खाणंपिण आणि नाइटलाईफ

गोरेगावात सुरू आहे ‘फ्लेवर्स ऑफ मालवण’ हा खाद्योत्सव

Aaditi Datar  |  Nov 23, 2019
गोरेगावात सुरू आहे ‘फ्लेवर्स ऑफ मालवण’ हा खाद्योत्सव

प्रत्येक वीकेंडला काहीतरी वेगळं करता यावं किंवा रूटीनपेक्षा वेगळं काहीतरी खावं असं अनेकांना वाटतं. मग कधी कधी गावाकडच्या जेवणाचीही ओढ लागते. पण दोन दिवसात गावी जाणं काही शक्य नसतं. तुम्ही जर मालवणी जेवणाचे खाद्यप्रेमी असाल तर तुम्हाला आता मालवणला भेट द्यायची गरज नाही. कारण गोरेगाव इथल्या हॉटेल रॅडीसनमध्ये सुरू आहे खास फ्लेवर्स ऑफ मालवण हा मालवणी फूड फेस्ट. POPxoMarathi नेही या फूड फेस्टला भेट दिली आणि येथील मालवणी पदार्थ नक्की अस्सल चवीचे आहेत का हे पाहिलं.

मालवणी जेवण म्हटलं की, डोळ्यासमोर येतात मस्तपैकी फ्राय केलेले मासे, चिकन सागुती रस्सा, कोंबडी वडे आणि भरपूर नारळाचा वापर. त्यामुळे सर्वात आधी आम्हाला येथील शेफ्सकडून फ्राय फिश सर्व्ह करण्यात आले. फ्लेवर्स ऑफ मालवण मध्ये फ्राय फिशचे चमचमीत असे अनेक प्रकार ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुरमई, बांगडा, रावस, कोलंबी आणि पापलेट अगदी सुक्या मच्छींचाही समावेश आहे. जवळा आणि सुकटी असे प्रकारही आहेत. तसंच झणझणीत सागुती चिकन रस्साही या मेन्यूमध्ये आहे. व्हेजिटेरियन्ससाठी ही मालवणी फूडफेस्टमध्ये ऑप्शन्स आहेत. व्हेजमध्ये इथे आम्ही खाऊन पाहिलं ते भरलं वागं, भेंडीची भाजी, मालवणी पद्धतीची आमटी, कोथिंबीर वडी आणि अळू वडी. हे सर्व प्रकार अगदी आँथेटिक होते. चार-पाच प्रकारच्या चटण्यांही इथे ठेवण्यात येतात. सर्वात शेवटी डेझर्टमध्ये नारळाची वडी, नारळाची बर्फी आणि करंजी आणि महत्वाची सोलकढी होती. फक्त जर तुम्हाला जास्त तिखट चवीचं मालवणी जेवण आवडत असेल तर थोडीशी निराशा होऊ शकते. कारण येथील मालवणी पदार्थ थोडे कमी तिखट आहेत. पण खरंतर यामुळे त्यांचा जास्तीत आस्वादही घेता येतो.

आम्हाला सर्वात जास्त आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे या पदार्थांच्या मांडणीतही साधेपणा पण कल्पकता होती. कारण आम्हाला सर्व्ह करण्यात आलेले सर्व पदार्थ तांब्याच्या डीशवर केळ्याचं पानं ठेवून मग देण्यात आले. तसंच आमटी आणि भेडींची भाजी ही सर्व्ह करताना नारळ्याच्या करवंटीत वाढण्यात आली. इथे भाकरीचे आणि भरलेल्या वांग्याचे लाईव्ह स्टॉल्सही खास ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला गरमागरम भाकरीचाही आस्वाद घ्यायला मिळतो.

फ्लेवर्स ऑफ मालवणसाठी खास शेफची टीम 

रॅडीसन हॉटेलचे एक्झिक्युटीव्ह शेफ कमलेश रावत यांच्या मार्गदर्शनाखाली शेफची खास टीम फ्लेवर्स ऑफ मालवणसाठी खाद्यपदार्थ बनवत आहेत.  

ख्रिसमससाठी सोप्या केक रेसिपीज

या फूड फेस्टला आज आणि उद्या जाऊन तुम्हाला सहकुटुंब मालवणी खाद्यपदार्थ चाखता येतील. मुख्य म्हणजे फेस्टिव्हलमध्ये रोजचा मेन्यू वेगवेगळा आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आणि उद्याही गेलात तर दोन्ही दिवशी वेगवेगळ्या मालवणी डेलीकसीजचा आस्वाद घेता येईल. 

 

वेळ आणि किंमत – या मालवणी फेस्टची वेळ संध्याकाळी 7:30 ते रात्री 11:30 अशी असून प्रती व्यक्ती 2,000 एवढे चार्जैस आहेत.

मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ