DIY सौंदर्य

कमी वजनामुळेही त्वचा दिसू शकते वयस्क, अशी घ्या काळजी

Leenal Gawade  |  Apr 19, 2021
कमी वजनामुळेही त्वचा दिसू शकते वयस्क, अशी घ्या काळजी

तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन असायला हवे हे तुम्हाला माहीत हवे. कधी कधी बारीक होण्याच्या नादात आपण आपले इतके वजन कमी करतो की, अनाकर्षक दिसू लागतो. शरीरावर कमी असलेले मांस देखील तुमचा चेहरा वयाच्या तुलनेत अधिक वयस्क दाखवू शकते. आरशात एकदा नीट निरखून पाहा. तुमच्या चेहऱ्यावरील हाड अगदी ठशठशीत दिसू लागली आहेत का? जर उत्तर असेल हो… तर तुम्ही कारण नसताना खूप वजन कमी केले आहे किंवा तुमचे मुळातच शरीर हे इतरांच्या तुलनेत बारीक आहे असेल. पण वजन वाढवणे हे आपल्या हातात असते. तुमची त्वचाही कमी वजनामुळे अधिक थोराड वाटत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करुन त्वचेची काळजी घेऊ शकता. ज्यामुळे तुमची त्वचा आणि चेहरा अधिक सुंदर दिसू लागेल.

ओठांवर सतत मुरूमं येत असतील तर करा सोपा उपाय

वजन कमी असल्यास अशी दिसते त्वचा

Instagram

जर तुमचे वजन आणि शरीर तुलनेने फार बारीक असेल तर तुमच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम पटकन जाणवतो. अशा त्वचेला योग्य प्रमाणात मॉश्चरायझर मिळत नाही. अशी त्वचा ही कोरडी आणि शुष्क दिसते. अशा त्वचेवर पिंपल्स आले की ते जाता जात नाहीत. कारण या त्वचेला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळत नाही. अशी त्वचा ही काळवंडलेली दिसू लागते. अशा चेहऱ्यावर काहीही लावले तरी देखील त्वचेला म्हणावा तितका फ्रेशनेस येत नाही.

कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी वापरा हे हेअर टूल्स

अशी का काळजी

जर तुम्हीही अंडरवेट असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी काही खास सोपे उपाय करायला हवेत. चला तर जाणून घेऊयाही सोपी काळजी

आहारात असू द्या फळं : फळ ही कधीही आणि कोणासाठीही चांगली असतात. फळं ही वजन योग्य पद्धतीने वाढवण्यास मदत करतात. फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अन्य घटक हे त्वचेला तजेला देण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचा ही आपोआपच चांगली दिसू लागते. 

वजन वाढवा : वजन वाढवणे हे अशा व्यक्तींसाठी फारच कठीण असते. कारण काही जणांचे वजन काही केल्या वाढत नाही. अशावेळी योग्य डाएटचा आधार घ्यावा लागतो. वजन वाढवणे म्हणजे जंक फूड खाणे असे होत नाही. तर वजन वाढवण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात प्रथिन आणि फॅट असावे लागतात. तुमचे वजन वाढले की, आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर मांस येते. जे तुलनेने अधिक चांगले दिसते. त्वचा तुकतुकीत दिसू लागते. 

 हेवी व्यायाम टाळा:  व्यायाम हा शरीरासाठी फार गरजेचे असतो. पण जर तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही उगाचच खूप व्यायाम करणे टाळा. कारण अति व्यायाम हा बारीक व्यक्तींसाठी चांगला नाही. हेवी वेट्स घेऊन तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्राणायाम आणि योग्य असा व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या त्वचेलाही तेज येईल

नकारात्मक विचार सोडा :  नकारात्मक विचार हे तुमच्या आरोग्यासाठी अधिक घातक असतात. मी चांगली दिसत नाही. माझ्या चेहरा असा का दिसतो? इतरांच्या तुलनेत माझा चेहरा असा का? माझ्या चेहऱ्याची हाडं का दिसतात असा विचार तुम्ही करत असाल तर  तर अशा विचारांना थारा देऊ नका. त्यापेक्षा रोज किमान अर्धातास प्राणायाम करा तुम्हाला नक्कीच बरे वाटेल


आता वजन कमी असेल तर नक्कीच हे काही सोपे उपाय तुम्हाला सुंदर, आकर्षक त्वचा मिळवून द्यायला मदत करतील. 

हे नाईट केअर रूटीन ठरेल ओपन पोर्ससाठी परिणामकारक

 

 

Read More From DIY सौंदर्य