DIY सौंदर्य

हिवाळ्यात तुमच्या स्किन टोननुसार लावा कोल्ड क्रिम

Dipali Naphade  |  Dec 7, 2021
cold-cream

थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे आपल्या त्वचेवर. आपली त्वचा लगेच कोरडी व्हायला सुरूवात होते. त्वचेची काळजी (Skin Care in Winter) थंडीत घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे कोल्ड क्रिम (Cold Cream) अथवा बॉडी लोशनचा (Body Lotion) वापर करत असतो. थंडीच्या दिवसात कोल्ड क्रिम लावल्याने अनेकांची त्वचा ऑईली अर्थात तेलकट दिसू लागते. तसंच त्वचेवरील नैसर्गिक चमकही कमी होत असल्याची तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळते. याशिवाय थंडीच्या दिवसात त्वचा काळी पडण्याच्या तक्रारीही ऐकू येतात. पण इतकं मात्र नक्की की, कोल्ड क्रिममुळे त्वचेचा रंग काळ पडत नाही. थंडीच्या दिवसात कोल्ड क्रिम लावणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. सकाळच्या उन्हात बसण्याचे फायदे होतातच. पण कधीतरी या ऊन्हामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यताही असते. त्वचेची अधिक काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार कोल्ड क्रिमचा वापर करायला हवा. या लेखातून जाणून घेऊया कोणत्या स्किन टोननुसार कोणते कोल्ड क्रिम आहे योग्य.

तेलकट त्वचा (Cold Cream for Oily Skin)

थंडीमध्ये तेलकट त्वचेची काळजी घेणे अत्यंत कठीण असते. थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेवर कोल्ड क्रिम लावल्याने त्वचा अधिक तेलकट होते. जास्त तेलकट त्वचेवर पिंपल्स (Pimples) आणि ब्लॅकहेड्ससारख्या समस्या अधिक जाणवतात. थंडीच्या दिवसात तेलकट त्वचेवर वॉटर बेस्ड मॉईस्चराईजरचा वापर करायला हवा. तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी थंडीच्या दिवसात केवळ एक वेळाच कोल्ड क्रिम लावायला हवे. तसंच ही वेळ म्हणजे तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी सकाळच्या प्रहरी साधारण कोल्ड क्रिम लावावे. जेणेकरून त्वचा अधिक तेलकट दिसणार नाही. 

कोरड्या त्वचेसाठी कोल्ड क्रिम (Cold Cream for Dry Skin)

थंडीच्या दिवसात त्वचा खूपच कोरडी होते. त्वचा हायड्रेट, मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी कोल्ड क्रिमची मदत होते. कोरड्या त्वचेवर क्रिम जास्त काळ टिकत नाही. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींना थंडीच्या दिवसात किमान तीन वेळा अथवा दोन वेळा कोल्ड क्रिम लावण्याची गरज आहे. कोल्ड क्रिम लावल्याने त्वचा हायड्रेड राहील आणि चेहऱ्यावरही चमक येईल. कोरडी त्वचा असल्याने महिलांनी दिवसा तीन वेळा आणि विशेषतः रात्री कोल्ड क्रिम झोपण्याच्या आधी लावण्याची गरज आहे. 

संवेदनशील त्वचेसाठी कोल्ड क्रिम (Cold Cream for Sensitive Skin)

थंडीच्या दिवसात संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींची त्वचा अधिक संवेदनशील होते. या व्यक्तींना थंडीच्या दिवसात त्वचेवर जळजळ, कोरडेपणा आणि लाल रॅशेस येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी नैसर्गिक कोल्ड क्रिमचा वापर करायला हवा. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलच्या समावेश नसेल अशा गोष्टींचा वापर करावा. तुम्ही हवे तर कोल्डक्रिमच्या ऐवजी नारळाच्या तेलाचा वापर करून त्वचेची काळजी घेऊ शकता. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांनुसार, नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे जास्त गरजेचे आहे. तसंच संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी सकाळच्या वेळी कोल्ड क्रिमचा वापर करावा. जेणेकरून त्रास होणार नाही. प्रत्येकाने आपल्या त्वचेच्या टोननुसार अर्थात स्किन टोननुसार हिवाळ्यात कोल्ड क्रिमचा वापर केल्यास, त्रास होणार नाही. तसंच तुम्ही तुमची त्वचा अधिक सुरक्षित ठेऊ शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य