काही विषय महिलांना चारचौघात बोलू नयेच असे वाटतात. त्यापैकी एक विषय आहे Sex. म्हणजे काळ कितीही बदलला तरी त्यांना या विषयाबद्दल अजुनही बोलावेसे वाटत नाही. सध्य स्थितीत एक गट असा आहे की, जो पुरुषांसोबतही सेक्सबद्दल बोलू शकतो. दुसरा गट हा अजुनही हा विषय बोलण्यासारखा वाटत नाही असे मानतो. आम्ही काही महिलांना Sex विषयी तुम्ही चारचौघात बोलता का ? हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना नेमकं काय उत्तर दिलं ते जाणून घ्या.
Table of Contents
Sex बद्दल बोलायचे कोणाकडे तेच कळत नाही.
माझे सगळे बालपण खेड्यात गेले. शहरांसारखे खुलेपणाने आम्ही कधीच वावरलो नाही. शाळेत Sex Education असा प्रकार नव्हता. साधारण मासिक पाळी आली की, घरातून आता कोणाच्या घरी जाऊ नको असे सांगितले जायचे. कोणत्याही मुलाशी, पुरुषाशी जवळीक करु नका असे सांगितले जायचे. एकदा आम्ही शेतात गेलो असताना मी माझ्याच गावातील एका मुलीला आणि मुलाला अर्धनग्न अवस्थेत Sex करताना पाहिले (त्यावेळी ते काय करत होते हे कळत नव्हतं.) मी घाबरुनच गेले. मी जे पाहिले होते. ते फार भयंकर होते असे मला वाटले. मी धावत घरी आले. घरी येऊन मागच्या दाराला मोठ्याने रडत बसले. घरी आईला काय बघितले हे कसं सांगू मला कळत नव्हतं. घरी आई मला मारेल अशी मला भीती वाटत होती. मी माझ्या गावातील त्या मुलीशी बोलणे सोडून दिले. काही दिवसांनी तिने मला हाताला धरुन विचारले तू माझ्याशी का बोलत नाही. असे विचारल्यावर मी तिला काय पाहिले ते सांगितले. त्यावर तिलाही काय बोलावे कळले नाही. पुढे काही वर्षांनी मलाच माझे कळले आणि मला हसू आले. पण खरचं आजही मला माझ्या आयुष्यात Sex संदर्भात काही समस्या असतील तर मला कोणाकडे माझे प्रश्न मांडावे कळत नाही.
10 सेक्स पोझीशन तुम्हाला देतील परमोच्च सुख
Sex हा विषय स्त्रियांसाठी नाही, हा समज त्रासदायक
मी आताच्या काळातील एक मॉर्डन मुलगी आहे. मला Sex हा विषय फार मोठा आणि गहन आहे असे कधीच वाटत नाही. पण समाजात एक उगाच प्रतिमा करुन ठेवली आहे की, Sex हा विषय स्त्रियांसाठी नाही. माझ्या काही मैत्रिणींची लग्न झालेली आहेत. आम्ही भेटलो की, हमखास Sex बद्दल बोलतो. त्यांचे नवरे त्यांच्यासोबत कसे Sex करतात हे ऐकायला आम्हाला आवडतं. कधीतरी याच विषयांमधून जर एखाद्याला काही त्रास असेल तर अनेक प्रश्नही सुटतात. पण आजही अशा महिला आहेत ज्या कधीच या विषयावर बोलायला पाहात नाही. मग अशा महिला आमच्याकडे असे काही बघतात की, त्यांना असे वाटते की, आम्ही या संदर्भात बोलून फार मोठा गुन्हा करतोय. आम्हाला या बोलण्याची देवाकडून खूप मोठी शिक्षा मिळे. पण खरचं Sex बद्दल बोलणे हा गुन्हा नाही. आम्ही बोलतो तुम्ही देखील बोला.तरचं समाजात Sex बद्दल असलेलं चुकीचं आकर्षण कमी होईल.
Sex करताना महिलांना या 10 ठिकाणी करा स्पर्श
आता तरी मोकळेपणाने बोलायला हवे
आमच्या काळात या विषयाबद्दल बोलायला कोणीच तयार नसायचे. लपून कधी तरी ब्लू फिल्म्सच्या सीडीज आम्हीही पाहिल्या असतील. पण तरीही ते पाहिल्यानंतर समोरासमोर बसून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा विषय कधीच शेअर केलेला मला तरी आठवत नाही. माझी मुलगी अगदी मोकळेपणाने माझ्याशी Sex संदर्भात बोलते तेव्हा मलाच कधीतरी कसंतरी वाटतं. पण बदलत्या काळानुसार आपण बदलायला हवं. मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्यासोबत Sex बद्दल बोलायला काहीच हरकत नाही. कारण असे केले तरच नकळत्या वयात त्यांना असलेलं आकर्षण कमी होईल. Sex हे नुसतं आकर्षण नसून ती एक जबाबदारीसुद्धा आहे हे जर या सगळ्या बोलण्यातून मुलांपर्यंत गेले तर चांगलेच आहे. त्यामुळे आता तरी आपण मोकळेपणाने बोलायलाच हवे असे मला वाटते.
जाणून घ्या काय होता महिलांचा पहिल्या सेक्सचा अनुभव
पुरुषांसोबत Sex संदर्भात बोलायला काय हरकत आहे
ज्याच्यासोबत Sex करायचे त्याच्याशी Sex संदर्भात बोलायला काय हरकत आहे. मी माझ्या अनेक मैत्रिणी असे काही त्यांच्या पुरुषासोबत बोलायला फारच लाजतात. त्यांना असे वाटते असे करणे चांगले नाही. पण पुरुषांसोबत या गोष्टी बोलायला हव्या. जर त्यांना या विषयाची माहिती नसेल तर कदाचित तुम्ही त्यांच्यासोबत मोकळेपणाने बोलून तुमच्या समस्यादेखील सोडवू शकता. मला माझ्या नवऱ्यासोबत Sex संदर्भात बोलणे कधीच गैर वाटत नाही. उलट मला त्याच्यासोबत बोलणे जास्त सोयीस्कर वाटते. त्याच्यासोबत बोलून मला आमच्या दोघांमधील अनेक समस्या सुटल्या सारख्या वाटतात
*महिलांच्या अनुभवानंतर तुम्हालाही नक्कीच वाटले असेल की, Sex या विषयात टाळण्यासारखे असे काही नाही. हे विषय तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत किंवा तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल अशा व्यक्ती हा विषय नक्की शेअर करु शकता.
You might like these:
My Very First Time: 5 Women Share Their Stories In Marathi
13 Sex Related Questions Comes In Mind While Having Sex In Marathi