फिरण्याची हौस कोणाला नसते? पण काही व्यक्ती अशाही असतात, ज्यांना असं वाटतं की, त्यांचा जन्म हा फक्त फिरण्यासाठीच झाला आहे. देवाने हे जग बनवलं आहे तर किमान त्यातलं अर्ध जग तरी पाहून घ्यावं असं या व्यक्तींना वाटत असतं. तर काही व्यक्तींसाठी दुसरं शहर वा देश त्यातील संस्कृती, तिथल्या लोकप्रिय आणि सुंदर जागा बघण्याची आणि इतर गोष्टी जाणून घेण्याची आवड असते. त्यांना प्रवास करायलाच खूप आवडतं. तर काही व्यक्ती आपल्या कंटाळवाण्या आयुष्यातून वेळ काढून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जातात. पण तिथल्या हॉटेलमध्ये राहून रिलॅक्स राहणं त्यांना आवडतं. अशा अनेक तऱ्हेच्या व्यक्ती आपल्याला दिसतात.
या 5 राशींच्या व्यक्ती ज्यांना फिरायला खूपच आवडतं (Zodiac signs that love to travel)
ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींमध्ये अशा काही राशी असतात ज्यांची फिरण्यामध्ये जास्त आवड असते. अशा व्यक्तींचे पाय हे घरात टिकत नाहीत. अशा व्यक्तींना सतत प्रवास करायला आवडतो. कधी आपणच प्रवासाला निघून जातात. तर कधी ऑफिसच्या निमित्ताने प्रवास करतात. प्रत्येक दिवशी प्रवास करणं अशा व्यक्तींना आवडत असतं. आम्ही तुम्हाला इथे अशाच व्यक्तींच्या राशीबद्दल सांगणार आहोत. ज्यांना नव्या जागा शोधायला, फिरायला आणि इतर ठिकाणचे अनुभव घ्यायला आवडतं. फिरायला सगळयांनाच आवडतं. पण या राशीच्या व्यक्तींना इतर राशीच्या तुलनेत जरा जास्तच आवडतं.
मेष (21 मार्च – 19 एप्रिल)
Shutterstock
बऱ्याच कमी व्यक्ती जात असतील अशा ठिकाणी फिरायला जाण्याचं याचं स्वप्नं असतं. कारण यांना शांतता जास्त प्रिय असते. कुठेही गर्दीच्या ठिकाणी अशा व्यक्तींना फिरायला आवडत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात अशा व्यक्तींना फिरायला आवडतं. या व्यक्तींना आव्हानं जास्त आवडतात. त्यामुळे अॅडव्हेंचर ट्रिपवर जाण्याला या व्यक्ती प्राधान्य देतात. ट्रेकिंग, राफ्टिंग अशा अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्समध्ये या व्यक्तींना जास्त मजा येते. अशा ठिकाणी जाण्याची संधी या व्यक्ती कधीही सोडत नाहीत. मित्रमैत्रिणींपेक्षा या व्यक्तींना आपल्या जोडीदाराबरोबर फिरणं अधिक आवडतं.
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
कर्क (22 जून – 22 जुलै)
या राशीच्या व्यक्तींना जास्त दिवस तुम्ही एका ठिकाणी राहिलेलं पाहणार नाही. एका ठिकाणी राहिलं तर यांंना अजिबातच करमत नाही. मुख्यत्वे कर्क राशीच्या महिलांना फिरण्याची खूपच हौस असते. यांच्यासाठी फिरणं म्हणजे पार्टीला जाणं, बाजारात शॉपिंग करायला जाणं अथवा नातेवाईकांच्या घरी जाऊन भेट देणं असंही असू शकतं. या व्यक्ती प्रवासात अतिशय चांगल्या मित्र होतात. तुम्ही कुठेही फिरायला जात असाल तर या राशीच्या व्यक्तींना आमंत्रण द्या आणि आपला प्रवास सुखकर बनवा. तसं तर प्रवास करताना या व्यक्ती आपल्या सोयीसुविधा आपणच पाहतात. पण हॉटेलपासून ते अगदी खाण्यापिण्याच्या शॉपिंगपर्यंत कोणत्याही गोष्टीत तडजोड करणं यांना आवडत नाही. कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर तिथला अनुभव कायम लक्षात राहावा असंच या व्यक्तींना वाटतं.
मकर (22 डिसेंबर – 19 जानेवारी)
Shutterstock
या राशीच्या व्यक्तींना निसर्गात रमायला खूपच आवडतं. निसर्गाशी संबंधित जागांवर फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात. या व्यक्तींना स्वातंत्र्य हवं असतं आणि प्रवास करतानाही या व्यक्तींना आपलं स्वातंत्र्य प्रिय असतं. तसंच या व्यक्तींना फोटोग्राफीचीही आवड असते, त्यामुळे निसर्गाचे आणि तुमचेही अनेक फोटोज या व्यक्ती काढतात. या व्यक्ती त्या व्यक्तींपैकी आहेत, ज्या स्वप्नही पाहतात आणि ती स्वप्नं पूर्ण करण्याची हिंमतही त्यांच्यामध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली स्वप्नं पूर्ण करण्याची यांची तयारी असते.
राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती
मीन ( 19 फरवरी – 20 मार्च)
या राशीच्या व्यक्तींना एक अप्रतिम ट्रॅव्हलर मानलं जातं. कारण या व्यक्तींना ऐतिहासिक जागी फिरणं, तिथले फोटो घेणं अतिशय आवडतं. तिथलं खाणं पिणं, जुने किस्से, सण या सगळ्याचा भाग होण्याची यांची इच्छा असते. तसंच या व्यक्ती सोशल मीडियावर आपल्या ट्रिपचे अपडेट करणंंही अजिबात विसरत नाहीत. एखाद्या कंटाळवाण्या ट्रिपला मजेशीर बनवणं हे यांचं वैशिष्ट्य आहे. यांची क्रिएटिव्हिटी बऱ्याच लोकांना आवडते.
धनु (22 नोव्हेंबर – 21 डिसेंबर)
या राशीच्या व्यक्तींना फिरायला खूप आवडतं. धनु राशीच्या व्यक्तीचं मन अतिशय चांगलं असतं. तसंच त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनदेखील सकारात्मक असतो. जगात सगळीकडे फिरणं हे त्यांना प्रेरित करतं. या राशीच्या व्यक्ती जगभर फिरत असल्याचं दिसून येतं. यांची ट्रॅव्हल बॅग ही नेहमीच एखाद्या नव्या ट्रीपवर जाण्यासाठी कायम तयार असते. तसंच या व्यक्तींना तुम्ही कोणत्याही क्षणी फिरायला येण्यासाठी विचारलं तर या व्यक्ती एका पायावर तयार असतात.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje