पुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. तर ज्याला भारतात पुदीना (mint leaves in marathi) या नावाने ओळखले जाते त्यालाच Mint असे इंग्लिशमध्ये म्हणतात.. ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो. पुदीन्याच्या पानाचे याशिवायही अनेक फायदे आणि आरोग्यदायी लाभ आहेत. जसं अस्थमा, स्मरणशक्ती कमी झाल्यास आणि त्वचेच्या देखभालीतही याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत याच पुदीन्याचे फायदे (pudina benefits in marathi) आणि नुकसान विस्तृतपणे.
मिंटचं जीवनसत्त्व मूल्य (Nutrients Found In Pudina In Marathi)
पुदीन्याचं वैज्ञानिक नाव मेन्था असे आहे, ज्याचा वापर हा मुख्यतः मुख दुर्गंधी घालवण्यासाठी केला जातो. पुदीन्याची वैज्ञानिक स्तरावर 24 पेक्षा जास्त प्रकार आणि 100 पेक्षा जास्त प्रजाती असल्याची पुष्टी झाली आहे. या औषधीचा उपयोग शेकडों वर्षांपासून यातील औषधी गुणांमुळे केला जात आहे. सामान्यांमध्ये पुदीन्याचा वापर हा जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासाठी कमी प्रमाणात केला जातो. याशिवाय पुदीन्याला अँटीऑक्सीडंट (Antioxidant) आणि व्हिटॅमीन A चा उच्च स्त्रोत म्हणून संबोधलं गेलं आहे. ज्याचा वापर डोळ्यांचा प्रकाश आणि नाईट व्हिजनसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. पुदीन्यात आढळणाऱ्या अँटीऑक्सीडंट्स आपल्या शरीराची तणावापासून मुक्तता करण्यात सहाय्य करतात.
आरोग्यदायी पुदीन्याचे फायदे (Pudina Benefits In Marathi For Health)
Pudina Benefits In Marathi
बाजारात दंत मंजन (toothpastes), चुइंग गम्स, माऊथ फ्रेशनर (breath fresheners), कँडीज आणि इनहेलरसारखअया अनेक उत्पादनांमध्ये पुदीन्याचा मुख्यतः वापर केला जातो. पण पुदीन्याचे अजूनही आहेत अनेक आरोग्यदायी फायदे.
पचन होते सुलभ
मेंथा पाचन प्रणाली (Digestive system) ला शक्तीशाली बनवण्यात मदत करते. ज्यामुळे पचनाचे सर्व कार्य योग्य प्रकारे होते. कारण जर पचनशक्ती योग्य नसेल तर जेवण पचवण्यात अनेक समस्या येतात. ज्यामुळे अपचन आणि पोट खराब होण्यासारख्या समस्यांचा समावेश आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की पोट बिघडतंय तेव्हा एक कप पुदीन्याचा चहा प्यावा. लगेच आराम मिळेल. पुदीन्याच्या वासाने तुमच्या लाळ ग्रंथी सक्रिया होतात. तसंच लाढ ग्रंथीतून पचनासाठी योग्य एंजाईम स्त्रवण्यासाठी चालना मिळते. ज्यामुळे पचन सुलभ होते.
लिव्हरसाठी पुदीन्याचे फायदे
जेव्हा तुमचं लिव्हर हळूहळू अकार्यक्षम होतं तेव्हा तुमचा चेहराही कोमेजू लागतो. अशा परिस्थितीत मदत होते ती पुदीन्याची. त्यामुळे आपण पुदीन्यातील पोषक तत्त्वांचे आभार मानले पाहिजेत.
स्मरणशक्तीला चालना
एक ताजा रिसर्चनुसार पुदीना तुमच्यातील जागरूकता, धारण शक्ति आणि संज्ञानात्मक क्रियेचा प्रभाव वाढवताना आढळते. ज्या अनुसार एक्सपर्ट या निर्णयावर पोचले आहेत की, जी लोकं च्यूइंग गम खातात. ज्यामध्ये पुदीना मुख्यतः असतो. त्यांची स्मरणशक्ती इतरांच्या तुलनेत जास्त सतर्क असते. काही रिसर्चमध्ये हेही आढळलं आहे की, पेपरमिंट तेलाच्या सुवासाने तुमची स्मृती आणि सतर्कता वाढू शकते. पण याबाबत अजून अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी
कॅन्सरपासून बचावासाठी पुदीन्याची मदत होते कारण इतर औषधी वनस्पतींप्रमाणेच पुदीन्यातही कॅन्सरविरोधी अनेक गुण आढळतात. पुदीन्याच्या पानातील हा गुणधर्म यातील विभिन्न प्रकारच्या एंजाईममुळे आढळून येतो.
वेदनाशामक पुदीना (Mint Leaves For Pain)
अनेक प्रकारच्या वेदनाशामक बाममध्ये पुदीन्याचा अर्क मुख्य घटकाच्या रूपात वापरला जातो. याचं कारण आहे की, ज्या भागात वेदना होते किंवा जखम होते त्या ठिकाणी पुदीनायुक्त बाम लावल्यास थंडावा मिळतो. यामुळे वेदना कमी होतात. तसंच पुदीन्यातून निघणाऱं बाष्प श्वासाद्वारे हुंगल्यासही फरक पडतो. यामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो. हे अप्रत्यक्ष रूपाने वेदना आणि डोकेदुखीशी निगडीत सर्व समस्या दूर करते.
कफ आणि सर्दीवरही गुणकारी
मिंटमधील तीव्र गंध जो नाकाद्वारे शरीरात जाऊन श्वसन प्रक्रिया सुलभ करतं. हे कफ शरीराबाहेर टाकण्यास मदत करतं. जेव्हा तुम्हाला खोकल्याचा त्रास होतो. तेव्हा पुदीन्यातील एंटी बॅक्टेरियल आणि एंटी इन्फ्लामेंट्री गुणांमुळे श्वसन तंत्र सुलभ होण्यासोबतच घश्याची सूजही कमी होते. जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यावर पुदीन्याच्या पानांचा रस गरम पाण्यात घालून त्याची वाफ घ्या. ही वाफ घेतल्याने तुमच्या घश्याला आणि नाकाला खरोखर आराम मिळेल.
पाळीच्या दिवसातील वेदनांवरही गुणकारी
पुदीन्याची पान तुमचं रक्त शुद्ध करतात आणि आपल्या शरीरातील शांत मांसपेशींवर याचा anti-spasmodic effect पडतो. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांतील वेदना दूर करण्याचाही हा एक चांगला उपाय आहे. उपाय म्हणून तुम्ही पुदीन्याच्या चहाचा एक कप गरम काढा बनवून घ्या आणि तो दिवसभर घोट घोट पीत राहा. जो तुमच्या गर्भाशयाला शांत करेल.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
पुदीन्याच्या पोटावर होणाऱ्या प्रभांवामुळे गर्भवती महिलांसाठीसुद्धा हे उत्तम आहे. हे पचन प्रक्रियेसाठी एंजाईम सक्रीय करून मॉर्निंग सिकनेसमुळे होणारी मळमळ दूर करण्यात मदत करतं. सकाळी उठल्यावर पुदीन्याची काही पानं चावून खाणं किंवा वाटलेल्या पुदीन्याच्या पानांचा वास घेणं ही योग्य पद्धत आहे. पण गर्भवती महिलांनी एक लक्षात ठेवावं की, याचा वापर बाळ झाल्यावर करू नये. कारण याचा प्रभाव तुमच्या स्तनपानावर होऊ शकतो.
प्रतिकारक्षमतेसाठी
पुदीन्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमीन सी, डी, ई आणि व्हिटॅमीन बी कॉम्प्लेक्स ही पोषक तत्त्वही थोड्या प्रमाणात आढळतात. ही सर्व तत्त्व एकत्रितपणे शरीराची प्रतिकारक्षमता वाढवतात. ज्यामुळे शरीराचं संक्रमणांपासून आणि सूज येण्यापासून संरक्षण होतं.
तणावमुक्ती
तणाव आणि चिंतेपासून मुक्तता मिळवण्यासाठीही पेपरमिंट चहा सर्वोत्तम आहे. यातील मेन्थॉल मांसपेशींना आराम देतो आणि प्रकृतीमध्ये ही पान एंटीस्पास्मोडीक आहेत. पुदीन्याच्या पानांच्या चहा सेवनाने तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्तता मिळते.
ओरल हेल्थसाठी पुदीना
तुमच्या दातांची काळजी घेण्यात पुदीना मदतनीस ठरू शकतो. आपण पाहतो की, बहुतेक टूथपेस्ट्समध्ये मिंट असते. कारण दातांच्या स्वच्छतेसाठी पुदीना गुणकारी आहे. हा तुमच्या दातांना स्वच्छ करून तोंडाची दुर्गंधीही दूर करतो. तोंडातील बॅक्टेरियाला आळा घालण्यात पुदीना कार्यशील आहे.
वजन घटवणे
Mint च्या इतर उपयोगांसोबतच वजन घटवण्यातही हे मदत करतं. पुदीना हा असा प्रेरक पदार्थ आहे जो वेगवेगळ्या प्रकारच्या पाचन एंजाईम्सना प्रेरित करतो. जी तुमच्या आहारातील पोषक तत्त्वांना शोषतात. तसंच वसा रूपातील चरबीचा वापर योग्य उर्जेत बदलतात. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी आहारात पुदीना सामील करा ज्यामुळे तुम्ही शरीरातील अतिरिक्त चरबी जमा होणं टाळू शकाल.
पुदीन्याच्या वापराने मिळवा सौंदर्य (Beauty Benefits Of Mint Leaves In Marathi)
Beauty Benefits Of Mint Leaves In Marathi
मिंट म्हणजेच पुदीना हा मेंथॉलचा उत्तम स्त्रोत असून यात अँटीबॅक्टेरियल प्रोपर्टीजही आहेत. त्यामुळे याचा वापर हा बरेचदा क्लींजर्स, एस्टीजंट्स, टोनर्स आणि मॉईश्चराईजर्समध्ये केला जातो. तुम्हीही वेगवेगळ्या त्वचेशी निगडीत समस्यांसाठी याचा पुढीलप्रमाणे वापर करू शकता.
मिंटचा वापर एक्नेसाठी
साहित्य Ingredients – 10 ते 12 पुदीन्याची पानं आणि एक चमचा लिंबाचा रस.
What You Need To Do पुदीन्याची पान वाटून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या एक्ने, एक्ने स्कार्स आणि एक्ने-प्रोन त्वचेवर लावा. किमान 15 मिनिटं तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. तुम्हीही दिवसातून एकदा करा.
Why Does It Work मिंट पानांमध्ये सॅलिसायकलिक एसिड असतं जे तुमच्या एक्नेजना बरं करतं आणि वाढूही देत नाही. लिंबाच्या रसातील माईल्ड ब्लींचिग गुणांमुळे एक्ने स्कार्स दूर होतात. तसंच लिंबाच्या रसातील व्हिटॅमीन सी त्वचेतील हिलिंग प्रोसेसला बूस्ट करते.
त्वचा उजळण्यासाठी पुदीना
साहित्य Ingredients – काकडीची एक फोड, पुदीन्याची 10-12 पानं, अर्धा चमचा मध,
What You Need To Do हे दोन्ही घटक एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. मग किमान 20 मिनिटांसाठी ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. हे तुम्ही आठवड्यातून एक-दोन वेळा करू शकता.
Why Does It Work मधातील माईल्ड ब्लीचिंग घटकांमुळे तुमच्या चेहऱ्यावरी टॅन आणि डाग कमी होतात. तसंच तुमच्या त्वचेचं पिगमेंटेशन कमी होतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्या क्लीअर होऊन त्वचा उजळते. तसंच काकडी तुमच्या स्कीन हायड्रेट करते आणि तसंच जळजळही कमी होते.
चमकदार त्वचेसाठी पुदीना
साहित्य Ingredients दोन चमचे कुस्करलेलं केळ, 10-12 पुदीन्याची पान,
What You Need To Do केळ आणि पुदीन्याची पानं वाटून त्याचं चांगलं मिश्रण बनवून घ्या. मग हे चेहऱ्यावर लावून किमान 15-30 मिनिटं तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक ते दोनवेळा करू शकता.
Why Does It Work केळं हे व्हिटॅमीन A, B, C, आणि E चा उत्तम स्त्रोत आहे. तसंच यामध्ये पॉटेशिअम, लॅक्टीक, अमिनो एसिड्स आणि झिंकही आहे. या दोन्ही घटकांच्या मिश्रणाने तुमची त्वचा हायड्रेट होते. तसंच त्वचेचं पोषणही होतं. चेहऱ्यावरील एक्ने आणि त्याचे डाग कमी होऊन कॉलेजन निर्मितीला चालना मिळते. यामुळे त्वचाही लवचिक होते. ज्यामुळे तुमचा चेहरा दिसतो चमकदार.
तेलकट त्वचेसाठी उपयुक्त पुदीना
साहित्य Ingredients एक चमचा मुलतानी माती, 10-12 पुदीन्याची पानं, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा दही.
What You Need To Do पुदीन्याच्या पानांची पेस्ट करून त्यात मुलतानी माती, मध आणि दही मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. किमान 20 मिनिटं तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवून टाका. हे उपाय तुम्ही तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून एक ते दोन वेळा करू शकता.
Why Does It Work मुलतानी माती ही ऑईल कंट्रोलसाठी उत्तम घटक आहे. पुदीन्याच्या पानांसोबत मुलतानी माती मिक्स केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन पोर्सचं सुद्धा क्लिजिंग होतं. त्यासोबतच मध आणि दह्याच्या या फेसपॅकने तुमच्या त्वचेचं मॉईश्चर बॅलन्स होऊन त्वचा तेलकट दिसत नाही.
कोरड्या आणि खाज येणाऱ्या त्वचेवर गुणकारी पुदीना
साहित्य Ingredients पुदीन्याची ताजी पानं 5-6, अर्धा लिटर पाणी आणि पुसण्यासाठी सुती कापड.
What You Need To Do पुदीन्याची पानं अर्धा लिटर पाण्यात किमान 20 मिनिटं उकळा. नंतर ते पाणी थंड होऊ द्या आणि गाळून घ्या. या पाण्यात सुती कापड भिजवून घ्या आणि कोरड्या व खाज येणाऱ्या त्वचेवर हे पाणी लावा. असं किमान 4-5 वेळा करा. हे तुम्ही आठवड्यातून एक दोनदा करू शकता.
Why Does It Work मिंट हा मेंथॉलचा उत्तम स्त्रोत असल्याने यात अँटी-इन्फ्लेमट्री गुण आहेत. जे तुमच्या त्वचेला येणारी खाज आणि इतर त्वचेशी निगडीत समस्या दूर करतात.
सामान्य त्वचेसाठी पुदीन्याची पानं
साहित्य Ingredients 1 tbsp गुलाब पाणी, ½ tbsp मध आणि 10-12 पुदीन्याची पानं.
What You Need To Do हे सर्व घटक मिक्स करून त्याचं चांगल मिश्रण बनवून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. मग किमान 20 मिनिटं तसंच ठेवा आणि थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एक ते दोनवेळा करू शकता.
Why Does It Work गुलाब पाणी हे त्वचेच्या काळजीसाठी उत्तम आहे. याने तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स स्वच्छ होतात, त्वचा हायड्रेट होते आणि एक्ने कंट्रोल होतात. मध आणि मिंटच्या कॉम्बिनेशनने तुमच्या त्वचेचा टोन आणि रंगही उजळतो. तसंच त्वचा हायड्रेट राहते.
सनबर्नसाठी पुदीना
साहित्य Ingredients ¼ ताजी काकडी आणि 10-12 पुदीन्याची पानं
What You Need To Do काकडी आणि पुदीन्याची वाटून घ्या आणि सनबर्न झालेल्या जागी लावा. किमान 20 मिनिटं ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाकावं. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
Why Does It Work काकडी आणि पुदीन्यातील कुलिंग इफेक्ट तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो. ज्यामुळे सनबर्न कमी होऊन त्वचा लवकर उजळते.
पुदीना वॉटर वापरा टोनिंगसाठी
साहित्य Ingredients 1 ½ कप पाणी, 2 चमचे पुदीन्याची पानं, कापसाचा बोळा आणि मॉईश्चराईजर.
What You Need To Do पुदीन्याची पान पाण्यात उकळून ते पाणी अर्ध होऊ द्या. यासाठी ते पाणी किमान 20 मिनिटं उकळू द्या. हे पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या. हे पाणी तुमच्या चेहऱ्याला कापसाच्या बोळ्याने लावा. नंतर चेहरा धुवून मॉईश्चराईजर लावा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
Why Does It Work मिंट हे एक उत्तम क्लिंजर आणि एस्ट्रीजंट आहे. यातील सायक्लिक एसिड तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने कंट्रोल करतं. तसंच डेड स्कीनही कमी होते.
एक्नेचे डाग होतील कमी
साहित्य Ingredients एक चमचा मध, 15 पुदीन्याची पानं आणि एक चमचा लिंबू रस
What You Need To Do याचं चांगलं मिश्रण करून ते एक्नेच्या डागांवर लावा. किमान 15 मिनिटं तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही एक दिवसाआड करू शकता.
Why Does It Work लिंबू आणि मधातील माईल्ड ब्लीचिंग घटकांमुळे एक्नेचे डाग कमी होतात. त्यासोबत पुदीना वापरल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं आणि डेड स्कीन कमी होऊन त्वचा डागविरहीत होते.
पुदीन्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Pudina In Marathi)
अनेक औषधी वनस्पतींप्रमाणेच पुदीन्याचेही काही लोकांवर वाईट परिणाम दिसून आले आहेत.
- जर तुम्हाला गॅस्ट्रोएफेजील रिफ्लक्स रोग (astroesophageal reflux disease) शी निगडीत काही आजार असेल तर पचन समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याचा वापर करू नका. यामुळे त्रास वाढून परिस्थिती बिघडू शकते.
- पेपरमिंट ऑईल जर मोठ्या प्रमाणात वापरल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते.
कोणत्याही शिशू किंवा छोटे मुलाच्या चेहऱ्यावर पेपरमिंट तेल लावू नका. कारण त्यामुळे त्याच्या श्वासावर परिणाम होऊ शकतो. - पित्तामुळे मूतखडा झाल्यास पुदीन्याची उत्पादन वापरणं टाळावं.
पुदीन्याबाबत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तर (FAQ’s)
Mint Leaves In Marathi
पुदीन्याबाबत तुम्हालाही खालील प्रश्न पडतात का….
1. तुम्ही पुदीन्याची पानं खाऊ शकता का?
हो…पुदीन्याची पानं ही आपल्याकडे आवर्जून सलाड, चटणी, डेझर्ट्स, स्मूदीज आणि अगदी पाण्यातही वापरली जातात. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पेपरमिंट चहाचाही समावेश करू शकता. पण पुदीन्यातील आरोग्यदायी गुणधर्मांचा लाभ घेण्यासाठी ती ताजी खावीत किंवा सुकवून मग ती खावीत.
2. मिंट आणि पेपरमिंटमध्ये काही फरक आहे का?
पेपरमिंट आणि मिंट हे दोन्हीही एकच आहे. तसंच याला हिंदीमध्ये पुदीना म्हटलं जातं. मिंट ही जेनरिक टर्म आहे मेंथा प्लांट फॅमिलीसाठी.
3. पेपरमिंटमुळे सारखी लघवी लागते का?
पेपरमिंट तेलाच्या वासाने तुम्हाला लघवीला जावं वाटू शकतं. जर तुम्ही या तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन वॉशरूममध्ये जा. रिलॅक्स व्हा आणि याचा वास घ्या. पाहा लगेच लघवी होते का?
4. पुदीनामुळे हृदयाची धडधड वाढते का?
खरंतर पेपरमिंट हार्टरेट कमी झाल्याचं आढळतं. पण एका संशोधनात याच्या वासाने हार्टरेट आणि ब्लडप्रेशरवर कोणताही परिणाम झालेला आढळला नाही.