ओ माय गॉडनंतर आता या चित्रपटाचा सीक्वल असलेला ओ माय गॉड 2 ची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ओ माय गॉडमध्ये अभिनेता अक्षयने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. आता तो ओ माय गॉड 2 मध्ये भगवान शंकर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा फस्ट लुक रिलीज करण्यात आला. या लुकमुळे या चित्रपटात नेमकं काय वेगळेपण असणार अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे.
Oscars 2022: शेरनी आणि सरदार उधम सिंह या चित्रपटांना मिळाले नामांकन
अक्षय कुमार साकारणार भगवान शंकर
अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याचा OMG2 चा फस्ट लुक शेअर केला आहे. त्याने सोबत हे ही शेअर केलं आहे की, “कर्ता करे न कर सके, शिव करे सो होय…’ OMG2 साठी तुम्हा सर्वांच्या आर्शीवाद आणि शुभेच्छांची गरज आहे. या सामाजिक समस्येवर चिंतन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्व आदियोगी आम्हाला आर्शीवाद देतील. हर हर महादेव.” या पोस्टरमध्ये दोन फोटो आहेत. ज्यामध्ये एका मध्ये भगवान शंकराने भक्ताचा हात घट्ट पकडलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये अक्षयचा भगवान शंकराच्या भूमिकेतील लुक दाखवण्यात आला आहे. यासोबतच त्याने एका पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत पंकज त्रिपाठीदेखील आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिली आहे. “ब्रम्हांडची सुरूवात जिथे, ब्रम्हांडची स्थापना जिथे, आदि आणि अनंताचा काल स्वामी, भगवान महाकालचे आर्शीवाद घेण्यासाठी तपस्वींच्या नगरी उज्जैनमध्ये मी आणि माझा मित्र पंकज त्रिपाठी…”
अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र
OMG 2 च्या शूटिंगला झाली सुरूवात
उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आर्शीवाद आणि साक्षीने OMG 2 च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अक्षय प्रत्यक्ष भगवान शंकर साकारणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमी यांचीदेखील मुख्य भूमिका असेल. अमित राय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अक्षय कुमार या व्यतिरिक्त सूर्यवंशी, अतरंगी रे, रक्षाबंधन, मिशन सिंड्रेला, रामसेतू अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येत आहे.