आयुर्वेदात आवळ्याला ईश्वरीय देणगी म्हंटल आहे. याच कारण म्हणजे आवळा (Amla) हे एकमेव फळ आहे, जे वात, पित्त आणि कफ या तिन्ही रोगांचं निवारण करतं. अगदी शास्त्रज्ञांनीसुध्दा आवळ्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त बळ देण्याची क्षमता आहे, हे मान्य केलंय. मांसाहारी लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या आहारातून अनेक प्रकारचं पोषण मिळतं. मात्र शाकाहारी लोकांना फक्त आवळा खाऊनसुध्दा हे पोषण मिळू शकतं. त्याचमुळे आवळ्याला आधुनिक युगात ‘सुपरफ्रूट’ तर आयुर्वेदात ‘अमृत फळ’ असे म्हणतात.
तसं पहायला गेलं तर आवळ्याचे गुणधर्म विविध रोगांवर गुणकारी आहेत. पण आज आपण केसांसाठी आवळा कसा उपयुक्त ठरतो, ते पाहू. तुम्हाला माहित्येय का, आवळा वापरल्याने तुमचे केस रेशमासारखे मऊ आणि सुंदर होऊ शकतात. पांढरे केस काळे होऊ शकतात, टक्कल जाऊ शकतं, एवढचं नाही तर नव्याने केसही येऊ शकतात. केसांच्या विविध समस्यांवर आवळ्याचा उपयोग कसा करायचा, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आवळ्याची पावडरचेही अनेक फायदे असतात. तुम्हाला याचाही उपयोग या लेखातून कळेल.
Also Read Hair Care Tips In Marathi
तुम्ही लहानपणापासून आवळा खात असाल, वापरत असाल तर अगदी म्हातारपणापर्यंत तुमचे केस काळेभोर राहतील. पण जर असं नसेल तर केस पांढरे होतील. त्यावर उपाय म्हणून बाजारातील केमिकलयुक्त डाय वापरण्याऐवजी आवळ्याचा वापर करा.यासाठी तुम्हाला आवळा आणि तेल किंवा तुपाचा वापर करता येईल. एक लिटर आवळ्याच्या रसात एक लिटर साजूक तूप किंवा तेल घाला. या मिश्रणात 250 ग्रॅम मुलदी मिक्स करुन हे मिश्रण कमी आचेवर उकळा. जेव्हा तेलामधून पाणी उडून जाईल, तेव्हा तेल गाळून बाटलीत भरुन ठेवा. डायपेक्षा हे तेल लावा. काही दिवसांतच तुमचे बहुतेक केस काळे होतील. त्याचबरोबर लिंबाचा रस आणि आवळा पावडर लावून केस धुवा. असं केल्याने केस मऊसूत तर होतीलच शिवाय काळेही होतील.
धावपळीच्या युगात केस गळतीची समस्या कोणाला जाणवत नाही? ही गळती थांबण्यासाठी रात्रभर पाण्यात आवळे भिजत घाला. सकाळी त्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आता हे पाणी हळूवारपणे केसांना चोळत केस धुवा. त्यामुळे केसांचं गळणं कमी होईल. महिनाभर हा उपाय केलात तर तुमचे केस दाटही दिसू लागतील.
जसं एका दिवसात टक्कल पडत नाही तसंच त्यावर एका दिवसात केसही येत नाहीत. म्हणूनच त्यावर आवळ्याचा वापर वेगवेगळ्या पध्दतीने करणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान तीनदा तरी आवळ्याच्या रसाने डोक्याला मालिश करायला हवी. डोकं धुतानाही पाण्यात आवळ्याचा रस टाका. त्याचसोबत जेव्हा आणि जितका शक्य होईल तितका आवळा दातांनी चावून खा. लवकरच तुम्हाला त्याचा फायदा जाणवू लागेल. या शिवाय जर तुम्हाला केसांसाठी काही चांगले प्रॉडक्ट वापरायचे असतील तरी तुम्ही देखील आवळ्याचे घटक असलेला बेस्ट आवळा शॅम्पू निवडू शकता आणि सुंदर केस मिळवू शकता.
लहान मुलांच्या डोक्यात उवा झाल्या तर आवळ्याचं बी बारीक दळून घ्या आणि त्यात लिंबू पिळून मिक्स करा. केसांमध्ये भांग पाडून हे मिश्रण लावा. 2 तासांनी केस धुवा. उवांचा त्रास कमी होईल.
इसे भी पढ़ें – इन 6 हेयर केयर टिप्स से पार्लर की तरह नेचुरली सेट रहेंगे आपके खूबसूरत बाल
तुम्हाला जर तुमचे केस कायम लांबसडक, सुंदर, चमकदार, दाट, मऊसूत आणि काळेभोर असावेत असं वाटत असेल तर मग सोप्पं आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आवळ्याचा समावेश करा. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही आवळ्याला डाएटमध्ये सामील करु शकता आणि नेहमीच आवळ्याचं तेलही केसांना लावू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आवळ्याला डाएटमध्ये कसं सामिल करायचं? खूप पर्याय आहेत आणि आजकाल बाजारात खाऱ्या किंवा गोड चवीची आवळा कॅंडीसुध्दा मिळू लागली आहे. ही कॅंडी तुम्ही सकाळी नाश्ता करताना किंवा संध्याकाळी केव्हाही खाऊ शकता.
घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज
मोरावळाही चांगलंच ऑप्शन आहे. गोड आवडत नसेल तर आवळा नुसताच उकडवून त्याला मीठ लावून खाल्लं तरी चालेल. आवळ्याची चटणी, सरबत, लोणचं कोणत्याही स्वरुपात आवळा खा. अगदी त्रिफळा किंवा च्यवनप्राश खाल्लं तरी चालेल. कारण त्यातही आवळा असतोच. तुम्ही नियमित हे पदार्थ खाल्ले तर नक्कीच तुमचे केस सुंदर होतील यात वाद नाही.
Image Courtesy : Instagram
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय
लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय