बी टाऊनमध्ये लिंकअप, पॅचअप, ब्रेकअपच्या गॉसिप तर सुरुच असतात. आता या गॉसिपमध्ये नाव जोडलं गेलं आहे जावेद जाफ्रीचा मुलगा मिझान जाफ्री याचं. त्याचा ‘मलाल’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 जुलैला रिलीज होणार आहे. पण त्याचा चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याच्या लव्ह अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरु आहे. अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेलीसोबत तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. या गॉसिपना उधाण आलेले असताना आता या सगळ्याला मिझाननेच फुलस्टॉप दिला आहे.
मिझान सोशल मीडियावर दिवसेंदिवस ठरत आहे हॉट
काय म्हणाला मिझान?
मिझान सध्या त्याच्या ‘मलाल’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. प्रमोशनदरम्यान त्याला त्याच्या रिलेनशीपबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येतात.पण एक प्रश्न त्याला सातत्याने विचारला जातो तो म्हणजे त्याचे आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांच्या सोबतच्या नात्याबद्दलचा.. मिझान फ्लोअवर येण्यापूर्वी त्याचे नव्या नवेलीसोबत अनेक फोटो असल्याचे पाहायला मिळाले आहेत. या फोटोवरुनच त्याला नव्या नवेलीसोबतच्या नात्यावरुन प्रश्न विचारले जातात. पण एका कार्यक्रमादरम्यान मिझानने या मागचे खरे काय? ते सांगून टाकले आहे. तो म्हणाला की, नव्या आणि माझी बहीण न्यूयॉर्कमध्ये एकाच ठिकाणी शिकायला होते. त्यामुळे साहजिकच आमची मैत्री आहे. पण या फोटोवरुन लोकांनी काहीतरी वेगळाच अंदाज काढायला सुरुवात केली हे चुकीचे आहे, असे तो म्हणाला आहे.
एकाएकी चर्चेत आलेल्या या अभिनेत्री सध्या काय करत आहेत ते जाणून घ्या
पण लग्न करेन नवेलीशी
नवेलीसोबत मैत्रीशिवाय काहीही नाही हे मिझानने सांगितले खरे. पण एका इंटरव्ह्यू दरम्यान जेव्हा त्याला kill, marry, hook up असा प्रश्न विचारुन सारा अली खान,नव्या नवेली नंदा आणि अनन्या पांडे असे पर्याय देण्यात आले त्यावेळी मात्र त्याने लग्नासाठी नव्याला निवडले. Hook up साठी सारा अली खानला आणि kill या पर्यायासाठी अनन्या पांडेला निवडले. त्यामुळे एकीकडे काहीच नाही म्हणताना लग्न करेन नवेलीशी हा पर्याय मात्र अनेकांना रुचला नाही बहुधा.त्याच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा यावर चर्चा रंगेल हे नक्की!
असे मराठी चित्रपट जे तुम्ही नेहमीच पाहायला हवे
रणवीरसिंहची मिझानची तुलना
मिझानचे लुक्स पाहता त्याची तुलना आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहशी सगळीकडे करण्यात येत आहे. पण या बाबतीत त्याने आपले मत स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, रणवीरसिंहशी माझी तुलना करणे चांगले आहे.पण मी अजून कामाला सुरुवात केली नाही.मला माझ्या कामाकडे सध्या लक्ष द्यायचे आहे. मला माझ्या कामाची पोचपावती मिळणे सध्या जास्त गरजेचे आहे.
कोण आहे नव्या नवेली नंदा ?
नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिची मोठी मुलगी आहे. नव्या नवेली हल्ली नेहमीच चर्चेचा विषय असते. बोल्ड आणि उत्तम फॅशनसाठी ती ओळखली जाते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल असतात. तिचा हा अंदाज पाहता बॉलीवूडमध्ये ती नक्कीच आपला जलवा दाखवेल असे म्हटले जात आहे.
पण सध्या एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मिझान हा सिंगल आहे त्यामुळे जर तुम्हाला मिझान आवडला असेल तर अजूनही संधी आहे बरं का!