DIY सौंदर्य

मधाचा वापर करून चेहऱ्यावरील मुरूमं करा दूर

Dipali Naphade  |  Jul 15, 2021
मधाचा वापर करून चेहऱ्यावरील मुरूमं करा दूर

स्वच्छ, सुंदर आणि डागविरहीत चेहरा कोणाला नको असतो? विशेषतः महिला आपले सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक पद्धतीने उपाय करत असतात. पण असं असूनही बऱ्याचदा चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या तशीच राहाते. ही समस्या तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना जास्त सहन करावी लागते. पण याचा अर्थ असा नाही की कोरडी त्वचा अथवा कॉम्बिनेशन त्वचा असेल त्यांना मुरूमांचा त्रास होत नाही. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर यामध्ये मुरूमं होणारे बॅक्टेरिया निर्माण होतात आणि मग त्याचा त्रास होऊ लागतो. मग कोणतीही त्वचा असली तरीही याचा त्रास होतोच. मुरूमांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी बाजारामध्ये अनेक उत्पादने आहेत. पण तुम्ही जर एखादा नैसर्गिक उपाय शोधत असाल तर त्यासाठी तुम्हाला मध हा अत्यंत उत्तम उपाय आहे. मधामध्ये मॉईस्चराईजिंग घटक असतात आणि त्याशिवाय हे अँटिबॅक्टेरियल आहे. हे त्वचेवर सहज लावता येऊ शकते. याचा त्वचेवर अधिक चांगला परिणाम होतो. 

मध आणि हळद पावडर

Canva

मध आणि हळद पावडर या दोन्ही गोष्टी चेहऱ्यावरील मुरूमं काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. हळद अँटिसेप्टिक असून चेहऱ्यावरील मुरूमं नष्ट होऊन डाग राहात नाहीत. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

फायदा – मधासह हळदीचा प्रयोग मुरूमांची समस्या त्वरीत बरी करण्यासाठी होतो. कारण हळदीमध्ये असणारे अँटिसेप्टिक यावर त्वरीत परिणाम करते. यामध्ये मुरूमांना नष्ट करणारे घटक समाविष्ट असतात. तसंच हळदीमुळे मुरूमांनी तयार होणारे चेहऱ्यावरील काळे डागही निघून जातात.

मध आणि बेसन

Canva

मध आणि बेसन या कॉम्बिनेशनमुळेही चेहऱ्यावरील मुरूमं जाण्यास मदत मिळते. मधाच्या गुणामुळे डागही राहात नाहीत. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

फायदा – बेसन त्वचेवरील मुरूमांची समस्या वाढण्यास रोखते. तसंच स्किन पोर्स ओपन करून त्वचेला अगदी आतमधून स्वच्छता देते. इतकंच नाही तर डेड स्किन काढून टाकण्यासाठीही हा नैसर्गिक उपाय आहेत. मधामुळे त्वचेला अधिक मऊ आणि मुलायमपणा मिळतो आणि त्याशिवाय पीएच संतुलन राखण्यासही मदत मिळते. मुरूमांमुळे चेहऱ्याला आलेली सूज कमी करण्यास मदत होते. 

कोरफड जेल आणि मध

Canva

कोरफड जेल आणि मध या दोन्ही पदार्थांमुळे त्वचेला अधिक तजेलदारपणा आणि चमक मिळते. तसंच चेहऱ्यावरील डाग जाण्यास मदत मिळते. 

साहित्य 

बनविण्याची पद्धत 

फायदा – मधामध्ये नैसर्गिक घटक असतात. त्यामुळे त्वचा अधिक मुलायम होते. तसंच कोरफड जेलमध्ये अँटीअॅक्ने घटक आढळतात. हे त्वचेमधील बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत करतात. त्यामुळे मुरूमांपासून सुटका मिळते. 

सूचना – मुरूमांची समस्या असेल तर त्यापासून सुटका मिळविण्यासाठी मधाचा वापर करण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करून घ्या. डायरेक्ट वापर करू नका. कोणतीही अलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट करून बघणे गरजेचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य