविण्यासाठी घरगुती उपाय करत असाल तर तुम्ही रोज गव्हाच्या दाण्याबरोबर चुन्याच्या पाण्याचे सेवन आणि आमटी, भाजी खाल्ल्यास याचा फायदा मिळतो असं सांगण्यात येते. 

याचे सेवन केल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात शरीरामध्ये कॅल्शियम मिळतात, हाडे मजबूत होतात आणि उंची वाढण्यासाठीही मदत मिळते. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

3. डेअरी प्रॉडक्ट्स

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

दूध, दही, पनीर आणि चीज (Milk, Curd, Paneer and Cheese) हे शरीरासाठी उत्तम ठरते. प्रमाणात हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन ए, बी, डी आणि ई (Calcium, Protein and Vitamin A, B, D and E) चा पुरवठा चांगला मिळतो.

याच्या सेवनामुळे लहान मुलांची उंची वाढविण्यासह शरीराची वाढही चांगली होण्यास मदत मिळते. लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी घरगुती उपायांमध्ये सहसा या पदार्थांचा वापर करण्यात येतो. 

4. अंडी आणि मासे

Height Vadhavnyache Upay

अंडी खाण्याचे फायदे आहेत. अंड्यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आढळतात, ज्यामुळे शरीराची चांगली वाढ होते. तसंच यातील आढळणारे विटामिन डी, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन हे मुलांची हाडे अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच शरीराचा विकास चांगला होण्यासह उंचीदेखील चांगली वाढण्यास मदत मिळते. योग्य वयापासूनच अंडी आणि मासे यांचा आहारात समावेश केल्यास मुलांची उंची वाढविण्यासाठी (Mulanchi Unchi Vadhavnyache Upay) फायदा मिळतो. माशांमध्येही प्रोटीन आणि विटामिन डी चे प्रमाण असून यामध्ये कार्बोहायड्रेट, विटामिन्स आणि रेशोचा खजाना असतो, जो उंची वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

5. योग्य आहार

उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

योग्य आहार हे तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी गरजेचे आहे. तुम्ही आहारामध्ये कोणकोणते पदार्थ समाविष्ट केले आहेत यावर तुमच्या शरीराचा विकास अवलंबून असतो. यासाठी तुम्ही आहारामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, जिंक, प्रोटीन, फॉस्फोरस याचे प्रमाण योग्य ठेवायला हवे. दूध, फळांचा रस, नैसर्गिक फळे याचे योग्य प्रमाणात आहारात समावेश करून घेणे गरजेचे आहे. यामुळे उंची वाढण्यासही मदत मिळते. त्याशिवाय तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळांमधील पोषक तत्व, मिनरल्सचा समावेश करून घ्या. नैसर्गिकरित्या उंची वाढण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश करून घ्यायलाच हवा. 

6. योग्य झोप आहे गरजेची

Unchi Vadhavnyache Upay

चांगल्या आणि भरपूर झोपेचा आरोग्याला फायदा मिळतो. तुम्ही चांगली झोप नियमित घेतली तर त्याचा उंची वाढण्यावरही परिणाम होतो. झोपायच्या वेळी हार्मान्सनचे उत्सर्जन होत असते. यामुळे तुम्हाला उंची वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे कमीत कमी 7-8 तास झोप आपल्या मुलांना मिळायलाच हवी याची काळजी घ्या. मुलामुलींची सध्याची लाईफस्टाईल बदलल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर योग्य लक्ष ठेऊन त्यांची झोप पूर्ण होते की नाही याची काळजी घ्यायला हवी. 

7. उंची वाढवण्याचा व्यायाम

हाईट वाढवण्याचे उपाय

उंची वाढवण्याचा व्यायाम म्हणजे नियमितपणे शरीर स्ट्रेच करणे याबाबत सर्वांना माहीत आहेच. उंची वाढवण्यासाठी व्यायाम म्हणजे योगा आणि नियमित व्यायाम करणे योग्य ठरते. सूर्यनमस्काराचेही फायदे आहेत. उंची वाढवण्याचा व्यायाम करताना ताडासन क्रिया अत्यंत लाभदायी ठरते. योगा करताना तुमचे शरीर खेचले जाते आणि तुमच्या शरीराची उंची वाढण्यास मदत मिळते. योगा आणि व्यायाम हा उंची वाढविण्यासाठी चांगला पर्याय आहे. उंची वाढवण्याचा व्यायाम करायचा असेल तर मुलांना रोज योगा करायला लावाच. याशिवाय भुजंगासन, शीर्षासन हेदेखील उत्तम योगासन आहेत, ज्यामुळे उंची वाढण्यास मदत मिळते. निरोगी आयुष्यासाठी योगासनाचे अनेक प्रकार आहेत. 

उंची वाढविण्यासाठी अतिरिक्त सोपे घरगुती उपाय – 

उंची वाढवण्यासाठी व्यायाम

उंची वाढवण्यासाठी व्यायाम

शरीराला सतत शारीरिक गतिविधी द्यायला हवी, जेणेकरून उंची वाढविण्यासाठी मदत मिळते. दोन ते तीन वर्षाच्या मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत शारीरिक गतिविधी महत्त्वाची आहे. उंची वाढविण्यासाठी योगा आणि व्यायाम असे दोन्ही प्रकार महत्त्वाचे आहेत. उंची वाढविण्यासाठी नक्की कोणत्या योगा करायला हव्यात जाणून घ्या. 

आसनाचे नावकरण्याची पद्धत 
सूर्यनमस्कारसूर्यनमस्कार हा योगाचा असा प्रकार आहे, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक अंगाला फायदा मिळतो. उंची वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये वेगवेगळ्या बारा मुद्रांचा समावेश आहे
ताडासन ताडासन करताना दोन्ही पाय चिकटवून उबे राहा आणि मग दोन्ही हात समोर घ्या. त्यानंतर शरीर ताणले जाईल अशा पद्धतीने दोन्ही हात आणि पायाच्या टाचा हळूहळू वर घ्या. असं तुम्ही 8-10 वेळा करावे
भुजंगासनपोटावर जमिनीवर तुम्ही पडा आणि दोन्ही हात खांद्याच्या जवळ घेऊन तुम्ही मान वर घ्या. त्यानंतर कंबरेपर्यंतचा भाग वरपर्यंत घ्या आणि ताणून धरा. असे तुम्ही 5-6 वेळा करा. 
शीर्षासनहे अत्यंत सावधानतापूर्वक करण्याचे आसन आहे. डोकं खाली आणि त्यानंतर हळूहळू शरीर वर उचलून पाय वर टेकवावे. यामध्ये संपूर्ण शरीर ताणले जाते आणि त्यामुळे उंची वाढण्यास मदत मिळते. 
उंची वाढवण्यासाठी व्यायाम

व्यायामाच्या अन्य पद्धती म्हणजे अथवा याशिवाय उंची वाढण्यासाठी व्यायाम म्हणजे, सायकलिंग करणे (Cycling), दोरी उड्या मारणे, पोहण्याचेही फायदे होतात. 

उंची वाढवण्यासाठी काय खावे लागते

उंची वाढवण्यासाठी काय खावे लागते

उंची वाढविण्यासाठी संतुलित आहार अत्यंत गरजेच आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारामध्ये काही महत्त्वाच्या पदार्थांचा समावेश करून घ्यायलाच हवा 

मोड आलेली कडधान्ये – सहसा मुलांना भाजी आवडत नाहीत. पण मुलांची उंची वाढायला हवी असेल तर त्यांच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. रात्रभर कडधान्ये भिजवून सकाळी उकडून ती खायला द्यावीत. याचा फायदा मिळतो. 

ऑर्गेनिक आणि नैसर्गिक फळे – फळांचा रस देण्यापेक्षा नैसर्गिक फळे आणि हंगामी फळे खाणे उंची वाढण्यासाठी उत्तम ठरते. सफरचंद, द्राक्ष, अननस, डाळिंब, पेरू, कलिंगड अशा सर्व नैसर्गिक फळांचा समावेश करून घ्या. केळीही आरोग्यासाठी आणि उंची वाढण्यासाठी उत्तम ठरतात. 

सोयाबीन – मुलांच्या जेवणामध्ये सोयाबीनचा वापर करावा. सोयाबीन हे उंची वाढविण्यासाठी उत्तम आहार आहे. 

चिकन – ज्यांच्याकडे घरात चिकन शिजते. त्या मुलामुलींना साधारण दोन ते तीन वयापासूनच चिकन खाण्याची सवय लावावी. यामधून हाडांना पोषक तत्व मिळून उंची वाढण्यासाठी मदत मिळते. 

नट्स – शेंगदाणे, मनुका, अक्रोड असे ड्रायफ्रूट्स आणि नट्सचाही मुलांच्या रोजच्या सेवनामध्ये समावेश करून घ्यायला हवा. यामुळे योग्य पोषण मिळून उंची वाढण्यास मदत मिळते. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. वयाच्या 18 व्या वर्षानंतर उंची वाढवता येते का ?
वयाच्या 18 व्या वर्षानंतर उंची वाढवता येते असे म्हटले जाते. मात्र सहसा तसे दिसून येत नाही. 8-18 या दरम्यान मुलांची आणि मुलींची उंची ही पटापट वाढते असे सरासरी दिसून आले आहे. त्यामुळे यानंतर सहसा फारच कमी जणांची उंची वाढली आहे. 

2. मी 5 इंच उंची कशी वाढवू शकेन ?
तुमच्या शरीराला व्यायाम करण्याची गरजे आहे. नियमित खेळ आणि व्यायाम हे तुमची उंची वाढण्यासाठी आणि शरीराचा विकास घडण्यासाठी उपयुक्त ठरते. पोहणे, योगा करणे, धावणे आणि योग्य जेवणे यामुळे तुमची उंची नक्कीच वाढू शकते. तसंच तुम्ही उंच होण्यासाठी काही स्ट्रेच व्यायाम करणेही गरजेचे आहे. 

3. मी 6 इंच उंची कशी वाढवू शकेन ?
रोज सकाळी हेल्दी नाश्ता करणे, जंक फूड न खाणे, योग्य आहार घेणे, योग्य झोप घेणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, रोज नियमित व्यायाम करणे, योग्य पद्धतीने बसणे आणि लहान लहान आणि योग्य वेळी खाणे यामुळे तुमची उंची 6 इंच वाढू शकते. 

Read More From xSEO