Sex Advice

Female condoms संदर्भात तुम्हाला काय माहीत आहे

Leenal Gawade  |  Apr 3, 2019
Female condoms संदर्भात तुम्हाला काय माहीत आहे

अजूनही कंडोम हा शब्द मोठ्याने उच्चारायला अनेक लोक लाजतात.कंडोमबदद्ल उघड उघड माहिती घ्यायला देखील घाबरतात. तर  Female Condoms बाबत तर उघड बोलण्याची शक्यता तर धुसरच आहे. कारण आम्ही जेव्हा महिलांना Female condoms बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर साधारण 50टक्के महिलांनी या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली.पण उरलेल्या 50 टक्के महिलांना मात्र हा विषय नकोसा वाटला. पण महिलांना त्यांच्या आरोग्याशी आणि व्हजायनाशी निगडीत सगळ्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज Female condoms बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

काही महिलांनी शेअर केला त्यांच्या पहिल्या सेक्सचा अनुभव

पुरुषांच्या कंडोम प्रमाणेच हे कंडोम असते. फक्त पुरुषांच्या कंडोमच्या तुलनेत याचा आकार मोठा असतो.  फोटोत दाखवल्याप्रमाणे याची रिंग ही तुमच्या व्हजायनाकडे येते.हे कंडोम पॉलिथरीन आणि लॅटेक्स मटेरिअलमध्ये असते. या मटेरिअलमुळेही अनेक प्रश्न महिलांच्या मनात येतात  

आता याचा आकार पाहिला तर हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे  की हे वापरायचे कसे?जर तुम्हाला टॅम्पॉन वापरायची माहिती असेल तर अगदी त्याचप्रमाणे तुमच्या व्हजायनामध्ये हे इन्सर्ट करायचे असते. जरी तुम्हाला ते त्रासदायक वाटत असले तरी ते नाही. कारण याच्या मटेरिअलमुळे ते सहज आत जाते. शिवाय तुम्हाला कंडोम आत जायची भिती असेल तर या कंडोमच्या उघड्या भागावर एक रिंग असेत जी व्हजायनाच्या बाहेरच्या बाजूला राहते त्यामुळे ते आत जाण्याची शक्यता नसते. या कंडोमचा काही भाग बाहेर राहतो. सेक्स झाल्यानंतर हे कंडोम तुम्हाला थोडे ट्विस्ट करुन काढायचे असते.

वाचा – How To Avoid Pregnancy In Marathi

Female Condomsचे काम पुरुषांच्या कंडोमपेक्षा थोडे अधिक आहे.  हे कंडोम केवळ प्रेग्नंसीच रोखत नाही तर पेनिसमुळे महिलांना होणाऱ्या अॅलर्जी देखील यामुळे होत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे  Female Condoms कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

या कारणांमुळे पुरुषांना आवडतात तुमचे बुब्स

आता महिलांना पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे Female condoms वापरणे सुरक्षित आहे का? आतापर्यंत Female condoms कंडोम संदर्भातील कोणत्याही चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत किंवा कोणताही अपघात यामुळे झालेले समोर आले नाही. पण जर तुम्ही वापरण्याच्या विचारात असाल तर एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या

भारतातच नाही तर जगभरातच  Female Condoms कंडोमचा वापर तुलनेने कमी आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे हे कंडोम वापरण्यासंदर्भात महिलांमध्ये तशी जनजागृती नाही. त्यामुळेच महिला हे वापरण्यासंदर्भात अनेक कारणे देतात. त्यापैकीच काही कारणे पुढील प्रमाणे

  1. Female Condoms कंडोम्स हे पुरुषांच्या कंडोमपेक्षा अधिक महागडे असते.त्यामुळे ते घेताना महिला फार विचार करतात
  2. Female Condoms सगळीकडे मिळतातच असे नाही.
  3. ज्यांनी  Female Condoms कंडोम वापरुन पाहिले आहे. त्यांना सेक्स करताना येणारा याचा आवाज आवडत नाही.
  4. महिलांना या कंडोमची रिंगही त्रासदायक वाटते.   

तुम्हाला या १० सेक्स पोझिशन हमखास देतील प्लेझर

(सौजन्य- shutterstock)

Read More From Sex Advice