DIY सौंदर्य

विटामिन सी का आहे त्वचेसाठी गरजेचे (Why Vitamin C Important For Skin)

Leenal Gawade  |  Mar 14, 2022
विटामिन सी त्वचेसाठी गरजेचे

त्वचा सुंदर दिसावी हे आपल्यापैकी सगळ्यांचेच स्वप्न असते. त्वचा हायड्रेट, तजेलदार आणि चमकदार दिसावी यासाठी अनेक प्रॉडक्टसदेखील आपण वापरतो. पण त्वचेसाठी भारंभार नाही तर योग्य प्रॉडक्ट वापरण्याची गरज असते. त्वचेसाठी विटामिन सी (Vitamin C) खूप जास्त गरजेचे असते. व्हिटॅमिन C मध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते.  जे तुमच्या स्किन टिश्यूजना रिपेअर करायचे काम करतात.  त्याच्या वापरामुळे त्वचेखाली असलेल्या कोलॅजनला चांगलेच पोषण मिळते. त्वचेला कोलॅजन मिळाले की ती चिरतरुण दिसण्यास मदत मिळते. विटामीन सी शी निगडीत अनेक गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये करु शकता. यामध्ये तुम्हाला फेसवॉश, मिस्ट, डे क्रिम आणि सीरम यांचा समावेश करता येऊ शकतो. चला जाणून घेऊया विटामीन सी त्वचेसाठी का आहे गरजेचे


ORGANIC VITAMIN C FACE CLEANSER

त्वचेचा प्रकार अगदी कोणताही असला तरी त्या त्वचेसाठी विटामीन सी चांगले असते. त्यामुळे विटामीन सीचा कोणताही प्रॉडक्ट तुमच्यासाठी फायद्याचाच ठरतो. चेहऱ्यासाठी चांगला फेसवॉश वापरायचा असेल तर तुम्हाला हा फेसवॉश वापरता येईल. विटामिन सी तुमच्या पोअर्सला स्वच्छ करण्याचे काम करते. इतकेच नाही तर तुमची त्वचा इव्हन टोन करण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही याचा समावेश नक्कीच करायला हवा. 

विटामिन सी चे फायदे 

  1. त्वचेवर तजेला आणते.
  2. त्वचा इव्हनटोन करण्यास मदत करते.
  3.  पोअर्समधील घाण काढून त्वचा स्वच्छ करते. 

ORGANIC VITAMIN C DAY CREAM

त्वचेसाठी कोणते क्रिम लावू हे कळत नसेल तर अशावेळी तुम्ही विटामिन सीचे प्रॉडक्ट वापरता येतील. आंघोळीनंतर तुम्हाला एखादे क्रिम लावायचे असेल तर तुम्ही डे क्रिम लावायला हवे. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळेल. ज्यांची त्वचा सतत तेलकट होत असेल तर अशांसाठी डे क्रिम वरदान आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर हा नक्कीच करायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा दिवसागणिक अधिक सुंदर होण्यास मदत मिळेल. 

डे क्रिमचे फायदे

  1. त्वचेची जळजळ करते कमी 
  2. त्वचा ठेवते हायड्रेट 
  3. त्वचेचा पोत ठेवते सुंदर 

ORGANIC VITAMIN C FACE TONER

टोनर हे त्वचेसाठी खूप जास्त फायद्याचे असते.  तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार करण्याचे काम फेस टोनर करत असते. त्यातल्या त्यात त्चचेचा प्रकार कोणताही असला तरी देखील तुम्हाला त्याचा वापर करता येतो. इतकेच नाही तर सीरमचा वापर केल्यामुळे तुमचा PH बॅलेन्स सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करायला हवा. 

  1. टोनरच्या वापरामुळे त्वचेचे होते संरक्षण 
  2. त्वचा एकसारखी होण्यास मिळते मदत 
  3. सगळ्या त्वचेसाठी उपयुक्त 

ORGANIC VITAMIN C SHEET MASK

क्विक आणि इन्स्टंट ग्लोसाठी  हल्ली फेस शीट मास्क वापरले जातात. फेस शीट मास्कचे फायदे अनेक आहेत. फेशिअल करायला वेळ नसेल तर अशावेळी शीट मास्क लावले तरी देखील एक इन्स्टंट ग्लो मिळण्यास मदत मिळते. त्यातच जर मास्कमध्ये विटामिन सी असेल तर त्याचा फायदा होण्यास मदत मिळते. त्यामुळे चांगल्या कंपनीचे शीटमास्क तुम्ही नक्की वापरायला हवे. 

  1. त्वचेला मिळतो इन्स्टंट तजेला 
  2. त्वचा राहते हाड्रेट 
  3. त्वचा करते टोन्ड 

Read More From DIY सौंदर्य