Advertisement

मनोरंजन

अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 22, 2021
a fakt tuch

Advertisement

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar) आणि सुरुची आडारकर (Sururchi Adarkar) “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. चिन्मय आणि सुरूची या दोघांनाही मालिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे आणि त्यांचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. तसंच पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर एकत्र येत आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम

“A फक्त तूच” चे टीजर पोस्टर लाँच!!

जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची कथा त्यांचीच असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी  निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत. या चित्रपटाचे टीजर लाँच बाप्पासमोर करण्यात आले आहे. आता प्रेक्षकांचा या चित्रपटाला आणि या जोडीला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: उत्कर्ष आणि जय खेळतात रडीचा डाव, प्रेक्षक नाराज

रोमँटिक कथा असल्याचा अंदाज

समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.  चिन्मय आणि सुरूची या दोघांचाही अभिनय नेहमीच वाखाणला गेला आहे. अत्यंत नैसर्गिक अभिनय असणारे दोन्ही अभिनेते असून या दोघांचा एकमेकांसह कसा अनुभव असेल आणि यांची फ्रेश जोडी कशी दिसेल याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताचा ‘अगंबाई सूनबाई’ या मालिकेतून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. तर सुरूचीदेखील मालिकांमध्ये दिसून येते. याशिवाय दोघेही नाटकांमध्येही काम करतात. त्यामुळे दोघेही कसलेले कलाकार असून मराठी प्रेक्षकांमध्ये या दोघांचे नाव माहीत नाही असे विरळाच असतील. त्यातही चिन्मयला महिला फॅन फॉलोईंग अधिक आहे. त्यामुळे आता या रोमँटिक चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. 

अजूनही या चित्रपटाची तारीख सांगण्यात आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटाची तारीखही जाहीर करण्यात येईल. तर बाप्पाचा आशीर्वाद घेऊन या चित्रपटाची वाटचाल सुरू झाली आहे आणि प्रेक्षकांना ही वेगळी स्टोरी नक्की आवडेल असा विश्वासही या टीमला आहे. 

अधिक वाचा – रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक