ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Benefits of Carbon Peel Facial

उजळ आणि निरोगी त्वचेसाठी ट्राय करून बघा कार्बन पील फेशियल 

तुमच्या त्वचेची चमक कमी झाल्यामुळे किंवा त्वचेवर सुरकुत्या आल्याने तुम्ही वैतागलेल्या असाल तर तुमच्या या समस्येवर एक उत्तम उपाय आला आहे. कार्बन पील फेशियल त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्येवरचा एक चांगला उपाय आहे. कार्बन पील फेशियल केल्याने त्वचा चमकदार होते. वाढत्या वयाचा प्रभाव प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसून येतो आणि प्रदूषणामुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो चांगला मेकअप! पण मेकअपशिवायही आपला चेहेरा छान दिसावा, आपली त्वचा तजेलदार टवटवीत दिसावी असे कुणाला वाटत नाही?  पण धकाधकीचे जीवन आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हे शक्य होत नाही, परंतु कार्बन पील फेशियलने मात्र हे साध्य होऊ शकते. चला तर मग या फेशियलबद्दल जाणून घेऊया.

कार्बन पील फेशियल त्वचेच्या अनेक समस्यांसाठी फायदेशीर 

कार्बन पील फेशियल करण्याची पद्धत थोडी वेगळी असली तरी चेहऱ्यावरील धूळ आणि मातीचे कण साफ करण्याच्या दृष्टीने ती खूप चांगली मानली जाते. या फेशियलमध्ये कार्बनचा थर चेहऱ्यावर लावला जातो, ज्यामुळे त्वचेतील घाण पूर्णपणे साफ होते. यामुळे चेहऱ्यावर एक सुंदर चमक येते.हे फेशियल ‘चायना डॉल पील’ या नावानेही प्रसिद्ध आहे कारण ते केल्यावर चेहरा चायनीज महिलांप्रमाणे टवटवीत आणि तरुण दिसतो. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लेझर ट्रीटमेंट दिली जाते, ज्यामुळे चेहरा कमी वेळात स्वच्छ आणि तजेलदार दिसतो. जर तुम्ही ब्लॅकहेड्स, तेलकट त्वचा, पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर हे फेशियल तुम्हाला खूप फायदा देईल. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. हे फेशियल त्वचेला खोलवर पोषणही देते, ज्यामुळे ती दीर्घकाळ मऊ आणि चमकदार दिसते. जर तुमची त्वचा निर्जीव आणि कोमेजलेली दिसत असेल तर तुम्ही एकदा तरी हे फेशियल करून पहावे.

कार्बन पील फेशियल कसे करतात

Benefits Of Carbon Peel Facial
Benefits Of Carbon Peel Facial

कार्बन पील फेशियल हे दोन टप्प्यात केले जाते. पहिल्या स्टेपमध्ये चेहऱ्यावर लिक्विड कार्बनचा थर लावला जातो. आणि दुस-या स्टेपमध्ये हूवर (व्हॅक्यूम क्लिनर) वापरला जातो, जो त्वचेतील सर्व कार्बन कण आणि घाण काढून टाकतो आणि त्वचेला स्वच्छ करतो. लेझर लाइटचा वापर केवळ कार्बनचे कण काढण्यासाठी केला जातो. ज्या महिलांच्या चेहऱ्यावर मुरुम असतात किंवा ज्यांची त्वचा तेलकट असते किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा असतात त्यांच्यासाठी हे फेशियल विशेष फायदेशीर आहे. त्वचेला एक्सफोलिएट करण्याचा आणि त्वचेचे पॅम्परिंग करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. त्वचेला टवटवीत करण्याच्या दृष्टीने हे फेशियल महत्त्वाचे आहे, कारण ते त्वचेच्या खोल थरांमध्ये आढळणारे कोलेजन नावाचे प्रथिन बनवते. त्यामुळे त्वचेचे स्नायू घट्ट होतात आणि चेहरा तरुण दिसतो.

त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे हे फेशियल 

Benefits Of Carbon Peel Facial
Benefits Of Carbon Peel Facial

साधारणपणे प्रत्येकाला प्रत्येकच प्रकारचे फेशियल चालेल असे नाही. ऍक्ने प्रोन आणि संवेदनशील त्वचा असेल तर कुठलेही फेशियल करून बघायला भीती वाटते कारण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कधी कधी मुरुमांचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो. पण कार्बन पील फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे.  या फेशियलचा एक मोठा फायदा म्हणजे ते त्वचेला कोणत्याही प्रकारे दुखापत करत नाही. ही एक प्रकारची स्किन ट्रीटमेंटच आहे. पण यामध्ये भूल दिली जात नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. फक्त एक क्रीम चेहऱ्यावर लावले जाते. त्यानंतर व्हॅक्यूम क्लिनिंगने चेहरा खोलवर स्वच्छ केला जातो.

ADVERTISEMENT

हे फेशियल केल्यानंतर लगेच थेट सूर्याच्या तीव्र प्रकाशात जाऊ नका. तसेच चेहेऱ्यावर ग्लो कायम टिकवायचा असेल तर संतुलित आहार व योग्य प्रमाणात पाणी पिऊन त्वचेला हायड्रेटेड ठेवा. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT