तव्यावरची गरमागरम पोळी आणि त्यावर तूप लावून खाण्याची काही वेगळीच मजा आहे. आई पोळी करत असताना ताटात गरम पोळी वाढून घ्यायची आणि त्यावर मस्त तूप लावून त्याचा स्वाद घेत मिटक्या मारत खायचं ही मजा तुम्हीही अनुभवली आहे ना? नसेल तर नक्की अनुभवायला हवी. कारण असं करण्याचे अनेक फायदे आहे. बऱ्याच जणांना वाटतं की, पोळीवर अथवा पराठ्यावर असं तूप लावून खाल्ल्याने वजन वाढतं. पण तुम्हाला तूपाचे फायदे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. तुमच्या आरोग्यासाठी असं खाणं योग्य आहे. असे तर तुपाचे बरेच फायदे असतात. पण आपण वजन वाढेल असं वाटून सहसा तूप खात नाही अथवा याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हा लेख वाचून तुम्ही नक्कीच पोळीला तूप लावून खाल. कारण तुपाचे फायदे गरम पोळीबरोबर खाण्यात मजा असते आणि फायदेही असते.
वजन करतं कमी
Shutterstock
तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल. कारण आतापर्यंत तुपाने वजन वाढतं असं आपण ऐकलेलं असतं. पण असं अजिबात नाही. तुपामध्ये आढळणाऱ्या गुणांमुळे तुमचं वजन कमी करण्यसाठी मदत होते. तसंच तुपामुळे तुमच्या हृदयावर कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही. त्यामुळे आरोग्याचीही काळजी घेतली जाते. असं नक्की का होतं कारण वजन कमी करण्यासाठी तुम्ही पोळीला तूप लावा आणि रोज खा. शुद्ध तुपामध्ये सीएलएचं प्रमाण असतं आणि त्यामुळेच हे मेटाबॉलिजम राखून ठेवतं. त्यामुळे याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. यासोबतच जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
Shutterstock
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कोलेस्ट्रॉलच्या अनेक समस्या प्रत्येकालाच सतावत असतात. अशावेळी अनेक उपाय केले जातात. पण त्यावर साधा सोपा उपाय म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही जी पोळी खाता त्यावर तूप लावून खाणे हा असतो. इतका साधा उपाय तुम्ही रोज करू शकता. तुमच्या रक्तातील आणि आतड्यांमधील कोलेस्ट्रॉल तुपामुळे कमी होतं कारण यामध्ये बायलरी लिपीडचा स्राव वाढवण्याची क्षमता असते. जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी उपयोगी ठरतं. तसंच यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढून तुमचं आरोग्य चांगलं राखण्यास फायदेशीर ठरतं.
तुपाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का
रक्तप्रवाह होतो सुरळीत
Shutterstock
पोळी आणि तूप एकत्र खाल्ल्याने रक्तातील सेलमध्ये जमा असलेलं कॅल्शियम कमी होतं आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसंच तुमची प्रतिकारशक्तीदेखील यामुळे वाढते. त्यामुळे रोज किमान एक चमचा तूप तरी तुम्ही पोळीला लावून खाल्लं पाहिजे. अथवा तुम्ही पराठे खात असाल तर तुम्ही त्यावर तूप लावा. यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा मिळेल आणि आजारांपासून दूर राहू शकता.
पचायला हलकं
Shutterstock
तुपाचा स्मोकिंग पॉईंट अतिशय कमी आहे आणि हेच कारण आहे की, जेवण बनवत असताना तुम्ही जर तेल पोळीला लावलं तर त्याचा धूर अधिक येतो आणि तुपाचा धूर होत नाही. पोळी शिजवताना तूप लावल्यास, जळत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोळीबरोबर तूप लावल्याने पोळी पचायलाही हलकी आहे.
शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण
हृदयरोगींसाठी फायदेशीर
Shutterstock
बऱ्याच जणांना हृदयासंबंधी समस्या असतात. तुम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी पोळीवर तूप लावून नियमित खायला हवं. ल्युब्रिकंटप्रमाणे ब्लॉकेज रोखण्याचं काम तूप पोळी करते. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे हृदयाशी संबंधित त्रास असेल तुम्ही नियमित पोळी तूप नक्कीच खायला हवं.
इन्शुलिनची मात्र कमी करतं
Shutterstock
पोळी आणि तुपाच्या या असलेल्या कॉम्बिनेशनमध्ये सीएलए हे इन्शुलिनची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतं. इतकंच नाही तर या कॉम्बिनेशनमधील ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं आणि त्यामुळे रक्तात लगेच साखर मिसळू देत नाही आणि पोटदेखील बराच वेळ भरलेलं राहातं. या दोन्ही गोष्टी मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त गरजेच्या आहेत. तुम्ही नियमित याचं सेवन केल्यास, तुमच्या आरोग्याला याचा फायदा मिळतो.
रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर
लक्षात ठेवा –
तूप खाणं हे चांगलं आहे पण प्रमाणाच्या बाहेर खाणं तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे रोज केवळ एक चमचा तूप तुम्ही पोळीवर घेऊन खा. जास्त खाऊ नका. तसंच तुम्ही पोळीही अति प्रमाणात खाऊ नका. या दोन्हीचं योग्य प्रमाण तुम्ही तुमच्या जेवणात ठेवलंत तर नक्कीच तुमच्या आरोग्याला याचा फायदा मिळू शकतो.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.