सध्या बायोपिकचा जमाना असून देशातील अनेक कर्तबगार व्यक्तिमत्वांवर चित्रपट तयार केले जात आहे. नुकताच कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज झाला आणि आता आणखी एका बायोपिकची चर्चा होऊ लागली आहे. पण ही चर्चा सिनेमाच्या निमित्ताने नाही तर अंतराळवीर राकेश शर्मा कोण साकारणार? यावर होऊ लागली आहे. या चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूत आणि विकी कौशल यांची नावे पुढे येत आहे. या स्पर्धेत विकी कौशलची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सारे जहां से अच्छा
अंतराळ विश्वात इस्रोने अनेक बदल घडवले आहेत. पण अंतराळातील पहिली भरारी आपण कधीच विसरु शकत नाही. राकेश शर्मा हे पहिले होते ज्यांनी अंतराळात ही पहिली झेप घेतली. त्या महत्वपूर्ण घटनेची माहिती देणारा बायोपिक असणार आहे ‘सारे जहां से अच्छा’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटापेक्षा या चित्रपटातील कास्टिंग जास्त चर्चेचा विषय ठरत आहे.
‘या’ हिरोकडे दिला होता सिनेमा
राकेश शर्मा साकारण्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला स्क्रिप्ट ऐकवण्यात आली होती. त्याला ती आवडली पण हा सिनेमा करण्यास त्याने नकार देत यासाठी शाहरुख खानचे नाव या रोलसाठी पुढे केले. पण शाहरुखने राकेश शर्मा अत्यंत आदर्शस्थानी आहेत. या सिनेमाला माझ्या शुभेच्छा आहेत. म्हणजे शाहरुखनेही ही भूमिका नाकारली असेच म्हणायला हवे. तर सुशांतसिंह राजपूत याने हा सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण या सिनेमाच्या निर्मात्याचे लक्ष उरी स्टार विकी कौशल याच्याकडे आहे. विकी कौशलही ही निर्मात्यांची पसंती असल्याचे कळत आहे. शिवाय विकी कौशलला या चित्रपटाची स्क्रिप्टदेखील ऐकवण्यात आली असून तो लवकरच या रोलसाठी स्क्रिन टेस्ट देणार आहे, असे कळत आहे. जर या रोलसाठी विकी कौशल उजवा ठरला तर मग मात्र सुशांतसिहं राजपूतचा पत्ता कट होईल असे म्हटले जात आहे.
राखी सावंतने काय लावला आहे ‘कानाला खडा’
विकी कौशलचाच बोलबाला
‘राझी’ या चित्रपटानंतर विकी कौशल हे नाव खूप पुढे आले. नुकताच त्याचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घालत आहेच. पण त्याहीपेक्षा विकी कौशलच्या कामाची तारीफ केली जात आहे. तर दुसरीकडे सुशांतसिंहचा ‘केदारनाथ’ हा सिनेमा येऊन गेला. पण तो येऊन गेला असे म्हायला हवे कारण या सिनेमाने म्हणावी तशी कामगिरी केली नाही. त्यामुळे कदाचित निर्मात्यांच्या मनात विकीच असावा. राकेश शर्मावर आधारीत बायोपिकची निर्मिती RSVP करत आहेत. तसं पाहायला गेलं तर सध्या सगळीकडे विकी कौशलचचा बोलबाला आहे. पण हा रोल गेला तरी सुशांतचे नुकसान होणार नाही कारण त्याच्याकडे अंतराळाशी निगडीत ‘चंदा मामा दूर के’ हा सिनेमा आहेच.काहीच दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत त्या सिनेमाची तयारी सुरु असल्याचे त्याच्या फॅन्सना सांगितले होते. शिवाय आता त्याचा ‘सोनचिडिया’ नावाचा सिनेमा देखील येऊ घातला आहे.
बॉक्स ऑफिसवर मणिकर्णिकाची घोडदौड
पाहा अमित ठाकरेंच्या लग्नाचे खास क्षण
राकेश शर्मा यांनी रचला इतिहास
राकेश शर्मा कोण हे देशातील शेंबड पोरसुदधा सांगेल. रोकेश शर्मा हे भारतीय हवाई दलातील माजी अधिकारी होते. SOYUZ- T-11 या यानातून राकेश शर्मा अंतराळात झेपावले. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा अंतराळातून देश पाहिला तेव्हा ते म्हणाले होते की, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा’ असे म्हणाले होते. म्हणूनच या चित्रपटाचे नाव ‘सारे जहां से अच्छा’ असे ठेवले असावे. राकेश शर्मा यांच्या यशस्वी अंतराळ संशोधनाने देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
(फोटो सौजन्य-Instagram)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje