खाणंपिण आणि नाइटलाईफ

पानात वाढण्यासाठी गोडाचे हे पाच पदार्थ आहेत एकदम बेस्ट

Leenal Gawade  |  Jun 28, 2021
पानात वाढण्यासाठी गोडाचे हे पाच पदार्थ आहेत एकदम बेस्ट

काही खास कार्यक्रम असेल आणि घरात स्वीट नसेल असे अजिबात होत नाही. अशा खास प्रसंगी पानात नेमका कोणता गोड पदार्थ वाढावा हे खूप जणांना कळत नाही. त्यामुळे बरेचदा ठेवलेले गोड पदार्थ अधिक खाल्ले जात नाही. पण तुमच्या जेवणाच्या कॉम्बिनेशनवर काही खास गोष्टी अवलंबून असतात. त्यानुसार तुम्ही स्वीट निवडले तर त्याची चव अधिक चांगली लागते आणि असे पदार्थ खाण्याची इच्छा देखील तीव्र होते. जर तुम्हाला काही खास गोड पदार्थ खायचे असतील तर तुम्ही पानात कोणते गोड पदार्थ वाढायला हवेत ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे ’10’ प्रकार

गुलाबजाम

Instagram

गुलाबजाम हा प्रकार खूप जणांचा ऑलटाईम फेव्हरेट अशा प्रकारातील आहे. खूप जणांना गुलाबजाम नक्कीच आवडत असतील. पाकात बुडवलेले मस्त गरम गरम गुलाबजाम खाण्याची मजा ही वेगळीच असते. घरात गोड किंवा नॉन- व्हेज असे कोणतेही जेवण असेल तर तुम्ही पानात गुलाबजाम ठेवा. कारण गुलाबजाम हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. गुलाबजाम पानात एक जरी वाढला तरी देखील त्याची चव पटकन वाढते. त्यामुळे व्हेज आणि नॉन- व्हेज पद्धतीचे जेवण असेल तर तुम्ही गुलाबजाम अगदी हक्काने वाढा.

प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…

अंगुरी बासुंदी

Insraram

अंगुरी बासुंदी हा प्रकार देखील थोडासा वेगळा आणि मस्त आहे. खूप जणांना हा प्रकार खूप आवडतो. अंगुरी बासुंदीमध्ये वेगवेगळे फ्लेवर आणि प्रकार मिळू शकतात. दुधात केशर घालून, ते उकळून आणि त्यामध्ये पनीरचे उकडलेले गोळे घालून अंगुरी बासुंदी तयार केली जाते. जर तुमचे जेवण थोडेसे कोरडे झाले असेल तर तुम्ही अगद हमखास अंगुरी बासुंदी घ्या. ही चवीला फारच चविष्ट लागते.

जिलेबी

Instagram

जिलेबी हा असा प्रकार आहे ज्याने प्रत्येक चांगल्या कार्यात अनेकांचे तोंड गोड केले आहे. जिलेबी हा प्रकार व्हेज-नॉन-व्हेज अशा दोन्ही प्रकारावर चांगला लागतो. त्यामुळे जरी तुम्ही अगदी साधे जेवण केले असेल आणि तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तु्ही अगदी डोळे बंद करुन जिलेबी हा पदार्थ घ्या. कारण जिलेबी या देखील गुलाबजामप्रमाणे खूप जणांचा ऑल टाईम फेव्हरेट गोडाचा पदार्थ आहे. मस्त मठ्ठा (ताक) आणि जिलेबी असेल तर कोणतेही व्हेज जेवण छान पूर्ण होते.

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

मोदक

Instagram

गणपतीला आवडणारे मोदक हे खूप जणांच्या आवडीचे असतात. एखाद्या उपवासाच्या दिवशी किंवा छान व्हेज जेवणाचा थाट असेल तेव्हा आवर्जून पानात मोदक असायला हवे. मोदक जेवणात असेल तर ते जेवण दोन घास अधिक जाते. त्यामुळे मोदक तर संकष्टी, चतुर्थी किंवा गणपतीच्या काळातील सगळ्या जेवणात पानात असायला हवा. मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार… वा… हे लिहूनच तोंडाला पाणी सुटतं. मोदक हा थोडा मेहनतीने करावा लागणारा असा प्रकार आहे. पण उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आपलेपणाची जाणीव करुन देतात.जे खाल्ल्यामुळे खूपच मजा येते. 

लापशी

Instagram

खूप जणांकडे आजही नाश्त्याला किंवा सहज म्हणून लापशी करण्याची पद्धत आहे. लापशीच्या रव्यापासून तयार झालेली ही लापशी थोडीशी कमी गोड असते. पण खूप वेळा जेवणाचा घाट घातला असेल तर सगळ्यात सोपी पडणारी अशी रेसिपी म्हणजे लापशी. लापशीचा रवा आणून तो तुपात तळून त्यावर रव्याच्या शिऱ्यासारखे संस्कार केले जातात. त्यामुळे त्याची चव अधिक वाढते. असा हा लापशी हा पदार्थ देखील तुम्ही जेवणात ठेवायला हवा. तुम्हाला नक्की आवडेल.

आता पानात गोड वाढायचा विचार असेल तर हे काही पदार्थ तुम्ही नक्की वाढू शकता. 

 

 

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ