भविष्य

तुमच्या नखांच्या आकारावरून ओळखा तुमचा स्वभाव

Trupti Paradkar  |  Oct 31, 2019
तुमच्या नखांच्या आकारावरून ओळखा तुमचा स्वभाव

प्रत्येक व्यक्ती एकमेकांपासून वेगळी असते. शरीराची ठेवण, रंग, रूप, बोलण्याची शैली, उंची प्रत्येकाची वेगळी असते. एवढंच नाही तर हातापायांचा आकार, बोटांचे ठसे, डोळ्यांचा रंग तर प्रत्येकाचा निरनिराळा असतो. अगदी दोन जुळ्या मुलांमध्येदेखील अनेक शारीरिक फरक असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नखांचा आकारही वेगवेगळा असतो. तुमच्या नखांच्या आकारावरून तुमचा स्वभाव समजू शकतो.आज आपण तुमच्या नखांच्या आकारावरून तुमच्या स्वभावाचा अंदाज शेअर करणार आहोत. तुम्ही तुमच्या नखांच्या आकाराप्रमाणे आम्ही दिलेल्या अंदाजानुसार तुमचा स्वभाव आहे का ते नक्कीच तपासू शकता. नखांमध्ये गोलाकार, चौकोनी, गोलाकार चौकोनी, ओव्हल, बदामाच्या आकाराची असे अनेक आकार दिसून येतात. तुमच्या नखाचा आकार आणि तुमचा स्वभावातील वेगळेपण ही तुमची अनोखी ओळख ठरू शकते. या गोष्टीवर तुमचा विश्वास असो वा नसो तज्ञ्जांच्या मते तुमच्या नखांच्या आकाराप्रमाणे तुमच्या स्वभावात फरक असू शकतो. 

लांबसडक नखे

प्रत्येकीला आपली नखे लांबसडक असावी असं वाट असतं. काही जणींना यासाठी प्रयत्न करावे लागतात तर काही जणींची नखे आपोआप लांबसडक होतात. ज्यांची नखे नैसर्गिक पद्धतीने लांब होतात. अशा व्यक्ती प्रेमळ स्वभावाच्या असतात असं म्हणतात. लांबसडक नखं असलेल्या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात शिवाय त्यांच्याकडे कोणतेही काम  कौशल्याने करण्याचे कसब असते. शिवाय त्या खूपच रोमॅंटिक असल्यामुळे त्या एक चांगल्या जोडीदार असू शकतात. 

आखुड नखे

ज्यांच्या नखांचा आकार कमी उंचीची आणि रुंद आकाराची असतात त्या व्यक्ती निरोगी असतात. अशी माणसे आरोग्याबाबत सतत जागरूक असतात. ज्यांचे विचार अगदी स्पष्ट आणि बोलण्याची पद्धत अगदी रोखठोक असते. हात शक्तीशाली असल्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची ताकद इतरांपेक्षा अधिक असते. 

चौकोनी नखे

काही लोकांच्या नखांचा आकार चौकोनी असतो. चौकोनी नखाच्या आकाराची माणसे स्वभावाने कठोर असतात. इतरांना वेळप्रसंगी अधिकारवाणीने बोलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. लोकसमूह निर्माण करण्याची आणि नेतृत्व करण्याची आवड त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे ते टीमलीडर असण्याची शक्यता अधिक असते. 

ओव्हल शेपची नखे

बऱ्याच लोकांच्या नखांचा आकार लांबट गोल किंवा अंडाकृती असतो. अशा प्रकारची नखे असलेली माणसे  अबोल वृत्तीची असतात. ज्यांना इतरांमध्ये मिसळणे, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, पार्टीला जाणे मुळीच आवडत नाही. कुटुंब आणि स्वतःवर अधिक प्रेम असल्याने अशा व्यक्ती कुटुंबवत्सल असतात. मुलांवर आणि जोडीदारावर विशेष प्रेम असते. असे लोक व्यवसायापेक्षा नोकरीत जास्त रमतात. 

बदामी आकाराची नखे

बदामी शेप असलेल्या नखांचा शेप म्हणजे टोकाकडे निमूळती झालेली नखे. ज्यामुळे त्यांच्या नखांचा आकार बदाम या सुक्यामेव्याप्रमाणे वाटतो. बदामी आकाराची माणसे इतरांशी सलोख्याने वागतात. दुसऱ्यांच्या मनाचा विचार स्वतःपेक्षा जास्त करतात. ज्यामुळे अशा लोकांशी केलेली मैत्री आयुष्यभर टिकते. व्यवसायात अशा लोकांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 

फोटोसौजन्य –  इन्साग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा- 

डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा ‘आई’ आहात

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

Read More From भविष्य