DIY फॅशन

वायर्ड ब्रा घालताय? तर वाचा चुकीच्या फिटिंगचे नुकसान

Leenal Gawade  |  Jan 5, 2021
वायर्ड ब्रा घालताय? तर वाचा चुकीच्या फिटिंगचे नुकसान

स्तनांना उत्तम उभारी मिळून ते आकर्षक दिसावे यासाठी आपण अनेक वेगळ्या प्रकारच्या ब्रा ट्राय करतो. यामध्येही अनेक जणांना वायर्ड ब्रा घालण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांच्या स्तनांचा आकार मोठा आहे त्यांना तर ब्रा च्या निवडीबाबत फारच काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्या ब्राची फिटिंग चुकीची असेल तर त्यांना याचा जास्त त्रास होतो. वायर्ड ब्राबद्दल सांगायचे तर स्तनांना उभारी देणाऱ्या अनेक ब्रामध्ये वायर्ड ब्राचा समावेश असतो. तुम्हीही कधी वायर्ड ब्रा घातली आहे का? या वायर्डचा तुम्हालाही त्रास झाला आहे का? वायर्ड ब्रा या कालांतराने टोचत असली तरी देखील अशी ब्रा तुम्हाला सुरुवातीपासूनच बोचत असेल तर तुम्ही घालत असलेली ब्रा ही चुकीच्या फिटिंगची आहे.अशा चुकीच्या फिटिंगची वायर्ड ब्रा तुमचे अनेक प्रकारे नुकसान करु शकते.

ब्रा स्ट्रिप्स लागत असतील तर तुम्ही करत आहात या चुका

वायर्ड ब्रा म्हणजे काय?

Instagram

 वायर्ड ब्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची वायर्ड वापरली जाते. ही वायर कप्सच्या खाली  अर्धगोलाकार सेट केलेली असते. कपड्यांच्या आतमध्ये ही ब्रा अशी सेट केली जाते की ती घातल्यानंतर आपोआपच सैल झालेल्या स्तनांना चांगली उभारी मिळते. वायर्ड ब्रा या जास्ती करुन नेटेड किंवा सिंथेटीक मटेरीअलमध्ये असतात. त्यामुळे याचा आकार अधिक चांगला दिसतो.

वायर्ड ब्राची फिटिंग चांगली नसेल तर होईल हा त्रास

कोणत्याही ब्राची फिटिंग ही चुकीची असेल तर त्याचा त्रास होतोच. पण वायर्ड ब्राची फिटिंग चुकली ती अधिक त्रादायक ठरते. वायर्ड ब्राची फिटिंग चुकली की नेमका काय गंभीर त्रास होऊ शकतो ते जाणून घेऊया

त्वचा लाल होणे 

कपसाईज निवडताना जर चूक झाली तर कपसाईज एकतर टाईट किंवा सैल होऊ शकते. कपसाईज मोठी झाली तर ते अॅडजस्ट करण्यासाठी पट्टे घट्ट केले जातात. त्यामुळे त्याचा त्रास साहजिकच त्वचेवर होतो. ब्रा करकचून शरीराला बसल्यामुळे त्वचा लाल दिसू लागते. त्यामुळे हा पहिला त्रास होणे अत्यंत स्वाभाविक असते. त्यामुळे योग्य कपसाईज निवडा नाहीतर हा त्रास तुम्हाला होईल.

 पाठीचा कणा दुखणे 

स्तनांचा आकार मोठा असेल तर तुम्हाला तुमच्या ब्रा ची फिटिंग योग्य निवडणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही ब्रा ची साईज चुकीची निवडली तर तुम्हाला आणखी एक त्रास होतो तो म्हणजे पाठीचा कणा दुखू लागतो. अनेकदा ब्राची साईज चुकीची निवडली ब्राच्या मागच्या पट्ट्या या पाठीत रुतू लागतात. काही काळ त्वचेला हा त्रास होत असला तरी देखील  कालांतराने पाठीचा कणा  दुखू लागतो. कारण ब्रा ला अॅडजस्ट करताना तुम्ही जसा आराम पडेल तसे बसू लागता. ज्यामुळे तुमचे पोश्चरही बदलते. जे मुळीच चांगले नाही. काही जणांना तुम्ही पोक काढून चालताना पाहिले असेल असे अनेकदा चुकीची ब्रा घातल्यामुळेही होते. 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)

 

 

Instaram

स्तनांनाच्या आजबाजूला दुखणे 

तुम्ही निवडलेल्या कपसाईजनुसार तुमच्या वायर्डचा आकार ठरलेला असतो. याचा आकार जरासा जरी चुकला तरी या वायर्ड ब्रा स्तनांच्या खाली रुतू लागतात. साहजिकच आहे की ब्रा स्तनांच्या आजुबाजूला दुखू लागते. ही ब्रा काढून टाकावीशी वाटते. जर याकडे सतत दुर्लक्ष केले तर हे दुखणे अधिक वाढते. 

स्तनांचा आकार बिघडणे

 ब्रा ही स्तनांना उभारी आणण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे स्तनांचा आकार चांगला राहतो. पण जर वायर्ड ब्राची फिटिंग चुकीची असेल तर त्यामुळे स्तनांचा आकारही बिघडू शकतो. सैल आणि घट्ट ब्रा अशा दोन्ही वायर्ड ब्राच्या फिटिंगमुळे असा त्रास होऊ लागतो. 

जर तुम्ही अशा प्रकारच्या वायर्ड ब्रा घालत असाल तर या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.

म्हणून व्यायाम करताना तुम्ही घालायला हवी स्पोर्ट्स ब्रा… नाहीतर

Read More From DIY फॅशन