xSEO

घरगुती उपायांनी करा वात रोग उपचार मराठी (Vaat Rog Home Remedies In Marathi)

Trupti Paradkar  |  Sep 24, 2021
vaat rog home remedies in marathi

मानवी शरीर हे जल, वायु, पृथ्वी, तेज आणि आप या पंचतत्त्वापासून तयार झालेले आहे. या पंचतत्त्वामधील मुळ गुणधर्मांमुळे आपल्या शरीरात त्रिदोष अथवा तिन प्रकृती निर्माण होतात. जसं की वात, पित्त आणि कफ… जेव्हा मानवी शरीरातील हे त्रिदोष अथवा प्रकृती असंतुलित होतात तेव्हा आरोग्य समस्या वाढतात. उदा. जेव्हा वात वाढतो तेव्हा सांधेदुखी, अंगदुखी जाणवते. पित्त वाढतं तेव्हा अंगावर पित्त उठतं, छातीत जळजळ होते आणि कफ वाढतो तेव्हा सर्दी, खोकला, ताप येतो. यासाठीच शरीरातील हे त्रिदोष नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार या तिन गोष्टींचे प्रमाण कमी जास्त असू शकते. एखादी व्यक्ती कफप्रवृत्तीची असते तर एखादी वातप्रवृत्तीची. वात म्हणजे पंचतत्त्वातील वायु होय. जेव्हा शरीरातील वात वाढतो तेव्हा तुम्हाला वायुशी निगडीत समस्या जाणवतात. शरीरात जिथे जिथे पोकळी आहे अशा ठिकाणी समस्या निर्माण होतात. जसं की, श्वसनाच्या समस्या, ह्रदयाच्या समस्या, अंगदुखी, सांधेदुखी, मेंदूच्या समस्या. कारण तुमच्या शरीरातील वात म्हणजेच वायु असंतुलित झालेला असतो. वातासाठी घरगुती उपाय करता येतात. यासाठीच आज आपण वातदोष म्हणजे काय आणि वात रोग उपचार मराठीतून (vaat rog home remedies in marathi) जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे वाचा पित्तावर घरगुती उपाय करून घरच्या घरीच मिळवा आराम.

vaat rog home remedies in marathi

मालिश (Massage)

वातप्रकृती असंतुलित झाल्यामुळे बऱ्याच लोकांना सांधेदुखी, अंगदुखी जाणवते. अशा वेळी मालिश हा एक उत्तम वात घरगुती उपाय आहे. शिवाय आयुर्वेदकाळापासून मालिशचे उपचार केले जात आहेत. त्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. मात्र मालिश तज्ञ्ज व्यक्तीकडून अथवा त्याचे रितसर ज्ञान घेऊन मगच करावे. मालिशसाठी बाजारात सांधेदुखीवर अनेक आयुर्वेदिक तेल मिळतात हे तेल थोडं कोमट करून सांध्यावर लावा. जर तुमच्याकडे मालिशचे तेल नसेल तर तुम्ही घरीच नारळाचे तेल, एरंडेल तेल एकत्र करून सांध्यावर लावू शकता. ऑलिव्ह आईल आणि जाडे मीठ एकत्र करून लावण्यामुळेही सांधेदुखी कमी होते. मालिशमुळे तुमच्या सांध्यांना वंगण मिळते आणि वातदोष कमी होण्यास मदत होते.

लसूण (Garlic)  

vaat rog home remedies in marathi

लसूण खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरात थंडावा वाढल्यामुळे वात दोष निर्माण होतात आणि वाढतात. यासाठीच शरीराला उष्णता मिळण्यासाठी वात असलेल्या लोकांनी आहारात उष्णता मिळेल असे पदार्थ खावे. वात रोग उपचार मराठीतून करताना लसूण खाण्यामुळे तुमचे पचन सुधारते, पोटाच्या समस्या कमी होतात, अंगदुखी कमी जाणवते. वात, कफ आणि पित्त या तिन्ही प्रवृत्तीच्या लोकांसाठी लसूण खाणे फायदेशीर ठरते. यासाठी खाद्यपदार्थांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसणाचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या वाताच्या समस्या नक्कीच कमी होतील. वाचा सर्दी खोकला वर घरगुती उपाय (Cold And Cough Home Remedies In Marathi)

हळदीचे दूध (Turmeric Milk)

हळद ही मुळातच अॅंटि बॅक्टोरिअल असल्यामुळे प्रत्येकाने आहारात हळदीचा वापर करायलाच हवा. मात्र आजारपणातून बरं होण्यासाठी हळदीचे दुधदेखील खूप फायदेशीर ठरते. हळदीचे दूध पिण्यामुळे शरीराला आराम मिळतो, आतील आरोग्य समस्या दूर होतात आणि शांत झोप लागते. वात, पित्त असो वा फक तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. कारण यामुळे तुमच्या शरीराला चांगला आराम मिळतो आणि वातदोष कमी होण्यास मदत होते. वातामुळे शरीरात होणारी जळजळ आणि दाह हळदीच्या दुधामुळे कमी होते. हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

योगासने (Yogasana)

vaat rog home remedies in marathi

योगासने आणि प्राणायम करणं संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांची शरीर प्रकृती सुदृढल राहते आणि शरीरातील वात, पित्त, कफ संतुलित राहतात. वात कमी करण्यासाठी काही विशेष योगासने खास फायद्याची ठरतात. जसं की वात असलेले लोक सूर्य नमस्कार, वर्जासन, पश्चिमोत्तासन, सेतू बंध सर्वांगासन अशी आसने नियमित करू शकतात. ज्यामुळे त्यांची सांधेदुखी नियंत्रणात राहू शकतात. वात रोग उपचार मराठीतून करण्यासाठी योगासनासोबतच प्राणायम आणि ध्यानधारणादेखील नियमित करायला हवी. 

सूर्यप्रकाश (Sunlight) 

काही संशोधनात असं आढळून आलं आहे की, थंड वातावरणात लोकांना वात दोष जास्त प्रमाणात जाणवतात. मात्र अशी माणसं जास्त काळ सूर्यप्रकाशात असतील तर त्याचा वातदोष संतुलित राहतो. कारण सूर्याच्या उष्णतेमुळे शरीराला ऊब मिळते. वास्तविक वात दोष असंतुलित होण्याची कारणे अनेक असू शकतात जसं की, चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, जेवणाची चुकीची वेळ, सतत पाण्यात अथवा थंड ठिकाणी काम करणे अथवा अती कष्ट. मात्र जर वात दोष असलेले लोक जास्त काळ सूर्यप्रकाशात असतील तर त्यांना वातापासून नक्कीच आराम मिळू शकतो. यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात नक्कीच फिरा. ज्यामुळे शरीराला ऊब मिळेल आणि तुमच्या व्यायामही होईल.

दालचिनी (Cinnamon)

vaat rog home remedies in marathi

वात रोग उपचार मराठी करण्यासाठी दालचिनीदेखील खूप फायदेशीर आहे. दालचिनी हा भारतीय मसाल्यांमधील एक महत्त्वाचा मसाला आहे. तसंच वात दोषामुळे काही लोकांना पोटाच्या समस्याही निर्माण होतात. जर वातामुळे तुमचे पोट दुखत असेल अॅसिडिटी, जळजळ जाणवत असेल तर तुम्ही आहारात दालचिनीचा वापर करू शकता. ज्यामुळ तुमच्या पोटाच्या समस्या कमी होता आणि वाताचा त्रास खूप प्रमाणात कमी होतो. 

निर्गुडी (Nirgundi)

वात रोग उपचार मराठी तून करताना जाणून घ्या निर्गुडीचे फायदे. निर्गुडी ही एक औषधी वनस्पती आहे. जिचा वापर वातदोष कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. अस्थमा, सर्दी आणि वाताच्या त्रासात निर्गुंडीची पाने वाटून ताज्या गोमूत्रासोबत घेतली जातात. निर्गुडीची पाने मीठासोबत तव्यावर गरम करून तुम्ही त्याने तुमचे सांधे शेकवू शकता. शिवाय तेलात निर्गुडीची पाने गरम करून त्याच्या तेलाने सांध्यांना मालिश करूनही चांगला फायदा होतो. 

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे (Drink Water In Copper Vessel)

आजकाल पूर्वीचा काळ परत येऊ लागला आहे. आरोग्यासाठी चांगले आहे म्हणून पुन्हा लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ लागले आहेत. पूर्वी तांब्या-पितळेची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. तांब्यामध्ये शरीर डिटॉक्स करणारे गुणधर्म असतात. सहाजिकच तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये तांब्यातील गुणधर्म उतरतात. जर वात दोष असणाऱ्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायलं तर तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि वात दोष कमी होण्यास मदत होते. यासाठी अशा लोकांनी पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी ते उपाशीपोटी प्यावे. 

वात रोग उपचार मराठीतून (vaat rog home remedies in marathi) करताना हे काही घरगुती उपचार करून तुम्ही वातदोषावर मात नक्कीच मिळवू शकता.

वात रोग उपचार आणि काही प्रश्न – FAQ’s

1. वात दोष निर्माण झाला कसे समजावे ?

जेव्हा शरीरात वाताची निर्मिती वाढते तेव्हा वात असंतुलित होतो. ज्यामुळे तुमची त्वचा, केस, ओठ अती प्रमाणात कोरडे होतात. अपचनाचा त्रास होतो, सांधे आणि अंगदुखी जाणवते, सतत चिडचिड आणि थकवा जाणवतो. 

2. वातरोग कायमचे कमी होतात का ?

मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष असतातच. जेव्हा ते असंतुलित होतात तेव्हाच वाताचा त्रास होतो. यासाठी वात नियंत्रित राहिल अशी जीवनशैली आचरणात आणावी. 

3. वात असलेल्या लोकांना काय खाणे टाळावे ?

वाताच्या लोकांनी फार आंबट, कडू  पदार्थ आणि फळे खाणे टाळावे. कारण त्यामुळे शरीरात वातदोष वाढू शकतात. आंबवलेले पदार्थ खाण्यामुळेही अशा लोकांना त्रास होऊ शकतो. 

Read More From xSEO