आरोग्य

साठीनंतरही करू शकता योगाभ्यास, या योगासनांचा सराव ठरेल फायदेशीर

Trupti Paradkar  |  Jun 3, 2022
yoga exercises for Senior Citizens in Marathi

योगासने केल्यामुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. हाडे लवचिक राहण्यासाठी, ताणतणाव दूर करण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगासने करणं फायदेशीर ठरतं. पण वयाच्या साठीनंतर तुमच्या शरीराची हालचाल मंद होते, फार दगदग सहन होत नाही अशा वेळी साठीनंतर योगासने करावीत की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. योगासनांमध्ये अनेक कठीण आसने असतात, ज्यांचा सराव करण्यासाठी शरीर लवचिक असणं गरजेचं असतं. साठीनंतर शरीरातील लवचिकता कमी होते. मात्र तुम्ही या वयातही काही योगासने करू शकता. यासाठी जाणून घ्या साठीनंतर कोणती आसने करावीत. यासोबतच जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे आणि योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )

साठीनंतर कोणती योगासने करावी

योगासनांचा अभ्यास तुम्ही तरूणपणापासून करत असाल तर साठीनंतरही तुम्ही अनेक कठीण योगासने सुद्धा सहज करू शकता. मात्र जर तुम्ही नव्याने योगासने शिकण्याचा सराव करत असाल तर मात्र तुम्हाला काही ठराविक आसनांचाच सराव साठीनंतर करता येतो. योगासनांचे हे प्रकार या वयातही तुमची सांधेदुखी कमी करण्यासाठी, अंगदुखी कमी करण्यासाठी, स्मरणशक्ती कायम टिकण्यासाठी आणि ताणतणाव दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

उत्कटासन – Chair Pose

वाढणारं वय माणसाला रोखता येत नाही. जस जसं तुमचं वय वाढत जातं तुमच्या शारीरिक हालचालीवर मर्यादा येत राहतात. यासाठी तुमचं शरीर पुरेसं लवचिक व्हायला हवं. म्हणूनच साठीनंतरही तुम्ही उत्कटासन करू शकता. या आसनाला चेअर पोझ असंही म्हणतात. साठीनंतर तुम्ही एखाद्या भिंतीचा आधार घेत हे आसन करू शकता. या आसनामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे तुमची अंगदुखी, गुडघेदुखी कमी होते.

भुंजगासन – Cobra Pose

योगासनांमधील भुजंगासन हे एक मुख्य आणि फायदेशीर असं आसन आहे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे आसन नक्कीच करू शकतं. साठीनंतर भुजंगासन करण्याचा महत्त्वाचा फायदा हा की यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आतड्यांना चांगला व्यायाम मिळाल्यामुळे पचनशक्ती सुधारते. पाठ आण पायांवर चांगला ताण येतो ज्यामुळे अंगदुखी कमी होते. फुफ्फुसांचे कार्य सुधारल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. यासाठीच जाणून घ्या जाणून घ्या भुजंगासन संपूर्ण माहिती मराठी | Bhujangasana Information In Marathi

वृक्षासन – Tree Pose

वयस्कर लोकांसाठी हे एक साधे आणि सोपे आसन आहे. या आसनामुळे शरीराचा बॅलन्स सांभाळणे सोपे जाते. जर तुम्ही नियमित वृक्षासन अथवा ट्री पोझचा सराव केला तर तुमच्या शरीराचे पोश्चर सुधारण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी हे आसन विशेष लाभदायक आहे.

प्राणायाम – Pranayam

योगासनांसोबतच तुम्ही या वयात प्राणायमाचा सराव करू शकता. कारण नियमित प्राणायाम करणे शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. वाढत्या वयासोबत आजकाल अल्झायमर सारखे स्मरणशक्तीशी निगडीत आजार वाढताना दिसत आहेत. पण जर तुम्ही प्राणायामाचा सराव केला तर तुमचे मन शांत राहते, चिंता काळजी दूर ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे अशा आजारांचा धोका तुमच्यापासून कायम दूर राहतो. जाणून घ्या प्राणायामाचे फायदे मराठीमध्ये (Pranayam Benefits In Marathi)

या काही योगासने आणि प्राणायमासोबत तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइझ आणि चालण्याचा व्यायामही करू शकता. ज्यामुळे तुमचे शरीर तंदरुस्त आणि मन प्रसन्न राहील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य