साडी ही अशी फॅशन आहे जी कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि कोणत्याही वेळी महिला नेसू शकतात. साडी नेसून तुम्ही अधिक आकर्षक आणि सुंदर तर दिसताच पण तुम्ही पारंपरिकता जपता याचाही मोठ्यांना आनंद होतो. मात्र साडी नुसती चांगली असून चालत नाही तर त्याचा ब्लाऊज आणि ब्लाऊजची स्टाईलही तितकीच महत्त्वाची असते. तुमचा लुक घडविण्याची अथवा बिघडविण्याची सर्वात महत्त्वाची भूमिका नक्कीच ब्लाऊज स्टाईलची असते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. साडीचा ब्लाऊज योग्य फिटिंगचा नसेल अथवा साडीला व्यवस्थित मॅच होणारा नसेल तर मग साडी कितीही महाग असली तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. विशेषतः लग्नाला साडी नेसणार असाल तर या सगळ्या गोष्टींची खूपच काळजी घेतली जाते. आजकाल बाजारात रेडीमेड ब्लाऊज (Readymade blouse) आले असून अनेक जणी याचा फायदा करून घेतात. पण तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते तुम्ही जाणून घ्या. या गोष्टी विचारात घेऊन जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुमच्या लुकची सगळेच प्रशंसा करतील हे नक्की!
पॅडेड ब्लाऊज (Padded Blouse)
तुमचे स्तन जर लहान असतील तर तुम्हाला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिऊन घेणे अधिक सोयीस्कर ठरते. तुमच्या स्तनांना योग्य आकार मिळण्यासाठी आणि साडीमध्ये तुमची फिगर अधिक चांगली दिसण्यासाठी तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवा. बॅकलेस असो, खणाचे ब्लाऊज डिझाईन्स असो अथवा कोणत्याही ब्लाऊजची स्टाईल असो तुम्ही अशा प्रकारच्या ब्लाऊज शिवण्यालाच प्राधान्य द्या. यामुळे तुमचा लुक पूर्ण दिसेल आणि तुम्हाला ब्रा स्ट्रेप्स लपविण्याचा त्रासही राहणार नाही.
ब्लाऊजच्या हाताची घ्या अधिक काळजी
तुम्हाला अगदी हाताच्या कोपऱ्यापर्यंत ब्लाऊजचे हात शिवायचे आहेत तर तुम्ही हाताच्या कोपऱ्याच्या 2 इंच वर अथवा 2 इंच खाली असा ब्लाऊज शिवा. एकदम कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवल्यास, तुमचा लुक खराब होऊ शकतो. तसंच हात वरखाली करण्यासाठीही असे ब्लाऊजचे डिझाईन त्रासदायक ठरू शकते. एकदम कोपऱ्याच्या जवळ ब्लाऊज जर एका बाजूला खराब झाला तर संपूर्ण साडीचा लुक खराब होऊ शकतो. तसंच याशिवाय तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊजचा लुक देणार असाल तर तुम्ही तुमच्या ब्युटीकवाल्या व्यक्तीला अंडरआर्म्सचे फिटिंग व्यवस्थित सांगा. कारण या ठिकाणी अर्धा इंच जरी जागा राहिली तर दिसायला अतिशय वाईट लागते. त्यामुळे ही काळजी घ्यायलाच हवी.
ब्लाऊजची पुढची बाजू
साडी कोणतीही असो पण ब्लाऊजची पुढची बाजू खूपच महत्त्वपूर्ण असते. प्रयत्न करा की, ब्लाऊजची पुढची बाजू ही व्यवस्थित शिवलेली असावी. त्याशिवाय तुम्ही ब्लाऊजचा गळा मागच्या बाजूने अधिक डीप ठेवणार असाल अर्थात डीप नेक ब्लाऊज असेल तर पुढचा गळा लहान ठेवा. दोन्ही दिशेला डीप नेक अजिबातच चांगला दिसत नाही. त्यामुळे फिटींगही खराब होते. तसंच डीप नेक ब्लाऊजसह नेहमी फिटिंग ब्रा चा वापर करावा. कारण तुम्ही सारखी सारखी ब्रा ची पट्टी लपविण्याचे काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुमचं कार्यक्रमातही लक्ष लागणार नाही. शिवाय तुमच्या साडी आणि ब्लाऊजचा लुक खराब होईल ते वेगळंच.
साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन (Combination of Saree and Blouse)
साडी आणि ब्लाऊजमध्ये योग्य मेळ असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही मिसमॅच ब्लाऊज जरी शिवणार असलात तरीही साडीच्या रंगासह योग्य मेळ असेल असाच ब्लाऊज तुम्ही निवडा. साडी जर प्लेन असेल तर हेव्ही लुकचा ब्लाऊज अथवा स्टायलिश ब्लाऊज तुम्ही घाला. साडी खूपच भरजरी असेल तर तुम्ही साधा ब्लाऊज शिवा अथवा कॉन्ट्रान्स्ट ब्लाऊज घाला. तुम्हाला ट्रेंडी ब्लाऊज आवडत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे स्टाईल करा.
गळ्याच्या डिझाईन्सची घ्या काळजी
तुमची उंची जर कमी असेल अथवा तुम्ही खूप बारीक असाल तर तुमच्या ब्लाऊजचा गळा हा गोल अथवा ओव्हल आकारातच शिवा. तुमची पाठ जराशी जाडसर असेल आणि तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही बॅकसाईडला एखादे गोलाकार होल राहू द्या. यामुळे तुमची पाठ अधिक टोन्ड दिसेल आणि तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल.
तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवणार असाल तेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात. अन्यथा तुमचा लुक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सोप्या टिप्सचा तुम्ही नक्की वापर करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक