Acne

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर करा ग्लिसरीनचा वापर आणि मिळवा सुंदर त्वचा

Dipali Naphade  |  Dec 22, 2019
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर करा ग्लिसरीनचा वापर आणि मिळवा सुंदर त्वचा

हिवाळ्यात सर्वात जास्त त्वचेची काळजी घ्यावी लागते. त्यातही आपल्या चेहऱ्याची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लागते. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची सुंदरता अधिक चांगली ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर कसा करून घेता येईल हे जाणून घ्या. ग्लिसरीनचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टीासाठी करत असतो. पण आपल्या त्वचेसाठी याचा इतका चांगला परिणाम होतो हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल. त्यामुळे या लेखातून रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर ग्लिसरीनचा वापर केलात तर तुम्हाला नक्की सुंदर त्वचा मिळेल हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तुमची त्वचा अधिक कोरडी आणि बेजान असेल तर तुम्ही नक्कीच हिवाळ्यात ग्लिसरीनचा वापर करायला हवा. ग्लिसरीन नक्की कसं वापरायचं ते आता आपण पाहूया – 

चमकदार त्वचेसाठी ग्लिसरीन

Shutterstock

ग्लिसरीनचा नक्की वापर चमकदार त्वचेसाठी कसा करायचा असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर ग्लिरीन तुम्ही बेसन अथवा चंदन पावडरमध्ये मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून त्यावर लावा. साधारण 20 मिनिट्ससाठी ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्या. यामुळे तुमचा चेहरा हायड्रेट होऊन तुमची त्वचा अधिक चमकदार होईल. तुम्ही पंधरा दिवसात हा प्रयोग तुमच्या चेहऱ्यावर दोन वेळा नक्कीच करू शकता. 

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

क्लिंन्झर म्हणूनही करता येतो वापर

Shutterstock

हिवाळ्यात चेहरा क्लिंन्झ करणं अत्यंत गरजेचं असतं.  त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करता. त्यापेक्षा तुम्ही मध, ग्लिसरीन आणि अर्धा चमचा केस्टाईल साबण एकत्र करून घ्या. सकाळ आणि संध्याकाळ हे तयार केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून चेहरा क्लिंझ करा.  तुम्ही हे मिश्रण तयार करून लहान डबीत भरूनही ठेवू शकता. तुम्हाला याचा आठवडभर उपयोग केल्यानंतर चेहऱ्यावरील चमकदारपणाचा अप्रतिम परिणाम दिसून येईल. त्यासाठी तुम्हाला बाजारातील इतर महागडी उत्पादनं वापरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी तुमचा चेहरा अधिक चमकदार बनवू शकता. 

‘या’ 6 पद्धतीने साखर देते तुमच्या त्वचेला रोज नवी चमक

पिंपल्स दूर करण्यासाठी

Shutterstock

ग्लिसरीमध्ये अँटिबॅक्टेरियल तत्व आढळतात जे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. इतकंच नाही इतर उत्पादनांच्या तुलनेत ग्लिसरीनच्या वापराने अॅक्ने अथवा पिंपल्सचा त्रास लवकर कमी होतो. तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी ग्लिसरीनचा डायरेक्ट वापर कापसाने करू शकता. ग्लिसरीनमध्ये कापूस भिजवून त्याचे थेंब पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि त्याचा आठवड्याभरात परिणाम पाहा. दिवसातून रोज असं एकदा करा. लवकरच तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स निघून गेलेले दिसतील. तसंच तुमचा चेहरा अधिक चमकदार दिसेल. 

Pimple-free चेहरा मिळवण्यासाठी करा घरगुती उपचार

टोनर म्हणूनदेखील उपयोगी

Shutterstock

ग्लिसरीन त्वचेवरील पीएच स्तर संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरते. याचा प्रयोग करण्यासाठी तुम्ही चेहरा पहिले स्वच्छ धुवा आणि त्यानंतर त्यावर ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचं मिश्रण एकत्र करून लावा. या दोन्हीच्या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यास मदत मिळते.  एखाद्या टोनरप्रमाणे हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर काम करतं. 

हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणं आहे गरजेचं, जाणून घ्या कारणं

मॉईस्चराईजर म्हणूनही करू शकतो वापर

Shutterstock

ग्लिसरीन रोज झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि मग झोपा. क्रिम नसल्यास, तुम्ही साध्या पाण्यासह ग्लिसरीन मिक्स करून मॉईस्चराईजर म्हणून वापर करू शकता.  रोज याचा वापर केल्यास तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि सुंदर दिसतो. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Acne