ADVERTISEMENT
home / Fitness
तुमचे  smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का

तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती तुम्हाला माहीत आहेत का

तुमचा चेहरा आकर्षक असेल तर तुमच्याकडे मागे वळून वळून लोकं पाहतात. तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरील गोड हसू ते पाहत असतात.आता तुम्ही हसणार म्हटल्यावर तुमचे दात तर दिसणारच ना? पण काहींच्या गोड चेहऱ्याला त्यांचे दात अजिबात शोभणारे नसतात. काहींचे दात त्यांच्या चेहऱ्यापेक्षा मोठे असतात.काहींच्या दातामध्ये मोठ्या फटी असतात. काहींचे दात पिवळे असतात. तर काहींचे अगदी हसताना दिसणारे दातच पडलेले असतात. अशा दातांची बाळगण्यापेक्षा तुम्ही त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज करण्याची भीती वाटत असेल. तर ती भीती आधी मनातून काढून टाका. हल्ली इतक्या सोप्या आणि न दुखणाऱ्या शिवाय झटपट होतील अशा उपचार पद्धती आहेत. त्या कोणत्या त्याविषयी अधिक जाणून घेऊयात.

कंपोझिट फिलिंग/ स्माईल इन्हान्सर (composite feeling)

tooth filing

दातांमध्ये मोठी फट असेल किंवा तुमचे दात अगदी थोड्याफार फरकाने वेडेवाकडे असतील.तर कंपोझिट फिलिंगच्या मदतीने तुमचे दात हल्ली नीट केले जातात. तुमच्या दातासारख्याच असणाऱ्या मटेरिअलचा उपयोग करुन तुमच्या दातांमधील फट भरली जाते. हे करताना तुम्हाला अजिबात दुखत नाही.

दातदुखीसाठी घरगुती उपाय, नक्की वाचा

ADVERTISEMENT

तुमचे दात आधी स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते फिल करुन ते फिलिंग घट्ट किंवा कडक करण्यासाठी त्यावर एक मशीन फिरवली जाते. तुमचे समोरचे दात असल्यामुळे साधारण 20 ते 30 मिनिटे त्यासाठी लागतात. पण एकदा कंपोझिट फिलिंग झाल्यानंतर तुमचे हसणे इतके खुलते की, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल लगेच दिसून येतो.या नव्या ट्रिटमेंटमुळे तुम्हाला दातांना तारा लावण्याची गरजही भासत नाही.

*प्रत्येकी 2 हजार ते 3 हजार रुपये दात आहे

टुथ ब्लीचिंग (Tooth bleaching)

bleaching tooth

सेलिब्रिटींचे दात इतके पांढरेशुभ्र कसे असतात असा प्रश्न अनेकांना पडतो. ते शुभ्र दातांसाठी घरगुती उपाय करत असतील का? सेलिब्रिटींना त्यांच्या चेहऱ्यासोबतच दातांची काळजी घेणेही गरजेचे असते. त्यांना फोटोसाठी कित्येक ठिकाणी हसावे लागते. सगळ्यांच्याच दाताचा रंग हा शुभ्र पांढरा असतो असे नाही. काहींच्या दाताचा रंग हा पिवळसर असतो. हल्ली चांगल्या प्रतीचे टुथ ब्लीचींग आलेले आहेत. ज्यामुळे तुमचे दात कृत्रिम पांढरे दिसत नाहीत तर त्यांचा शेड 5  ते 6 शेड उजळतो.

ADVERTISEMENT

*साधारणत: 9 हजारापासून याची सुरुवात होते

साधाऱण लग्नासाठी मुली अशाप्रकारचे टुथ ब्लीचिंग करुन घेतात. तुमच्या कॉफी किंवा अन्य सेवनावर त्याचा पांढरेपणा टिकून असतो. हि ट्रिटमेंट करुन घेण्यासाठी तुमच्या चांगले  2 ते 4 हवेत. या ट्रिटमेंटनंतर तुम्हाला दातातून थोडी कळ आल्यासारखे वाटेल. पण त्यावर तुम्हाला डॉक्टर इलाज सांगतील. शिवाय या कालावधीत तुम्हाला वापरण्यासाठी काही जेल आणि टुथपेस्ट देतील. 

पिवळ्या दातांनी आहात हैराण तर करा हे उपचार

विनिअर्स (Veneers)

veneers

ADVERTISEMENT

तुम्हाला अगदी एकसारखे आणि सुंदर दात हवे असतील आणि तुमच्याकडे खूप पैसाही असेल तर तुम्ही विनिअर्स नावाचा प्रकारही करु शकता. यामध्ये तुमच्या दातांवर एक वेगळे कव्हर चढवले जाते. तुम्ही ज्यावेळी हसता त्यावेळी तुमचे दात एका रांगेत आणि इतके सुंदर दिसतात की, तुम्हाला तुमचे स्माईल इंप्रुव्ह झाल्याचे पटकन लक्षात येईल. आता दुसरी गोष्ट अशी की, या ट्रिटमेंटमध्ये तुमचे मूळ दात ट्रिम केले जातात आणि त्यावर क्राऊन लावले जातात त्यालाच विनिअर्स असे म्हणतात.

*सध्यस्थितीत त्याचा एका दाताचा खर्च साधारण 10 हजार रुपये इतका आहे

(सौजन्य- shutterstock)

You Might Like This:

ADVERTISEMENT

जीभेच्या रंगावरुन ओळखा तुमच्या आरोग्य समस्या

अक्कल दाढ दुखीवर उपाय आणि प्रतिबंधनात्मक उपाय

28 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT