DIY फॅशन

लग्नातील लेहंगा आणि साड्यांचे करायचे काय?, मिळवा तुमच्या प्रश्नाचे उत्तर

Leenal Gawade  |  Aug 10, 2020
लग्नातील लेहंगा आणि साड्यांचे करायचे काय?, मिळवा तुमच्या प्रश्नाचे उत्तर

लग्नात हटके दिसण्याची हौस सगळ्यांचीच असते. लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधींसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे निवडतो. डिझायनर, हेवी वर्क केलेले हे ड्रेस त्या दिवसासाठी तुम्हाला खास लुक देत असले तरी घरी आल्यानंतर या हेवी लेहंगा आणि डिझायनर साड्यांचे नेमके काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो.कारण असे कपडे एकदा घातल्यानंतर ते कपडे पुन्हा घालण्याचे प्रसंग फार कमी वेळाच येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्याचा उपयोग करुन तुम्ही लग्नातील लेहंगा आणि साड्यांचे नेमके काय करायचे ते तुम्हाला कळेल.

हेव्ही वर्क केलेला लेहंगा असेल तर असा ड्रेप करा दुपट्टा

भाड्याने देणे फायद्याचे

Instagram

 जर तुम्ही लग्नासाठी लेहंगा किंवा एखादी हेवी साडी घेतली असे.ती फक्त एकदाच नेसली असेल तर तुम्ही असे कपडे भाड्याने देऊ शकता. कारण अशी अनेक लोक असतात ज्यांना लग्नासाठी खूप पैसे खर्च करायचे नसतात. शिवाय त्यांना असे कपडे घरी ठेवण्यासाठी फार जागाही नसते. तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही ड्रेस रेंटवर देऊ शकता. याचे चांगले पैसेही मिळतात. लेहंगा असेल तर त्याचे माप तुम्हाला सांगावे लागते. कारण डिझायनर लेंहग्याची माप सतत बदलणे कठीण असते. त्यामुळे जर तुम्ही माप आधीच टाकली तर त्या मापाला साजेश्या लोकांना तुम्ही तो रेंटवर देऊ शकता. आता त्याचे दर काय ठेवायचे असा विचार करत असाल तर ते प्रत्येक लेहंग्यानुसार फार वेगळे असू शकतात. साधारण 1 हजारापासून ते 10 हजारापर्यंत तुम्हाला याचे भाडे मिळू शकते. (पण रेट लावताना तुमचा ड्रेसची किंमत किती आहे त्याचा अंदाज घेऊनच ठरवा. यामध्येही तुम्हाला बार्गेनिंग करावेच लागेल) 

जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स (Dresses Made From Old Sarees In Marathi)

विकून टाका

Instagram

जर लग्नातील हेवी लेंहगा तुम्ही पुन्हा कधीच वापरणार नसाल तर सगळ्यात बेस्ट पर्याय आहे असे कपडे विकून टाकण्याचा. तुम्ही ज्या ठिकाणाहून याची खरेदी करणार आहात. जर तुम्ही त्यांनाच या बाबत विचारले तर ते तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील. कारण त्यांच्याकडे असे अनेक जण असतात जे तुम्ही विकलेले कपडे भाड्याने देतात. भाड्याने कपडे देणे हे सोपे वाटत असले तरी तुम्हाला ओळखीची गरज असते. तुमच्याकडे एकच लेहंगा असेल तर भाड्याने देण्यासाठी आणि लोकांनी तुमचा लेहंगा पसंत करण्यासाठी एकच पर्याय असल्यामुळे तुम्हाला पटकन कोणी गिऱ्हाईक मिळत नाही. तुम्ही सोशल मीडिया फ्रेंडली असाल तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे कपडे विकत घेत असल्याचे देखील कळेल.  त्यांना तुम्ही तुमच्या लेहंग्याचे फोटो दाखवून तुम्ही त्यांच्याकडून भाव करुन घेऊ शकता. समजा तुम्ही लेहंगा 18 हजाराला विकत घेतला आहे तर तुम्हाला तो 15 पर्यंत विकता आला तरी फार उत्तम. पण तुम्ही आहे त्या किमतीत विकायला जाल तर तुम्हाला त्याचा हवा तसा भाव मिळणार नाही. शिवाय जर तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवले नसेल तरी तुम्हाला त्याचा चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे तुम्ही घेतलेल्या डिझायनर साडी आणि लेहंग्याची काळजी अत्यंत काळजीपूर्वक घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला भाव मिळू शकेल. 

आता तुमच्या घरी कपाटात पडून राहिलेल्या लेहंग्याचा आणि डिझायनर साड्यांचा तुम्ही असा निकाल लावला तर तुम्हाला चांगले पैसेही मिळू शकतील. 

 सिल्कच्या साड्या जपण्यासाठी घ्या अशी काळजी, अन्यथा साड्या होतील खराब

Read More From DIY फॅशन