सध्या घरात असलो तरीही आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बाकी काही असलं तरीही आता उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अगदी नुसतं बसल्या बसल्याही घाम येत आहे. तुम्हाला तुमची त्वचा अशा उन्हाळ्याच्या दिवसातही चमकदार ठेवायची असेल तर तुम्ही वापर करू शकता तुमच्या घरातील कणकेचा. आश्चर्य वाटलं ना? हो कारण आपण नेहमी बेसन अथवा मुलतानी माती या गोष्टी ऐकतो पण चेहरा अधिक चमकदार करण्यासाठी कधी कणकेचा वापर ऐकला नसेल तर आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत. गव्हाचे पीठ (wheat flour face pack) वापरून तुम्ही फेस पॅक तयार करा आणि यामुळे तुमच्या त्वचेला अधिक निरोगी बनवा. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर उन्हाच्या झळा अगदी घरातही जाणवतात आणि त्वचा अधिक निस्तेज होऊ लागते. त्यामुळ त्वचेतून तेल येण्याचे प्रमाण आणि मुरूमं येण्याचं प्रमाणही वाढते. या हंगामात त्वचेला हायड्रेट ठेवणंही अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो. पण तुम्ही घरगुती असा एक उपाय अर्थात गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्या त्वचेची ही समस्या दूर करू शकता. कणकेच्या या तीन तऱ्हेच्या फेसपॅकमुळे तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यास नक्कीच मदत मिळेल. जाणून घ्या कसा बनवायचा आणि या फेसपॅकचा वापर नक्की कसा करायचा.
1. दूध आणि गव्हाच्या पिठाचा फेसपॅक
Shutterstock
सध्या वातावरण बदलत आहे. उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत तेलकट त्वचेच्या व्यक्तींना जास्त त्रास व्हायला लागला असेलच. चेहऱ्यावर येणाऱ्या तेलामुळे चेहऱ्यावर मुरूमं यायलाही सुरूवात झाली असेल. तुमचीदेखील त्वचा तेलकट असेल तर तुम्ही दूध आणि गव्हाच्या पिठाचा फेसपॅक वापरायला हवा. हा फेसपॅक कसा बनवायचा आणि वापरायचा ते बघूया
साहित्य
- 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
- 2 मोठे चमचे दूध
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
एका वाटीत दूध आणि गव्हाचे पीठ घ्या आणि त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक तुम्ही साधारण 15 मिनिट्स चेहऱ्याला लाऊन ठेवा. त्यानंंतर तुम्ही जसे उटणे काढता त्याचप्रमाणे हेदेखील काढा. तुम्ही हा फेसपॅक जर आठवडाभर वापरलात तर तुमच्या त्वचेवरून अतिरिक्त तेलासह डेड स्किनदेखील निघून जाण्यास मदत मिळेल.
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक
2. दूध, गुलाबपाणी आणि गव्हाचे पीठ
Shutterstock
तुमची त्वचा जर निस्तेज असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा फेसपॅक नक्की वापरून पाहा. यामुळे तुमच्या त्वचेला चमक येईल. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः चेहऱ्यावरील चमक गायब होते आणि अधिक निस्तेजपणा येऊ लागतो. गव्हाचे पीठ, दूध आणि गुलाबपाणी हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राखेल. तुमच्या त्वचेवरील टॅन घालवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा उपयोग होतो. तर गुलाबपाण्याने तुमचा चेहरा टवटवीत राहण्यास मदत मिळते.
साहित्य
- 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
- 1 मोठा चमचा दूध
- 1 मोठा चमचा गुलाबपाणी
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
एका वाटीत हे तिन्ही साहित्य एकत्र करून घ्या. त्यानंतर काही वेळासाठी हे फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा हे थंड होईल तेव्हा काढा आणि चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिट्स तसेच राहू द्या. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला त्वरीत चेहऱ्यावर फरक जाणवेल. तुम्हाला जर हा फेसपॅक रोज वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील टॅनही निघून जाण्यास मदत मिळेल.
घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो
3. गव्हाचे पीठ, मध आणि दही
Shutterstock
उन्हाळ्याच्या दिवसात तुमचे शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी पिण्याची गरज असते. तसंच आपल्या त्वचेची अधिक काळजी घेण्याचीही गरज असते. त्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावर या फेसपॅकचा उपयोग करायला हवा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक हायड्रेटेड आणि चमकदार होईल. यासाठी गव्हाचे पीठ, मध आणि दही याची तुम्हाला गरज भासेल.
साहित्य
- 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ
- 2 मोठे चमचे दही
- 1 चमचा मध
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
त्वचमध्ये मुलायमपणा आणण्यासाठी आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी गव्हाचे पीठ, मध आणि दही व्यवस्थित मिसळू घ्या. ही पेस्ट तुम्ही हाताने नीट मिसळा आणि हातानेच आपल्या चेहऱ्याला लावून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. त्यानंतर साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या. उटण्याप्रमाणेच हे चेहऱ्यावरून काढा. असे केल्याने केवळ त्वचा हायड्रेटच नाही तर डेड स्किन निघून जाण्यासही मदत मिळते.
कोणत्याही केमिकल अथवा कॉस्मेटिकशिवाय तुम्हाला चमकदार आणि ताजी त्वचा हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा वापर करून नक्कीच त्वचा मिळवू शकता.