Care

केसांसाठी कोणता कंगवा आहे फायदेशीर जाणून घ्या

Leenal Gawade  |  May 14, 2021
केसांसाठी कोणता कंगवा आहे फायदेशीर जाणून घ्या

केसांची काळजी घेणे हे प्रत्येकाला आवडते. केसांना तेल लावण्यापासून ते अगदी कंडिशनर लावेपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी आपण छान करतो. केसांसाठी कोणतेही प्रॉडक्ट वापरताना ते ब्रँडेड असायला हवे असाच आपला हट्ट असतो. पण केसांसाठी कंगवा निवडताना मात्र खूप जण फार काही काळजी घेताना दिसत नाही. तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा चांगला ते जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे असते. तुम्ही वापरत असलेल्या कंगव्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो की नाही हे तुम्हालाही कळत नसेल तर जाणून घ्या तुमच्या केसांसाठी बेस्ट कंगवा 

सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा आणि बदला तुमचं जग (Hair Care Tips In Marathi)

लाकडाचा कंगवा

Instagram

खूप जणांकडे लाकडाचा कंगवा तुम्ही अगदी नक्की पाहिला असेल. लाकडाचा कंगवा हा खूपच फायदेशीर असतो. लाकडाचा वापर केसांवर केल्यामुळे केसांचा गुंता अगदी अलगद सोडवता येतो. शिवाय हा कंगवा फिरवल्यामुळे रक्ताभिसरण क्रियाही अगदी योग्य आणि सुरळीत होते. त्यामुळे केसांच्य वाढीला चालना मिळते. असा हा लाकडाचा कंगवा फारच फायदेशीर असला तरी देखील तो सगळ्याच केसांसाठी चांगला आहे असे होत नाही. जर तुम्चे केस जाड असतील तर तुम्हाला हा कंगवा मुळीच चालत नाही. कारण या कंगव्यामध्ये तुमचे केस नीट बसत नाही. तुमचे केस पातळ आणि सिल्की असतील तर अशा केसांसाठी हा कंगवा एकदम परफेक्ट असा आहे.

कंगव्यापेक्षा केसांसाठी का फायदेशीर आहे हेअर ब्रश… जाणून घ्या

प्लास्टिकचा कंगवा

अगदी सगळीकडे सहज उपलब्ध असलेला कंगव्याचा प्रकार म्हणजे प्लास्टिकचा कंगवा खूप जण अशाप्रकारचाच कंगवा हाताळतात. कारण हा कंगवा अगदी सहज उपलब्ध असतो. पण या कंगव्यामुळेही काही जणांना त्रास होतो. खूप जणांना असा कंगवा वापरल्यामुळे केस तुटण्याच्या तक्रारी जाणवतात. कारण केस आणि प्लास्टिकमध्ये घर्षण झाल्यामुळे केसांवर स्टॅटीक एनर्जी तयार होते आणि हा केस ताणला जातो. त्यामुळे खूप जणांन या कंगव्याचा त्रास होतो. तुमचे केस मध्यम जाड असतील तर तुम्हाला हा कंगवा एखाद्यावेळी चालू शकेल कारण या कंगव्यामुळे तुमच्या केसांना फारसे नुकसान होणार नाही. पण अशावेळी तुम्ही थोड्या जाड दातांचा कंगवा वापरा म्हणजे तुमच्या केसांचा गुंता खूप चांगला सुटेल.

छोटा कंगवा

खूप जण पॉकेट कंगवा कॅरी करतात. तुम्ही बाहेर गेल्यानंतर अगदी झटपट केस विंचरण्यासाठी हा कंगवा चांगला असला तरी देखील या कंगव्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागतात. या कंगव्यामुळे  खूप एनर्जी वाया जाते.शिवाय गुंता सोडवताना जरासा जास्त जोर लावला की, हा कंगवा किंवा केस तुटण्याची शक्यता असते. अशावेळी हा कंगवा तुम्ही नाहीच वापरला तर केसांसाठी फारच उत्तम. अगदी वरच्या वर केस विंचरायचे असतील तर ठीक पण स्टायलिंगसाठी हा कंगवा चांगला नाही. 

हेअर ब्रश

Instagram

केसांचा गुंता काढण्यासाठी आणि केस नीट विंचरण्यासाठी हेअर ब्रश हा नेहमीच फायद्याचा असतो.  अगदी कुरळ्या केसांपासून ते सरळ केसांपर्यंत हा प्रकार अगदी कोणालाही चालतो. त्यामुळे असा कंगवा सगळ्या कंगव्यांमध्ये आयडियल मानला जातो. पण हा कंगवा घेताना नेहमी फ्लॅट असा निवडा यामध्येही तुम्हाला गोलाकार असा कंगवा मिळेल. पण असा कंगवा तुमच्या काहीही कामाचा नाही. वरील सगळ्या कंगव्याप्रमाणे असा कंगवा त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे फ्लॅट असा कंगवा निवडा. 


आता तुमच्या केसाच्या प्रकारानुसार आणि पोतानुसार तुमच्यासाठी निवडा बेस्ट कंगवा

हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

Read More From Care