बॉलीवूडमध्ये एखादी बायोपिक येणार असेल तर त्याआधीच ती साकारणाऱ्या कलाकाराबाबत लोक आपली मत व्यक्त करतात. एखादं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व साकारताना लुक्स, अभिनय, हावभाव आणि संवादामध्ये मग या कलाकारांचा कस लागतो. सध्या सोशल मीडियावर संजय लीला भन्सालीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गंगूबाई हरजीवनदास जी मुंबईची माफिया डॉन होती. गुजरातमधून प्रेमविवाह करून पळून आल्यानंतर नवऱ्याने तिला वैश्या व्यवसायात ठकललं. त्यानंतर ती पुढे डॉन कशी झाली याचा हा प्रवास आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट गंगूबाईची भूमिका साकारत आहे. मात्र आलिया या भूमिकेसाठी योग्य नसल्याची टीका सध्या तिच्यावर होत आहे. यावर काय म्हणाली आलिया भट
राकेश बापटला शेट्टी कुटुंबाकडून पसंती, काय आहे राकेशचं करिअर
आलियाने व्यक्त केलं आपलं मत
आलिया भट साकारत असलेली गंगूबाई काठियावाडी ही भूमिका मुंबई क्वीन ऑफ माफिया या पुस्तकावर आधारित आहे. आतापर्यंत गंगूबाई काठियावाडीचे जे खरे फोटो लोकांनी पाहिले आहेत त्यानुसार आलिया या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं मत प्रक्षकांनी तयार केलं आहे. त्यामुळे आलियाने एका मुलाखतीत याबाबत स्पष्ट केलं आहे की, ” मी वयस्कर नाही. त्यामुळे तुम्ही डोक्यातून हे काढू टाका मी एका वयस्कर महिलेची भूमिका साकारत आहे. वास्तविक आपल्याकडे गंगूबाईंची जास्त माहिती उपलब्ध नाही. एक फोटो आहे तो पण ब्लॅक अॅंड व्हाईटमध्ये आहे. शिवाय तो त्यांचा म्हातारपणातील फोटो आहे. लोकांनी हा फोटो पाहून त्यांच्यासोबत माझी तुलना केलेली आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की मी गंगूबाईंसारखी दिसत नाही तर मी माझी भूमिका प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने साकारली आहे. गंगूबाई जेव्हा तरूण होती तेव्हा ती खूप शक्तीशाली होती. तिच्या जीवनात अनेत बदल अचानक झाले होते. कमी वयात तिला सारं सहन करावं लागलं होतं. त्यामुळे आम्ही चित्रपटात तिचा सोळाव्या वर्षीपासून ते पस्तिशीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. लोक चुकीचे विचार करत आहेत असं मला म्हणायचं नाही. मात्र मी या भूमिकेसाठी योग्य नाही हे मला पटत नाही. मला ही भूमिका साकारताना खूप मजा आली कारण मला वाटतं माझ्याशिवाय इतर कोणी ही भूमिका अशा प्रकारे साकारू शकलं नसतं. मला जसं संजय लीला भन्साली यांनी सांगितलं तसंच मी या चित्रपटात साकारलं आहे “
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलंय बप्पी लाहिरीचं नाव
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मागील सोळा वर्षांमध्ये संजय लीला भन्सालीने अनेक अप्रतिम आणि भव्यदिव्य चित्रपट निर्माण केले आहेत. त्याने खामोशी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा हा करिअरमधला दहावा चित्रपट आहे. हा चित्रपट एक बायोग्राफिकल क्राइम ट्रामा आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री, कोण आहे जेसिका