DIY फॅशन

ब्रा घालणे सोडले तर शरीरात होतात हे बदल, अवश्य जाणून घ्या

Dipali Naphade  |  Apr 5, 2022
what-happen-to-your-body-if-you-stop-wearing-bra-in-marathi

महिलांसाठी रोज ब्रा (Bra) घालून वावरणे हे एखाद्या टास्कपेक्षा नक्कीच कमी नाहीये. ऑफिसमधून आल्यावर अथवा दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेव्हा ब्रा काढतो तेव्हा अनेक महिलांना सुटकेचा श्वास घेतल्यासारखे नक्कीच वाटत असेल. ब्रा चा आकार (Shape of Bra) नक्कीच वेगवेगळा असतो पण ब्रा घालून दिवसभर राहणं हे खूपच बंधनकारक वाटतं. ब्रा ही महिलांसाठी जितकी महत्त्वाची (Importance of Bra) आणि गरजेची गोष्ट आहे तितकंच ती त्रासदायक गोष्टही आहे. पण ब्रा घालणे गरजेचे का आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे की नाही? सामाजिकदृष्ट्या सोडलं तर महिलांच्या शरीराच्या दृष्टीनेही ब्रा घालणे गरजेचे आहे. ब्रा घालणे सोडले तर शरीरामध्ये नक्की काय फरक पडतात याबाबत काही महत्त्वाची माहिती. 

मान दुखू शकते 

ज्या महिलांचे स्तन मोठे (Big Boobs) असतात त्यांना स्तनांना सावरण्यासाठी ब्रा ची गरज अधिक असते. तुमच्या स्तनांच्या कपचा आकार जास्त मोठा असेल तर मानेवर अधिक जोर येतो आणि त्यामुळे मान दुखण्याचा त्रास अधिक होण्याची शक्यता असते. याशिवाय खांद्याचे दुखणेही यामुळे उद्भवू शकते. त्यामुळे ब्रा घालणे सोडणे अशा महिलांना त्रासदायक ठरू शकते. वास्तविक अनेक जण स्तनांशी निगडीत व्यायाम, ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी याबाबतही चर्चा करतात पण त्याहीपेक्षा योग्य फिटिंगची ब्रा तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरते. किमान जितका वेळ तुम्ही घराबाहेर आहात आणि काम करत आहात तोपर्यंत तरी तुम्ही ब्रा घालणे उत्तम आहे. ब्रा केवळ रात्री झोपताना काढून ठेवणे योग्य आहे. 

शरीराच्या पोश्चरवर फरक पडू शकतो

ब्रा घातली नाही तर तुमच्या शरीराच्या पोश्चरवरही फरक पडतो. हेदेखील तुमच्या स्तनांच्या वजनावर निर्धारित आहे. लहान स्तन (Small Boobs) असणाऱ्या महिलांना याचा जास्त त्रास होत नाही. मात्र मोठे स्तन (Big Boobs) असणाऱ्या महिलांना मात्र नक्कीच याचा त्रास होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, लहान स्तन असणाऱ्या महिलांना ब्रा न घालण्याचा त्रास होत नाही. अशा महिलांनाही पोश्चरचा त्रास होऊ शकतो. हे ग्रॅव्हिटीमुळे होते, कारण ग्रॅव्हिटीमुळे आपले खांदे खाली वाकू लागता. अशा बाबतीत ब्रा महिलांना अधिक सपोर्ट देते आणि हाडांच्या समस्या दूर राखण्यास मदत करते. त्यामुळे सहसा ब्रा घालणे टाळू नका. तसंच कोणत्या ब्रा मुळे नुकसान होते हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे. 

व्यायाम करताना स्तनांना दुखापत होऊ शकते

तुम्ही ब्रा न घालता व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर असा विचारही करू नका. असे केल्यामुळे व्यायाम करताना स्तनांना त्रास होऊ शकतो आणि ज्या महिलांचे स्तन मोठे आहेत, त्यांच्या ब्रेस्ट टिश्यूंमध्येही दुखापत होऊ शकते. कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करताना स्तनांची हालचाल ही होतेच. त्यामुळे ब्रा न घालता व्यायाम केल्यास, तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसंच व्यायाम करताना शरीराची हालचाल अधिक होते आणि स्तनांचीही. अशावेळी स्पोर्ट्स ब्रा ही अधिक फायदेशीर ठरते. तुम्हाला नेहमीची ब्रा वापरायची नसेल तर तुम्ही अशावेळी स्पोर्ट्स ब्रा चा उपयोग करून घ्या. 

ब्रेस्ट सॅगिंगची होऊ शकते समस्या 

जसे आम्ही वर म्हटले की, ग्रॅव्हिटीचा परिणाम हा स्तनांवर होत असतो आणि ब्रा अधिक काळ घातल्यास, ब्रेस्ट सॅगिंगच्या समस्येला (Breast Sagging) महिलांना सामोरे जावे लागते. अधिक मोठ्या स्तनांच्या महिलांना नेहमी ब्रेस्ट सॅगिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे ब्रा न घालता वावरल्यास, या गोष्टींना अधिक प्रोत्साहन दिल्यासारखे होते. यामुळे स्तनांमध्ये दुखणे आणि सॅगिंग वाढते. असं अजिबात नाही की, तुम्ही कायम ब्रा घालून राहायला हवे. पण सतत ब्रा काढून वावरणेही योग्य नाही. याचा समतोल राखता आला पाहिजे. 

कुठे ब्रा वापरायलाच हवी?

ब्रा किती वेळ घालायची नाही हे संपूर्णतः तुमच्या शरीरावर अवलंबून आहे. प्रत्येक क्षणी ब्रा घालून राहणे नक्कीच योग्य नाही. पण तुम्हाला हेदेखील लक्षात ठेवायला हवे की, तुमच्या स्तनांना सपोर्टची गरज भासते. 

कोणत्या वेळी ब्रा घालणे ठरू शकते नुकसानदायक 

काही गोष्टीत ब्रा घालणे नुकसानदायक ठरू शकते. या नक्की कोणत्या गोष्टी आहेत याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे 

तुम्हाला कोणती ब्रा साईज घ्यायची आहे याबाबत तुम्हाला जर काहीही गैरसमज असतील तर तुम्ही वेळीच तज्ज्ञांकडून सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे ब्रा घाला. ब्रा घालणे मात्र कधीही सोडू नका. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन