ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बिग बींचे मन अजूनही हॉस्पिटलमध्येच, अभिषेकच्या आठवणीने झाले व्याकूळ

बिग बींचे मन अजूनही हॉस्पिटलमध्येच, अभिषेकच्या आठवणीने झाले व्याकूळ

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीच हादरून गेली होती. मात्र आता बिग कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. चाहत्यांसाठी ही एक नक्कीच आनंदाची बातमी आहे. मात्र घरी आल्यावरही अमिताभ बच्चन यांचे मन मात्र अजूनही हॉस्पिटलमध्येच रूंजी घालत आहे. बिग बीचे मन व्याकूळ झालं आहे कारण त्यांचा मुलगा अभिषेक अजूनही हॉस्पिटलमघ्येच आहे. ते सध्या अभिषेकला खूपच मिस करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना अशा व्यक्त केल्या…

काय वाटत आहे बिग बींना

अमिताभ बच्चन यांचे चाहते अनेक आहेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये असतानाही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे अपडेट ते चाहत्यांना देत होते. हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत. त्यांनी शेअर केलं आहे की, “कोरोनामुक्त होऊन हॉस्पिटलमधून घरी येणं ही एक आनंदाची बातमी नक्कीच आहे. मात्र मन आताही उदासच आहे. कारण अभिषेक अजून हॉस्पिटलमध्येच आहे. कारण त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत “यापुढे त्यांनी लिहीलं आहे की, “आरोग्य, टेस्ट, लॅब रिपोर्ट्स हे सर्व डोक्यात सुरू आहे. कारण हॉस्पिटलमध्ये असणं ही एक विचित्र स्थिती असते. या सर्व गोष्टींमधून या काळात जावं लागतं. प्रत्येक तासागणिक तुम्हाला आरोग्याची माहिती आणि सल्ले घ्यावे लागतात. जगातील सर्व डॉक्टर्सचे हे महान काम तुम्हाला तुम्ही निरोगी आहात हा विश्वास देतं. तिथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला विश्वास दिला जातो की सर्व काही ठीक होणार आहे” त्याचसोबतच त्यांनी शेअर केलं आहे की, “अभिषेकसाठी मला खूपच वाईट वाटत आहे. मी देवाजवळ सतत प्रार्थना करत आहे की तो लवकर घरी सुखरूप परत यावा”

श्वेतालाही येत आहे अभिषेकची आठवण

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र आता अमिताभ बच्चन कोरोनातून पूर्णपणे हरे होऊन घरी परतले आहेत. तर अभिषेकवर अजूनही काही उपचार होणं बाकी आहे. अमिताभ प्रमाणेच बहीण श्वेतालाही तिच्या भावाची खूप आठवण येत नाही. सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे तिने अभिषेकसोबत तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

अमिताभ बच्चन यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले धन्यवाद

काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये असताना अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंटवरून आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांनी शेअर केलं होतं की, आरोग्य कर्मचारी अतिशय कठीण आणि भयानक परिस्थितीत त्यांचं काम करत आहेत. म्हणूनच आपण सुरक्षित आहोत… पांढऱ्या रंगाचे पीपीई युनिट घालून रूग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स, इतर स्टाफ म्हणजे देवाघरचे दूतच आहेत… एवढ्या मोठ्या कामात बिझी असुनही ते त्यांच्या पेशंटच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वेळ काढतात ” हॉस्पिटलमध्ये असताना सोशल मीडियावरून ते चाहत्यांच्या संपर्कात होते. शिवाय ब्लॉग लिहून आणि कविता शेअर करून स्वतःचे मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळावी,पण- धर्मेंद्र

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

ADVERTISEMENT

रीनाच्या ‘इन्स्टा लाईव्ह’ चा बोलबाला… चक्क भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलची हजेरी

03 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT