DIY लाईफ हॅक्स

लग्नासाठी योग्य वय नेमके कोणते, तुमचं काय बरं म्हणणं आहे…

Dipali Naphade  |  Apr 14, 2020
लग्नासाठी योग्य वय नेमके कोणते, तुमचं काय बरं म्हणणं आहे…

 

 

वयाची साधारण बावीशी उलटली की प्रत्येक घरात लग्नाचं टुमणं मुलींच्या मागे सुरू होतं. तर मुलांचे 26 वय होऊन गेले की घरचे लग्न कर म्हणून मागे लागतात. पण लग्नासाठी नेमके योग्य वय काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. याचे उत्तर तसे तर मिळणे कठीण आहे.  कारण लग्न करणं अथवा न करणे ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. पण आपल्याकडे लग्न करण्यापूर्वी प्रत्येकाला हल्ली व्यवस्थित सेटल व्हायचं असतं. त्यामुळे बऱ्याचदा लग्नाचं वय निघून गेलं असंही म्हटलं जाते. त्यामुळेच आपण आता जाणून घेऊया नक्की सर्वानुमते लग्नाचे योग्य वय काय आहे. 

सर्व्हेनुसार लग्नाचे वय

Shutterstock

 

युनिव्हर्सिटी ऑफ उताहच्या प्रोफेसर निकोसल एच. वेल्फिंगर द्वारे करण्यात आलेल्या एका शोधानुसार लग्नाचे योग्य वय हे सर्व्हेमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे साधारण 28 ते 32 इतके आहे. हे वय लग्नासाठी परफेक्ट मानण्यात आले आहे. मात्र जर आपण प्रत्यक्षात विचार केला तर प्रत्येकासाठी हे वय वेगवेगळे दिसून येते. भारतामध्ये साधारण 20-25 वयामध्ये लग्न होणे हे योग्य वय मानण्यात येते तर आजकालच्या ट्रेंडनुसार 30-35 हे लग्नाचे वय झाले आहे. काही जण तर अगदी चाळीशीमध्येही लग्न करतात तर काही जण लग्न न करताच तसेच राहणे योग्य समजतात.

लग्नात वधूवरांना आर्शीवाद देण्यासाठी ’25’ शुभेच्छा संदेश (Marriage Wishes In Marathi)

लग्नासाठी योग्य वयाचा बायोलॉजिकल तर्क

Shutterstock

लग्नासाठी दोघांमध्ये असणाऱ्या वयाचा फरक हा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक या तिन्ही पातळीवर असतो. त्यामुळे वय वाढण्याचे तोटे पुरुषांपेक्षा महिलांना अधिक जाणवत असल्याचे लक्षात आहे. त्यामुळे बऱ्याचदा मुलांचे लग्नाचे वय 28 आणि मुलीचे लग्नाचे योग्य वय हे 25 असावे असे म्हटले जाते. हा केवळ संसार करण्यासाठी बायोलॉजिकल तर्क करण्यात आला आहे. पण व्यक्तिपरत्वे या गोष्टी अर्थातच बदलत जातात.

लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स

तज्ज्ञांनुसार लग्नाचे योग्य वय

instagram

गायनॉकॉलॉजिस्ट श्वेता पाटीलशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, लग्नासाठी मुलींचे योग्य वय हे 22 – 25 दरम्यान असायला हवे.  या वयात लग्न केल्यास, तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सर्वात चांगली बाब म्हणजे दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जास्त वेळ मिळतो. तसंच दोघेही या वयात खूप उत्साही असतात आणि दोघांचेही आपल्या करिअरसाठी अनेक प्रयत्न आणि स्वप्नंही असतात. त्यामुळे दोघे एकत्र मिळून ही स्वप्नं पूर्ण करू शकतात. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना जन्म देताना तुम्ही त्यांना व्यवस्थित वेळ देऊ शकता. कारण योग्य  वयात हा निर्णय घेतला तर तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये तुम्ही साधारणतः पन्नाशीचे असता आणि त्यामुळे तुम्ही आरोग्यानेही फिट असता. तिशीच्या आतमध्ये मुलांना जन्म देताना जास्त त्रास होत नाही. 

भारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा

या वयात अजिबात लग्न करू नका

वयाच्या 13 – 18 या वयामध्ये लग्न करू नका. हे ना विज्ञानानुसार योग्य आहे ना प्रशासनानुसार. साधारण 18 वर्षानंतरच बुद्धी आणि शरीर हे दोन्ही परिपक्व होत असतं.  त्यामुळे त्यानंतरच लग्नाचा विचार करणं योग्य आहे. तसंच तुम्ही जर चाळीशी पार केली असेल तरीही लग्नाचा विचार करणं तुमच्यासाठी योग्य नाही. हे शारीरिकदृष्ट्या सांगण्यात आलं आहे. 

Ukhana In Marathi

Read More From DIY लाईफ हॅक्स