DIY फॅशन

Wedding Season: नऊवारी साडीवर असे निवडा फुटवेअर

Leenal Gawade  |  Oct 20, 2021
नऊवारी साडीवर निवडा खास फुटवेअर

मराठमोळी आणि पारंपरिक नऊवारी साडी नेसायला कोणाला आवडत नाही. नऊवारी साडीचा ठसका हा काही वेगळाच असतो. कधीतरी आपण नऊवारी साडी नेसतो. नऊवारी साडी नेसताना त्यावर कोणते दागिने असावे याची आपण योग्य काळजी घेतो. साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत अगदी तसेच फुटवेअरचे देखील आहे. नऊवारी साडीवर कोणते फुटवेअर घालावे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे होते असे की, साडीचा सगळा लुक खराब होतो. कोणत्याही चपा कोणत्याही लुकवर चालत नाहीत. फार विचार करुन तुम्ही त्या घालायला हव्यात म्हणजे तुमचा लुक एकदम परफेक्ट होईल 

मोजडी

Instagram

नऊवारी साड्या कितीही लांब असल्या तरी त्यातून पाय दिसतात. अशावेळी तुम्हाला हिल्स कसेही घालून चालत नाही. तुमची उंची चांगली असेल तर तुम्ही मोजडी हा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही. हल्ली बऱ्याच डिझायनर मोजडी मिळतात. ज्या तुमच्या साड्यांचा लुक वाढवतात. जर तुम्ही लग्नासाठी नऊवारी साडी नेसत असाल आणि तुम्हाला रॉयल असा लुक हवा असेल तर तुम्ही हमखास डिझायनर मोजडी निवडा या मोजडी नक्कीच चांगल्या शोभून दिसतात. मोजडीमध्ये पुढे गोलाकार असलेल्या बंद मोजडी हा पर्याय नक्की वापरुन पाहा तुम्हाला तो नक्की आवडेल.

कोल्हापुरी चप्पल

Instagram

 चपलांमधील एव्हरग्रीन असा प्रकार म्हणजे कोल्हापुरी चपला. हल्ली कोल्हापुरी चपलांना खूपच चांगले आणि स्टायलिश रुप मिळाले आहे. त्यामुळे हल्ली वेगवेगळ्या रंगाच्या आणि आणि पॅटर्नच्या कोल्हापुरी चपला मिळतात. अगदी फ्लॅट्सपासून ते हिल्स असा दोन्ही पर्याय तुम्हाला यामध्ये मिळतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो पॅटर्न हवा तो निवडू शकता. कोल्हापुरी चपला या साडीचा लुक खूपच चांगला करतात. त्यामुळे जर तुम्ही नऊवारी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर या चपला नक्की ट्राय करा.

तुमच्या कोणत्याही आऊटफिटवर घालता येतील हे #Clearheels, एकदा नक्की ट्राय करा

वेजेस

Instagram

तुमची उंची कमी असेल आणि तुमच्याकडे उंच दिसण्यासाठी हिल्स शिवाय कोणताही पर्याय नसेल तर तुम्ही नऊवारी साडीवर वेजेस नावाचा हिल्सचा प्रकार निवडायला हवा. कारण या हिल्स थोड्यातरी या प्रकारावर शोभून दिसतात. त्यामुळे नऊवारी साडीवर पेन्सिल हिल्स हा प्रकार निवडण्याऐवजी तुम्ही त्यावर कायम वेजेस हा पर्याय निवडायला हवा. त्यामुळे तुमची साडी फार वर गेली अशी दिसणार नाही. वेजेसमध्येही तुम्हाला कोल्हापुरी पॅटर्न मिळेल तो तुम्ही नक्की निवडा. म्हणजे तुम्हाला थोडी उंची मिळेल.

बॉक्स हिल्स

Instagram

वेजेस हा प्रकार तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला बॉक्स हिल्स नावाचा प्रकारही तुम्हाला नक्कीच निवडता येईल. हल्ली सँडल या प्रकारामध्ये बॉक्स हिल्ली नक्कीच मिळतात. जे कोणत्याही साडीवर चांगले शोभून दिसतात. त्यामुळे तुम्ही बॉक्स हिल्सची निवड करु शकता. हल्ली ट्रान्सफरंट हिल्स असाही प्रकार मिळतो. जो तुम्हाला फोटोसाठी किंवा एखाद्या समारंभासाठी वापरता येईल. 

आता नऊवारी साडी नेसळण्याचा विचार करत असाल तर हे फुटवेअर नक्की ट्राय करा.

अधिक वाचा

पौष महिन्यात का करू नये लग्न…शास्त्र असतं ते!

सोन्याच्या दागिन्यांची निवड करताना या गोष्टी ठेवाव्या लक्षात

लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)

Read More From DIY फॅशन