Natural Care

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशीचं हे आहे ब्युटी सिक्रेट

Trupti Paradkar  |  Nov 18, 2020
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशीचं हे आहे ब्युटी सिक्रेट

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येकीला नितळ आणि चमकदार त्वचा हवी असते. बऱ्याचदा स्टायलिंगसाठी चाहते एखाद्या आवडत्या सेलिब्रेटीला फॉलो करत असतात. आजकाल अनेक सेलिब्रेटी त्यांच्या सोशल हॅंडलवरून त्यांचं स्किन आणि हेअर केअर रूटिन शेअर करत असतात. जर तुम्हाला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम नायरा म्हणजेच शिवांगी जोशी खूप आवडत असेल. तर तिच्याप्रमाणे दिसण्यासाठी तुम्ही तिने शेअर केलेलं हे ब्युटी सिक्रेट नक्कीच फॉलो करू शकता.

दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने –

त्वचा सुंदर आणि हायड्रेट राखण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि त्वचेमध्ये ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याची अत्यंत आवशक्ता असते. शिवांगी जोशी दिवसभर शूटिंगमध्येय व्यस्त असली तरी सतत पाणी पिते ज्यामुळे तिची त्वचा कायम तजेलदार दिसते. याशिवाय ती दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करते. ज्यामुळे तिची पचनक्रिया सुधारते शिवाय शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाऊन त्वचेवर चांगला परिणाम होतो.

झोपण्यापूर्वी करायलाच हवं हे काम –

झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे फार आवश्यक असते. कारण त्यामुळे दिवसभर त्वचेवर जमा झालेली धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण निघून जातात आणि त्वचेचे पोअर्स मोकळे होतात. शिवांगी तर दिवसभर मालिकांचे शूटिंग करत असते. त्यामुळे सहाजिकच दिवसाचे दहा ते बारा तास तिच्या चेहऱ्यावर मेकअप असतो. मात्र रात्री झोपण्यापूर्वी ती तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप काढते आणि भरपूर मॉईस्चराईझर लावते. ज्यामुळे झोपल्यावर रात्रभर तिच्या त्वचेची निगा राखली जाते. 

सनस्क्रिनला पर्याय नाही –

उन्हाळा असो वा कोणताही ऋतू तुमच्या त्वचेला सुर्यप्रकाशातील प्रखर किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रिनची गरज नक्कीच असते. शिवांगीदेखील मेकअप नसताना त्वचेला नियमित सनस्क्रिन लावते. ज्यामुळे तिला सनटॅन अथवा त्वचेच्या इतर समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. 

महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा घरगुती फेसपॅक बेस्ट –

बाजारात जरी महागडे ब्युटी प्रॉडक्ट उपलब्ध असले. तरी घरगुती उपाय आणि नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेले फेसपॅक याला काहीच पर्याय नाही. कारण यामुळे तुमचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय त्वचेचं नुकसान कमी होतं. म्हणूनच शिवांगीदेखील त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय आणि फेसपॅक यांचा वापर जास्त करते. 

घरातील साधे जेवण त्वचेसाठी आहे उत्तम –

एका लोकप्रिय मालिकेची अभिनेत्री असल्यामुळे तिला सतत शूटिंग आाणि इतर कामांसाठी घराबाहेर राहवं लागतं. मात्र असं असलं तरी ती बाहेरचे पदार्थ खूप कमी प्रमाणात खाते. जंक फूड आणि इतर तेलकट पदार्थ टाळत तिला घरातून नेलेला डबा फार प्रिय आहे. शिवांगीच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात असतो. घरातील साधं पण पौष्टिक खाण्यामुळेच तिची त्वचा निरोगी आणि सुंदर आहे. तुम्हालादेखील असं सौंदर्य हवं असेल तर घरच्या पौष्टिक खाण्याला पर्याय नाही हे मनाशी पक्कं ठरवा. 

शिवांगी जोशीचं हे ब्युटी सिक्रेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हीदेखील ते फॉलो केलं का हे आम्हाला जरूर कळवा. शिवाय मायग्लॅमचे स्किन केअर प्रॉडक्ट ट्राय करायला विसरू नका. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)

अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

त्वचेवर अती प्रमाणात मॉईस्चराईझर लावण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कसं

Read More From Natural Care