Planning

लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

Aaditi Datar  |  Sep 11, 2019
लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

तुमचं लग्न येत्या काही महिन्यात असेल तर तुमची शॉपिंगची धावपळ सुरू असेलच. लग्नासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनेक गोष्टींचं प्लॅनिंग केलं असेल. जसं वेडिंग आऊटफिट, ज्वेलरी आणि इतर कार्यक्रमांचं प्लॅनिंग. पण तुम्ही कधी लग्नात घालण्यात येणाऱ्या हारांच्या डिझाईनचा विचार केला आहे का? जर तुम्ही केला नसेल तर आता मात्र नक्की करा. कारण लग्नाच्या प्रमुख विधींपैकी हाही एक महत्त्वाचा भाग आहे.

लग्नात वधू-वरांच्या वरमालांचं महत्त्व (Significance of Varmala)

मंगलाष्टक होताच वधू-वर एकमेंकाना हार घालतात आणि या सोबतच शुभमंगल पार पडतं. आजकाल तर साखरपुड्यातही एकमेकांना हार घातले जातात. तर लग्नात घालण्यात येणारे हे हार प्रत्येक फोटोतही आवर्जून दिसतात. पण तुमच्या संपूर्ण लुकला हे फुलांचे हार चारचांदही लावू शकतात किंवा बिघडवूही शकतात. त्यामुळे या हारांना फारच महत्त्व आहे.  

तसेच मराठी लग्नाच्या गाण्याबद्दल वाचा

Instagram

खरंतर तुम्ही लग्नासाठी जेव्हा हॉल बुक करता तिथेच तुम्हाला हाराबद्दल विचारण्यात येतं. पण हॉलकडून देण्यात येणारे हार कधी कधी फारच जड आणि ओबडधोबड असतात. त्यामुळे आधीच या हारांबद्दलही माहिती करून घेतलेली बरी. नाहीतर नंतर पस्तावावं लागेल.

फुलांच्या वरमालांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)

लग्नातील सुंदर डिझाईन्सची वरमाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये भर टाकते. चला तर मग पाहूया रंगबेरंगी आणि डिझाईन्समधील वधूवरांसाठी असलेल्या खास वरमालांचे डिझाईन्स.

तसेच वाचा वधूच्या बहिणीच्या लग्नाच्या पोशाखांबद्दल 

Instagram

1. गुलाबाच्या फुलांचे हार (Rose Varmala)

गुलाबाची फुल प्रत्येकाला आवडतात. आपल्या चेहऱ्यासोबतच प्रत्येक आऊटफिटलाही गुलाब छान मॅच करतात. त्यामुळे सध्या गुलाबाच्या वरमाला फारच ट्रेंडमध्ये आहेत. खासकरून विरूष्का म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर. लक्षात आहेत का या क्युट कपलच्या लग्नातील सुंदर गुलाबाचे हार. या हारांमध्ये तुम्ही दोन प्रकारे हार निवडू शकता. इंग्लिश कलर्समधील गुलाबाचे हार किंवा टिपिकल लाल गुलाबाच्या वरमाला.

Instagram

2. हलक्या आणि चांगल्या लग्नाचे हार (Lightweight Varmala)

काही वेळा या वरमाला फारच जड होतात आणि वधू-वरांच्या खुर्चीवर ठेवलेल्या आढळतात. हे टाळायचं असल्यास तुम्ही हलक्या वरमालांची निवड करू शकता. ज्या दिसायलाही फारच सुंदर असतात. या वरमालांमुळे तुमच्या वेंडिग लुकला नक्कीच चारचांद लागतील.

वैवाहिक प्रवेश कल्पना देखील वाचा

Instagram

3. मोत्यांच्या लग्नाचे हार (Varmala of Pearls)

जर तुम्हाला फुल वाया घालवायची नसल्यास किंवा तुमच्या वरमाला लग्नानंतरही जपून ठेवायच्या असल्यास सर्वात चांगला ऑप्शन आहे मोत्याच्या वरमाला. ज्यांना साध्या आणि क्लासिक लुकची आवड असेल त्यांच्यासाठीही मोत्याच्या माळांचा पर्याय चांगला आहे.

वाचा – Blouse Back Designs In Marathi

Instagram

4. शाही टच (Royal Varmala)

आता तुम्ही म्हणाल या प्रकारात खास असं काय आहे. तर या वरमालांमध्ये फक्त फुलंच नाहीतर रिबन आणि इतर सजावटीचाही वापर केला जातो. ज्यामुळे या वरमालांना मिळतो शाही टच.

Also Read About Preparation For Bride In Marathi

Instagram

5. पान आणि फुलांच्या रंगबेरंगी वरमाला (Colourful Varmala)

पानांचा आणि रंगीबेरंगी फुलांचा वापर करून बनवलेल्या वरमाला फारच आकर्षक आणि सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला जास्त शाही वरमाला नको असल्यास हा पर्याय चांगला आणि ईकोफ्रेंडली आहे. 

6. ब्लॉक टेक्नीक डिझाईन (Block Technique Design)

Pinterest

जर तुम्हाला नेहमीच्या फुलांच्या वरमालांपेक्षा काही हटके हवं असल्यास हा चांगला पर्याय आहे. यामध्ये विविध रंग आणि ब्लॉक टेक्नीक वापरून वरमाला डिझाईन केल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमच्या वेडिंग आऊटफिटला मॅचिंग वरमालाही बनवून घेऊ शकता.

Also Read Importance Of Wedding Vows In Marathi

वरमालांची शॉपिंग करा इथे (Garland Shopping In Mumbai)

Instagram

मुंबईमध्ये सुंदर वरमाला मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे सेंट्ल माटुंग्यातील फुल मार्केट. इथल्या माटुंगा पोस्ट ऑफिसजवळ अनेक फुलांची दुकान असून इथल्या सुंदर वरमाला तुमचं लक्ष वेधून घेतात. याशिवाय तुम्ही दादरलाही वरमालाचं शॉपिंग करू शकता. या दोन ठिकाणी तुम्हाला होलसेल भावात वरमाला मिळतील.

मग तुमच्या लग्नासाठी वरमालांची निवड आधीच करा.

हेही वाचा – 

स्टायलिश ब्रायडल फुटवेअर

तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला ‘हळद’

Read More From Planning