तुळशीला ‘हर्ब क्वीन’ किंवा ‘औषधाची राणी’ असं संबोधलं जातं. भारत देशामध्ये तर तुळशीला साक्षात ईश्वराचा दर्जा देण्यात आला आहे. आपण नेहमीच आपल्या आजीआजोबांकडून तुळशीच्या गुणांबाबत ऐकत आलो आहे. पण तुळशीच्या गुणांबद्दल माहीत असूनही आपण तिचा उपयोग हवा तेवढा करत नाही. तुम्हीही ऐकून हैराण व्हाल की, तुळशीमध्ये (Basil) पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्त्व आढळतात. जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूश नाश करण्याची ताकद ठेवतात. यामुळेच अनेक आजारांवरील औषधांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे. या पानाचं विशेष म्हणजे ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते. तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानंच नाहीतर याचं खोड, फूल, बिया या भागांचाही आयुर्वेद आणि नेचरोपथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो. कॅन्सरसारखा दुर्धर रोग असो वा सर्दी-खोकला तुळशीचा वापर हा अनेक शतकांपासून केला जात आहे. चला तुळशीचे फायदे (tulsi benefits in marathi) पाहूया.
Table of Contents
जाणून घ्या तुळशीची माहिती मराठी | Tulsi Information In Marathi
आयुर्वेदामध्ये तुळशीला संजीवनी बूटी असं मानलं जातं. कारण या रोपात असे अनेक गुण आहेत ज्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तुळशीचं रोपं हे फक्त आरोग्यासाठीच नाहीतर घरालाही वाईट नजरेपासून वाचवतं असं म्हणतात कदाचित याच विचारामुळे पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचं. हिंदीत एक श्लोक आहे, “तुलसी वृक्ष ना जानिए। गाय ना जानिये ढोर।। गुरू मनुज ना जानिये। ये तीनों नन्दकिशोर।।” अर्थात तुळशीला कधीही फक्त रोपटं समजू नका, गायीला फक्त पशू समजू नका आणि गुरूला कधीही साधारण मनुष्य समजण्याची चूक करू नका. कारण तिघंही साक्षात देवाचं स्वरूप असतात. चला जाणून घेऊया तुळशीबाबतच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी –
तुळशीचे प्रकार – Types Of Tulsi Leaves In Marathi
हिंदू धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीचे गुण हे अतुल्य आहेत. हे दैवी देणगीयुक्त रोप पाच प्रकारांमध्ये आढळतं. जे विज्ञानाच्या आणि आध्यात्माच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. जाणून घ्या तुळशीचे प्रकार –
1. राम तुळस
2. श्याम किंवा श्यामा तुळस
3. श्वेत/विष्णू तुळस
4. वन तुळस
5. लिंबू तुळस
तुळशीत आढळणारी पोषक तत्त्वं
तुळस याचा शाब्दीक अर्थ म्हणजे ‘अमूल्य रोप’. भारतामध्ये तुळशीला सर्वात पवित्र औषधी वनस्पती मानलं जातं. या पानांचा प्रभाव आणि फायदे जगभरात मानले जातात. तुळशीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रीशन आणि व्हिटॅमीन्स आढळतात. उदाहरणार्थ
- व्हिटॅमीन ए, बी, सी आणि के, कॅल्शियम, आर्यन, क्लोरोफिल, झिंक, ओमेगा- 3, मॅग्नेशिअम, मँगनीज
तुळशीचे फायदे | Tulsi Benefits In Marathi
तुळशीचं रोप हे बहुधा सर्व घरात आढळतं, पण समोर असूनही अनेकदा याच्या गुणांकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं की, ही एक आयुर्वेदीक औषधी आहे, जी बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाविरहीत आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या चमत्कारिक फायद्यांबाबत
स्कीन इन्फेक्शनपासून सुटका (Prevents Skin Infection)
कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीेपेक्षा चांगली औषधी नाही. खरंतर, तुळशीची पानंही अँटी बॅक्टेरिअल असतात. जी बॅक्टेरियाची वाढ रोखतात. ज्यामुळे इन्फेक्शनवरील उपचाराला मदत मिळते. जर तुम्हालाही कोणत्या प्रकारचं स्कीन इन्फेक्शन असेल तर त्या स्कीन इन्फेक्शनवर बेसनासोबत तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून स्कीनवर लावावी, नक्कीच फायदा होईल.
सर्दी -खोकल्यावर गुणकारी (Good For Cold)
तुळस सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे. ऋतू बदलल्यामुळे अनेकांची तब्येत लगेच बिघडते. औषध घेतल्याने ताप कमी होतो पण खोकला आणि कफ बराच काळ तसाच राहतो. अशावेळी तुळशीच्या काढ्यासारखा घरगुती उपाय केल्यास नक्कीच आराम मिळतो.
नुकत्याच एका संशोधनानुसार तुळशीला तणाव दूर करण्याचा प्रभावी प्राकृतिक उपाय मानण्यात आलं आहे. खरं पाहता तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट आढळतात जे आपल्यावरील तणाव आणि मानसिक असंतुलनाला बरं करतात. याशिवाय ही पानं तणावामुळे मेंदूवर होणाऱ्या नकारात्मक विचारांशी लढा देण्यासही सहाय्य करतात.
वाचा – खडीसाखर खाण्याचे फायदे
कॅन्सरपासून बचाव (Prevents Cancer)
काही संशोधनात तुळशीचं बी हे कॅन्सरवर ईलाजासाठी उपयुक्त असल्याच आढळलंय. खरंतर तुळस अँटीऑक्सीडंट क्रियेला चालना देते आणि कॅन्सरच्या ट्यूमर पसरण्यापासून रोखते. असं म्हणतात की, नियमितपणे तुळशीचं सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते.
अनियमित पिरियड्सच्या समस्येबाबत (Helpful In Periods)
अनियमित किंवा उशिरा येणाऱ्या पिरियड्सची समस्या आजकाल बऱ्याच मुलींमध्ये दिसून येते. साधारणतः पिरियड्सची सायकल ही 21 ते 35 दिवसांची असते. जर तुमचे पिरियड्स 35 दिवसांनंत येत असतील तर तुम्हाला पिरियड्स उशिरा येण्याची समस्या आहे. अशावेळी तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास फायदा होतो. यामुळे मासिक पाळीतील अनियमितता दूर होते.
वाचा – केशर खाण्याचे फायदे (Kesar Benefits Of In Marathi)
पोटासंबंधित आजार
पोटाच्या विकारांमुळे पीडित लोकांसाठी तुळस हे एक वरदान आहे. हो, पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. तज्ज्ञांनुसार तुळशीची पान आणि बिया दोन्हीही पोटाचा अल्सरवर गुणकारी आहेत.
किडनी स्टोनवरही लाभदायक (Good For Kidney Stones)
तुळस ही किडनीचं प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने मूत्रविसर्जन सुलभ होते आणि किडनी स्वच्छ राहण्यास मदत होते. जर किडनी स्टोन असेल तर तुळशीचा ताजा रस मधात घालून रोज किमान 4 ते 5 महिने सेवन करावा. यामुळे मूत्रावाटे किडनी स्टोन पडून जाईल.
प्रतिकारात्मक शक्ती वाढवतं (Improves Immunity)
तुळस आपल्या शरीरासाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. ताजी तुळशीची पान रोज सकाळी गिळल्यास शरीराचं ईम्यून सिस्टम चांगलं राहतं. यामध्ये अनेक असे गुण आढळतात जे शरीरातील इन्फेक्शनशी लढणाऱ्या अँटीबॉडीजच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ करते, ज्यामुळे आपलं आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं.
तोंडाची दुर्गंधी करतं दूर (Prevents Bad Breath)
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं खूप मदत करतात. ही एक प्रकारे नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पान पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. असं केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
स्कीनची काळजी (Skin Care)
स्कीनला हेल्दी आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे. तुळशीच्या पानांमधील अँटी ऑक्सीडेंच, अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बायोटीक यांसारख्या आढळणाऱ्या गुणांमुळे प्रत्येक प्रकारच्या स्कीनच्या तक्रारीवर ही पान गुणकारी ठरतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यापासून त्यावरील डाग दूर करण्यापर्यंत अनेक उपाय यामध्ये सामील आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी निगडीत ब्युटी बेनिफीट्स
1. स्कीनला करतं हायड्रेट
2. तुळस आपल्या त्वचेवर अँटी एजिंगच्या रूपात काम करते.
3. डागविरहीत चेहरा आणि तजेलदार त्वचेसाठी तुळशीचे पानं फायदेशीर आहे.
4. केसांच्या प्रत्येक समस्येपासून तुळस सुटका करते.
5. तुळशीची पानं खाण्याचे अन्य फायदे
6. गर्भवती महिलांमध्ये उलटी होण्याची समस्या आढळते. या समस्येवर तुळशीची पानं फायदेशीर ठरतात.
7. वजन कमी करण्यासाठी रोज तुळशीच्या पानांचा रस घेतल्यास फायदा होतो.
8. यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यताही कमी होते.
9. तुळस कॉलेस्ट्रॉल कमी करून रक्तातील गुठळ्या होणं ही थांबवते.
10. यौन रोगांमध्येही तुळशीच्या बियांचा उपचारासाठी वापर केला जातो.
11. धूम्रपान सोडण्यासही तुळस खूप फायदेशीर ठरते.
12. जळजळ आणि सूज यांसारख्या समस्यांवर आरामासाठी तुळशीचा उपयोग होतो.
तुळशीची पाने खाण्याचे फायदे (Tulsi Che Fayde In Marathi)
तुळशीच्या पानांना खाण्याचा योग मार्ग म्हणजे ती पानं गिळणं किंवा त्याचा रस, काढा बनवून पिणं. चहा किंवा इतर प्रकारे पाण्यात तुळशीची पान उकळून पिता येतात. पण चूकूनही तुळशीची पान चावू नये. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरं म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा धातूची तत्त्व आढळतात, जी पानं चावल्याने दातांवर लागू शकतात. पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पान चावण्याऐवजी ती गिळावी किंवा चघळावी. यामुळे अनेक प्रकारच्या रोगांमध्ये फायदा होतो.
तुळशीचे घरगुती उपाय आणि फायदे | Tulsi Kadha Benefits In Marathi
- एक चमचा तुळशीच्या रसाचं रोज सेवन केल्यास पोटासंबंधित सर्व आजार हळूहळू दूर होतात.
- त्वचा जळल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास लाभदायक ठरतो.
- कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे यासारख्या समस्यावर तुळशीचा रस कोमट करून कानात घातल्यास फायदा होऊ शकतो. (पण हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
- लिंबाच्या रसासोबत तुळशीच्या पानांचा रस चेहऱ्याला लावल्यास ग्लो वाढतो.
- ताप आणि सर्दी कमी होण्याकरता एक कप पाण्यात 5 ते 7 तुळशीची पानं चांगली उकळून घ्या. मग ते पाणी गाळून दिवसातून कमीत कमी दोन वेळा प्या.
- जर तुम्हाला मायग्रेन किंवा डोकेदुखीचा वारंवार त्रास होत असल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून प्या . लगेच फरक पडेल.
- तुळशीसोबत काळीमिरीचं सेवन केल्यास पचन चांगलं होतं.
- नैसर्गिकरित्या तणाव कमी करण्यासाठी एका दिवसता कमीत कमी एक वेळा तरी तुळशीचा चहा नक्की प्या.
- तुळशीचं बी दह्यासोबत खाल्ल्यास पाईल्सचा त्रास दूर होतो.
- ज्या लोकांना जास्त थंडी वाजते त्यांनी तुळशीची 8-10 पानं दूधात उकळून प्यावी.
- जखम झाल्यास तुळशीच्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरते आणि इन्फेक्शनही होत नाही.
- तुळशीची पानं तेलात मिसळून त्वचेला लावल्यास जळजळ कमी होते.
- तुळशीची पानं वाटून चेहऱ्यावर किमान 10 मिनिटं लावा आणि चेहरा धुवा. यामुळे स्कीन हायड्रेट होते आणि हे अँटी एजिंग म्हणूनही काम करतं.
- तुळशीच्या तेलाचा वापर केल्यास कोंडा आणि ड्राय स्कॅल्पपासून सुटका मिळते.
- लिव्हरचा त्रास असल्यास रोज सकाळी तुळशीची पानं सकाळी पाण्यात उकळून प्यावी.
- डोळ्यांची आग किंवा खाज येणे अशी समस्या असल्यास तुळशीच्या पानांच्या अर्काचा वापर करावा.
- रोज काही वेळ तुळशीच्या रोपाच्या सानिध्यात बसल्यास अस्थमा आणि श्वास घेण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
- तुळशीची पानं उकळलेल्या पाण्याने चूळ भरल्यास तोंडाच्या कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते.
तुळशीच्या पानांचे तोटे – Side Effects Of Tulsi In Marathi
तुळशीची पानंही काही प्रमाणात उष्ण असतात. त्यामुळे थंडीमध्येही खाल्ल्यास शरीराला काही अपाय होत नाही पण उ्न्हाळ्यात याचं अत्याधिक सेवन झाल्यास त्रास होऊ शकतो. जर डायबेटीज किंवा हायपोग्लायसीमियासारख्या रोगांची औषधं घेणाऱ्या लोकांनी तुळशीचं सेवन करू नये. यामुळे शरीरातील ब्लड शुगर कमी जास्त होण्याची शक्यता असते. जर तुम्ही दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा तुळशीचा चहा घेत असाल तर छातीत आणि पोटात जळजळ, अॅसिडीटी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
पुढे वाचा –
अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (Angala Khaj Yene Gharguti Upay)