Mental Health

रात्री करा ‘हे’ योगासन पाच मिनिटात लागेल झोप

Aaditi Datar  |  Apr 9, 2020
रात्री करा ‘हे’ योगासन पाच मिनिटात लागेल झोप

 

दिवसभर काम करून थकल्यावरही जर रात्री झोप लागत नसेल आणि या कुशीवरून त्या कुशीवर अशी अवस्था होत असल्यास तुमच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर झोप येण्यासाठी तु्म्ही औषधं घेत असल्यास तेही आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. झोप न येण्याची समस्याही तुमच्या रोजच्या टाईमटेबलमधील काही गोष्टींमुळेही उद्भवू शकते. पण टेन्शन नको, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही योगासनाचा उपयोग करू शकता. योगासन केल्याने तुमच्या मेंदूतील स्लीपिंग एक्टिव्हिटी सक्रिय होते. ज्यामुळे तुम्हाला लवकर झोप येईल. एवढंच नाहीतर हे योगासन तुमच्या स्लीपिंग हार्मोन्स वाढवण्यासाठीही एक्टीव्हेट करेल. वाचा नेमकं कोणतं आहे हे योगासन जे केल्यावर येते शांत झोप. 

Shutterstock

झोप येण्यासाठी करा हे योगासन

 

योगासनातील अनेक मुद्रा आहेत, ज्यांच्यामुळे तुम्हाला मस्त झोप येईल. पण जर रात्री झोपण्याआधी कोणतं योगासन करणं चांगल आहे असं विचारल्यास ते आहे शवासन. शवासन योगवर बरंच संशोधन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे समोर आलं आहे की, झोपण्याआधी जर शवासन 5 ते 10 मिनिटं केल्यास चांगली झोप येते. याला कॉर्प्स पोज या नावानेही ओळखलं जातं.

Shutterstock

 

खरंतर शवासन मुद्रा तुमच्या शरीराला एखाद्या शवसमान स्थितीत ठेवते. या स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा श्वास घेता आणि बाहेर सोडता तेव्हा तणाव कमी होतो आणि तुमच्या नर्व्हस सिस्टमही शांत होतं. संशोधनानुसार या योगासनाने स्लीपिंग हार्मोन्स आणि स्लीपिंग सेल्स एक्टिव्हेट होतात. ज्यामुळे लवकर झोप येते. हे योगासन करणं अगदी सोपं आहे आणि झोपण्याआधी अगदी तुमच्या बेडजवळ योगामॅट घालूनही तुम्ही हे अगदी आरामात करू शकता. जर तुमच्याकडे योगामॅट नसेल तर तुम्ही तुमच्या बेडवर पडल्या पडल्याही हे करू शकता.

 

पावर योगा आणि त्याचे फायदे

शवासन कसं करावं?

Shutterstock

 

– सर्वात आधी योगा मॅट घ्या आणि त्यावर पाठ टेकवून झोपा. 

– दोन्ही पाय पसरा आणि त्याच्यामध्ये किमान 1-1.5 फीट एवढं अंतर ठेवा. 

– जर तुमचे हात शरीराला संलग्न असतील तर ते दूर ठेवा. 

– आता तुमच्या शरीराला संपूर्णपणे रिलॅक्स होऊ द्या. 

– हळूहळू श्वास घ्या आणि बाहेर सोडा.

– ही प्रक्रिया किमान 5 ते 10 मिनिटं सतत करा. 

– लक्षात घ्या या दरम्यान कोणत्याही गोष्टीबाबत विचार करू नका आणि फक्त तुमच्या योगमुद्रेवर ध्यान केंद्रित करा. 

– हे योगासन रोज झोपण्याआधी तुम्ही करू शकता. 

 

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं

 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवरक्लिक करा.

 

सेक्सची समस्या दूर करण्यासाठी मदत होईल योगाची

Read More From Mental Health