फेब्रुवारी महिन्यात सगळीकडेच प्रेमाचे वारे वाहत असतात. ‘व्हॅलेटाईन डे’ निमित्त प्रेम व्यक्त करण्याची खास संधीच तरुणांना मिळत असते. यंदा फेब्रुवारीमध्ये रेडीमिक्स हा प्रेमपट प्रदर्शित होत आहे. रेडीमिक्स चित्रपटातील ‘का मन हे’ रोमॅंटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. त्यामुळे या गाण्यासोबतच आता प्रेम व्यक्त करण्याला उधाण येणार आहे. शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे ही सुपरहीट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना पाहता येणार आहे. ‘का मन हे’ गाणं आर्या आंबेकर आणि फर्हाद भिवंडीवाला यांनी गायलं आहे. अविनाश – विश्वनाथ या जोडीने या गाण्याला संगीत दिलं आहे. अश्विनी शेंडे या गाण्याची गीतकार आहे. ‘का मन हे’ गाण्यातील वैभव आणि प्रार्थना चा हा रोमॅंटिक अंदाज अनेकांचं मन मोहरुन टाकत आहे.
फेब्रुवारी महिन्यात रेडीमिक्स होणार प्रदर्शित
प्रेमावर आधारित या चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट आठ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. रेडीमिक्स चित्रपट लव्ह टॅंगलवर आधारित आहे. खंरतर प्रेम ही एक असामान्य गोष्ट आहे. मात्र असं असूनही प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेम मिळतंच असं नाही. प्रेमाच्या भावनेला अव्यक्त असे अनेक कंगोरे असतात. त्यामुळे प्रत्येक चित्रपटातून प्रेम हे निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त केलं जातं. अर्थातच प्रेमाच्या या तरल भावनेतून निर्माण झालेली भावनिक गुंतागुत या चित्रपटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैभव, प्रार्थना आणि नेहाने साकारलेल्या भूमिकांमधून प्रेमाचा एक नवा रंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रेडीमिक्स चित्रपटाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केलं आहे तर अमेय खोपकर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं.
वैभव आणि प्रार्थनाचा अनोखा अंदाज
वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या जोडीने आतापर्यंत अनेक हीट रोमॅंटीक चित्रपट केले आहेत. कॉफी आणि बरंच काही , मि.अॅंड मिसेस. सदाचारी, व्हॉटस्अॅप लग्न या चित्रपटातून या दोघांना आपण एकत्र पाहिले आहे. रेडिमिक्स मध्येदेखील पुन्हा आता या जोडीचा एक नवा अंदाज असण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारीत वाहणार प्रेमाचे वारे
फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे या काळात प्रेमावर आधारित अनेक चित्रपट निर्माण होत असतात. कॉलेज जीवन आणि प्रेम याचांदेखील घनिष्ठ संबंध आहे.कॉलेज डायरी,युथट्यूब आणि प्रेमवारी हे तरुणांच्या जीवनावर आणि प्रेमकथेवर आधारित चित्रपटदेखील फेब्रुवारीत प्रदर्शित होत आहेत. त्यासोबतच आता रेडीमिक्स चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याने चार प्रेमपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
अधिक वाचा
‘ती & ती’ चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता
फोटोसौैजन्य- इन्स्टाग्राम
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade