आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरी केली जात आहे. या निमित्ताने आढावा घेऊया, शिवराय आणि त्यांच्याशी निगडीत येणाऱ्या काही आगामी चित्रपटांचा आढावा.
छत्रपती शिवाजी – अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव हे लवकरच छत्रपती शिवाजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या या चित्रपटातील लुकही व्हायरल झाला होता. या चित्रपटाचं बजेट तब्बल 225 कोटी असल्याचं कळतंय. तसंच हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
तानाजी : द अनसंग वॉरियर – अभिनेता अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी चित्रपट तानाजी द अनसंग वॉरियर या वर्षी येणार आहे. मराठा साम्राज्याचे सेनापती सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तानाजी हे विश्वासू सेनापती होते. ते महाराजांप्रती इतके प्रामाणिक होते की, आपल्या मुलाचं लग्न सोडून युद्धावर गेले.
वाचा – शिवाजी महाराजांचे सुविचार (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi)
मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध योद्ध्यांमध्ये तानाजींच नाव सर्वात आधी येतं. या चित्रपटात अजय देवगणसोबतच सैफ अली खान ही दिसणार आहे. या चित्रपटात तो औरंगजेबच्या सेनापतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भरपूर अॅक्शन सिक्वेन्स असल्यामुळे खास जर्मनीहून स्पेशल टीमही बोलवण्यात आल्याचं कळतंय.
छत्रपती शासन – प्रबोधन फिल्म्स ही लवकरच छत्रपती शासन हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरूणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराज भोसले यांनी केला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे करत असून कथा आणि संवाददेखील त्यांचेच आहेत.
या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इबलिस – आता शिवाजी जन्मावा माझ्याच घराच ही टॅगलाईन असलेला इबलिस हा सिनेमा लवकरच येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने इबलिस नावाच्या चित्रपटाचं पोस्टर ही रिलीज करण्यात आलं. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता राहुल चौधरी आणि सविता चिंचोळकर यांची असून कथा, पटकथा आणि संवाद नामदेव मुरकुटे यांचे आहेत. तर दिग्दर्शनाची कमान राहुल मनोहर चौधरी यांच्याकडे आहे.
हेही वाचा –
नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास
‘भारत’चं टीझर प्रदर्शित, यावर्षी देशभक्तीपर चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी
2019 मध्ये बॉलीवूडमधल्या ‘नव्या’ जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade