सौंदर्य

केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

Leenal Gawade  |  Apr 7, 2019
केस हायलाईटस करताय,मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात

केस हायलाईटस कऱण्याच्या तुम्ही विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. हायलाईटस करु नका असा सल्ला आम्ही तुम्हाला आज देणार नाही आहोत तर रंगाची निवड, काळजी यासंदर्भात तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. कारण प्रत्येक नवा ट्रेंड हा फॉलो केलाच पाहिजे पण जरा जपून

तुमचेही केस गळतायत? तुमचा आहार काही तरी चुकतोय

 केस हायलाईटस करण्यायोग्य आहेत का?

तुमच्या आवडत्या अभिनेत्रीने किंवा मैत्रिणीने हायलाईटस केले ते तुम्हाला आवडले म्हणून तुम्ही लगेच केसांवर प्रयोग करण्याचा निर्णय घेऊ नका. तुमचे केस पातळ, जाड, मुलायम, रखरखीत कसे आहेत ते स्पर्श करुन पाहा. केसांना रंग लावल्यानंतर तुमच्या केसांच्या टेक्सचरमध्ये फरक पडतो. अनेकदा केस राठ होतात. तर काहींचे केस गळायला लागतात. त्यामुळे तुमच्या हेअर एक्सपर्टकडून या संदर्भात अधिक माहिती घ्या आणि मगच तुमच्या केसांना रंग करण्याचा निर्णय घ्या.

कलरची निवड करताना

पांढरे केस काळे करण्याआधी करा हे घरगुती इलाज

तुम्ही तुमच्या केसांना रंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महत्वाची असते ती तुमच्या रंगाची निवड. रंग निवडताना तुम्हाला तुमचे वय, तुमचा वर्ण याचा विचार करायचा आहे.

उदा. तुम्ही 40 ते 50 वयाच्या दरम्यान असाल आणि तुम्ही मल्टीकलर हायलाईटस करण्याचा निर्णय घेतला तर ते तुमच्या वयाला शोभेलच असे नाही.

जर तुम्ही गव्हाळ असाल तर तुम्हाला डार्क आणि लाईट ब्लाँड रंग चांगला दिसू शकतो. जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर तुम्ही डार्क हिरवा,लाल, जांभळा असे रंग ट्राय करायला काहीच हरकत नाही. जर ऑफिसगोईंग असाल तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचा विचार करुन रंगाची निवड करायला हवी.

याशिवाय तुम्ही जिथे केस हायलाईटस करत आहात तेथील एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या.

कसे करणार आहात हायलाईटस?

हायलाईटसमध्ये तुमच्या केसांच्या बटांना काही विचार करुन रंग दिलेला असतो. यातही प्रकार आहेत तो म्हणजे  streaks आणि highlights. पहिल्या प्रकारात केसांची मोठी बट घेऊन तिला रंग केला जातो आणि हायलाईट या प्रकारामध्ये तुमच्या संपूर्ण केसांमध्ये लहान लहान बट घेऊन रंग लावला जातो. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचे आहे त्याचा विचार करा. जर तुम्ही  streaks करणार असाल तर तो तुमच्या केसांवर जास्ती दिसतो. तर highlights अधूनमधून दिसतात. आता तुम्हाला तुमचा कसा लुक हवाय ते आधी ठरवा.

केस कर्ल करताना घ्या ही काळजी

 हायलाईटस केलेल्या केसांची घ्या काळजी

केस हायलाईट केल्यानंतर तुम्हाला रंग केसांवर चांगला टिकण्यासाठी दिलेला शॅम्पूच वापरायचा आहे. त्यामागे कारण इतकेच आहे की, तुमच्या केसांवर ट्रिटमेंट केल्यानंतर त्यानुसारच शॅम्पू वापरा.

आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावा.

आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुवा आणि केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावायला विसरु नका.

 हे ही लक्षात असू  द्या

(फोटो सौजन्य- shutterstock)

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

केसांना नैसर्गिकरित्या चांगला कुरळेपणा

Home Remedies To Grow Hair Faster In Marathi

What Causes White Hair & Home Remedies To Get Rid Of It In Marathi

Important Factors To Influence Hair Growth & Home Remedies In Marathi

Read More From सौंदर्य