आजकाल वॉटर बर्थचं प्रमाण वाढलं आहे. खासकरून भारतातही पद्धत एवढी प्रचलित नसली तरी परदेशात या पद्धतीलाच खूप पसंती आहे. वॉटर बर्थ टेक्नीकमध्ये पाण्याच्या आत बाळाची प्रसूती केली जाते. बॉलीवूड सेलिब्रिटीजपैकी अभिनेत्री कल्की केकला बाळाला जन्म देण्यासाठी वॉटर बर्थच्या माध्यमाचा वापर करणार आहे. तिच्या आधी सेलिब्रिटी ब्रूना अब्दुल्लानेही या पद्धतीचा वापर केला होता. चला जाणून घेऊया वॉटर बर्थ आणि त्याच्या वाढत्या चलनाबाबत.
काय आहे वॉटर बर्थ
Water Birth ही प्रसूतीची एक पद्धत आहे. वॉटर बर्थ डिलीव्हरी नॉर्मल डिलीव्हरीची आधुनिक पद्धत आहे. यामध्ये पाण्याचा वापर केला जातो. पाण्याच्या मोठ्या टबात गर्भवती महिलेला बसवून पाण्यात बाळाची डिलेव्हरी केली जाते. डॉक्टरांच्या मते वॉटर डिलीव्हरीमध्ये लेबर पेन कमी होतात. तसंच बाळाला जन्म देणंही सोपं होतं.
वॉटर बर्थ डिलीव्हरीचे फायदे
पाण्याच्या आत महिलांच्या शरीरात एडोर्फिन हार्मोनची मात्रा जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे वेदना कमी होतात. डिलीव्हरीच्या वेळी गरम पाण्याचा वापर केल्यास वेदना कमी होतात आणि गर्भवती महिलेला पेन किलर देण्याची गरज 50% कमी होते.
तणाव कमी होण्यास मदत
या डिलीव्हरीदरम्यान महिलांचा तणाव 60% कमी होतो. नॉर्मल डिलीव्हरीदरम्यान मुलाला जन्म देताना खूप खेचल्यासारखं वाटतं, ज्यामुळे वेदना वाढतात. वॉटर बर्थदरम्यान या वेदना कमी होतात. कारण गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने टिश्यूज सॉफ्ट होतात. त्यामुळे या प्रसूती प्रकारात महिलांना कमी दुखतं.
वाचा – Naming Ceremony Quotes in Marathi
कशी केली जाते वॉटर बर्थ डिलीव्हरी
या डिलीव्हरीसाठी कोमट पाण्याचा बर्थिंग पूल तयार केला जातो. यामध्ये जवळपास 500 लीटर पाणी भरलं जातं. या पूलचं तापमान कायम ठेवण्यासाठी यावर वॉटर प्रूफ उपकरणं लावली जातात. हे तापमान प्रेग्नंट महिलेच्या शरीरानुसार एडजस्ट केलं जातं. लेबर पेन सुरू होताच तीन-चार तासातचं महिलेला या पूलमध्ये बसवलं जातं. या डिलीव्हरीला नॉर्मल डिलीव्हरीपेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळे बाळाला जन्म देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मुख्य म्हणजे पद्धतीत बाळाला आईच्या गर्भासारखंच वातावरण मिळतं. पाण्यामुळे बाळाचं ब्लड सर्क्युलेशनही योग्य राहतं. त्यामुळे डिलीव्हरी सोपी होते.
आई आणि बाळ राहतं इंफेक्शन फ्री
या पद्धतीमध्ये आई आणि बाळ इंफेक्शन होण्याची भीती 80% कमी होते. तसंच पाण्यात राहिल्याने महिलांना तणाव आणि भीतीही वाटत नाही. विशेष म्हणजे यादरम्यान बीपीसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं.
ही डिलीव्हरी पद्धत महाग असली तरी आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगली आणि सुरक्षित आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
#Viralvideo : समीरा रेड्डीने सांगितला प्रेग्नन्सीचा ‘खरा’ पैलू
#Pregnancy मध्येही राहा फॅशनेबल